Skip to main content

जीवनमान

राम .. राम .. राम ..

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 28/09/2012 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
राम... राम... राम... राम ... माळ घेऊन माझा जप चालू आहे कानावर बातमी पेट्रोल डिझेल महागले राम .. राम .. राम .. माळ घेऊन जप चालू कानावर बातमी कोळसा घोटाळा जलसिंचन घोटाळा राम . राम. जप चालू राम . सिलेंडरची टंचाई मरा.. मरा.. मरा... आजकाल माझा जप नीट का होत नाही, माझ्या रामालाच ठाऊक ! .

फेसाळबुक

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 27/09/2012 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या बायकोचं फेसबुक खातं नाहीये. मी तिला एक-दोनवेळा म्हटलं की फेसबुकावर खातं उघड पण तिला अजिबात रस नाही. तिचा प्रश्नः "काय करू मी फेसबुकावर येऊन?" "आपल्या शाळा-कॉलेजमधल्या मैत्रीणींशी आणि मित्रांशी कनेक्ट हो; फोटो शेअर कर...अजून काय? सगळेच करतात. आपण सगळ्यांच्या संपर्कात राहतो." "तुझे २०० मित्र आहेत फेसबुकावर, कुणा-कुणाशी तू वरचेवर संपर्कात असतोस? नुसतीच यादी मोठी असते, असा यादी करून ठेवलेला संपर्क खरे म्हणजे हृद्य नसतोच; तो नुसताच आभास असतो. तुमचा कॉलेजचा गृप पुण्यातच आहे. तुम्ही महिन्याला एकदा तरी भेटता, सहलीला जाता.

चावडीवरच्या गप्पा – रिटेल बाजार आणि FDI

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 25/09/2012 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
“हद्द झाली ह्या शिंच्या काँग्रेसची, आता तर काय भारत विकायलाच काढला आहें.”, घारुअण्णा तणतण करीत कट्ट्यावर हजेरी लावत. “तरी म्हटलेच! अजून असे काय कोणी सरकारी निर्णयावर न घसरता पक्षावर तोंडसुख घेतले नाही”, शामराव बारामतीकर. “अहो बारामतीकर, तो तुमच्या पक्षाचा चष्मा काढा आणि उघड्या डोळ्यांनी बघा जरा”, घारुअण्णा जरा चिडून. “अहो घारुअण्णा तुम्ही नेमक्या कोणत्या काँग्रेसबद्दल बोलताय?

माणुसकी....

लेखक अमितसांगली यांनी रविवार, 16/09/2012 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
न मानला धर्म न मानली जात धरली फक्त माणुसकीची कास कारण हीच आहे माझी वाट ... बेभान उधळणाऱ्या पावसाच्या सरींनी नभी आकाशाच्या इंद्रधनुष्य उमटते माय-माउली मातीतून, मादक सुगंध दरवळतो जणू घेऊनी रूप परिसाचे, सृष्टीचे चराचर उजळिते इथे नसे कधी दुजाभाव, न कधी नरपशुंचा भेदभावाचा घाट, बरसावे आपणही कधीतरी यासवे, हाच मनी ध्यास कारण हीच आहे माझी वाट ... करुनी पैशाला श्वास, लाविली संवेदनांची वाट मारुनी ताव फुशारकीचे, समेटले सोंग सज्जनांचे घेऊनी शिक्षण इयत्तांचे, कातडे पांघरले माणुसकीचे, कातड्यालाच या लावावी आग, हाच मनी ठाव, कारण हीच आहे माझी वाट ...

को. ऑप. गणेशोत्सव

लेखक चेतन माने यांनी शनिवार, 15/09/2012 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
१५ ऑगस्ट ची दुपार झाली होती. सगळे सोसायटीच्या आवारातून ऑफीस कडे चालले होते. "चला रे बसुया " च्या पाच सहा हाका आल्या आणि सगळे निघाले. "काय रे साला नुसती फालतुगिरी आहे ही दरवर्षीची मीटिंग म्हणजे" , मी. "अरे यार जाऊन बसुया तर सही" रमेश. सार्वजनिक गणेशोत्सव म्हटला आणि आणखी तो सोसायटीचा असला तर मीटिंग नावाची औपचारिकता झालीच पाहिजे . बरेच जण न जाणे का पण मीटिंग साठी खूपच उत्साही असतात . हि असली मंडळी फक्त मीटिंग साठीच उत्सुक असतात कामासाठी नाही! आणि अश्याच बर्याच जणांच्या एकापेक्षा एक फालतू आयडिया ऐकणे म्हणजे मीटिंग!! माझी आपली नकार घंटा सुरूच होती पण मित्रांबरोबर जाऊन बसावच लागलं.

वैसी

लेखक रेशा यांनी शनिवार, 15/09/2012 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
घोडा घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या?? तू क्यो ऐसे कर राही है?? सोच मत ज्यादा कोर्टसे निकले तो just cut U r self off from the matter and person !! why you getting senty ????, remember that, u need to react from brain n not at all by heart hope you getting me...." else m sure U'll surely confused and spoil u r personal as well as professional life" तो म्हणत होता ते सगळं सगळं खंर होतं. त्याचा शब्द न शब्द खरा होता, पटत होता. पण ती मुलगी ते remand application आणि तिच्या बहिणीचा आक्रोश काही डोळ्यांसमोरून हालत नव्हतं.

कायच्या काय

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी गुरुवार, 13/09/2012 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय दादा आज आम्ही बसणार हाय काळ्या काळ्या ओल्डमाँकची आणली आहे बाटली चौकोनाची बाटली पाहुन पोर सारी पेटली पेटलेल्या पोरांना चकणा पुरणार नाय दादा आज आम्ही बसणार हाय दोन पेग पोटी जाता डॉन होती सारे झोपी जाती काही काही मोजतात तारे वकार युनुसचा काही भरवसा नाय दादा आज आम्ही बसणार हाय सकाळी डोके दुखता हवा एक उतारा जमले नाही त्याने तर लिंबुपाणी मारा ऑफीस मात्र उगाच चुकवायचे नाय दादा आज आम्ही बसणार हाय बाटलीधर,