मनातल.
खरच कधी कधी कळत नाही की माणसाच अस अचानकपणे जाण मनाला ऐव्ह्ढ वेदना का देत ते? जाणारातर सदेह ह्या जगातुन गेलेला असतो पण मागे राहीलेल्या ईतरांसाठी मात्र त्याच जाण अतोनात दु:ख देणार असत. त्यातही मरणार्या माणसाने आत्महत्या केली असेल तर मग मात्र त्याच्या नातलगांसाठी मात्र ते जिवंतपणी तीव्र वेदनादायी असत. काही कुटुंबासाठीतर जिवंतपणी मरणयातनाच म्हणा ना. खर तर मनुष्य आत्महत्या का करतो? ह्यामागे कितीतरी वेगवेगळी कारण असु शकतात.
मिसळपाव
“काय मंडळी, कशी काय झाली दिवाळी?”, भुजबळकाका, बर्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, चावडीवर प्रवेश करत.
“ठीक ठाक! महागाईने त्रस्त असलेल्या लोअर मिडलक्लासला परवडेल अशीच झाली.”, नारुतात्या उसने हसू चेहेर्यावर आणत.
“हो, पण बाळासाहेबांच्या जाण्याने दिवाळीचा आनंद झाकोळला मात्र गेला.