असेही पालकत्व
काल माहेरी गेले. जाताच माझ्या भाच्या मी भेटल्या पर्यंतच्या ताज्या बातम्या मला लगेच देतात. तशाच त्या मी गेल्याबरोबर धावत आल्या आणि म्हणाल्य आत्या आत्या भुषणच्या मांजरीला ३-४ कुत्र्यांनी मारून टाकल. आता तिची तिन बाळं बाटलीने दुध पितात. पहिला त्या मांजरीबद्दल आणि अनाथ झालेल्या पिल्लांबद्दल वाईट वाटले. मग ही पिल्ले बाटलीने दूध कशी पितात त्या बद्दल उत्सुकता लागली. कॅमेरा नेहमीप्रमाणे होताच बरोबर. भाच्यांना सांगितले भुषणला सांगा मी फोटो काढायला येतेच दूध पाजायचे असल्यावर मला हाक मार.
भुषण म्हणजे माझ्या आईच्या शेजारी असलेल्या कुटूंबातील ८ वीतील मुलगा. आमच मानलेल नात आहे.
मिसळपाव