Skip to main content

जीवनमान

आजूनहि मी

लेखक श्रीमत यांनी गुरुवार, 20/12/2012 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
अजूनही अजूनही मी वावरतो ह्या माणूस हरवलेल्या सनातन शहरात ऐकतो पवित्र परंपरा अन संस्कृतीचा झिंगलेला जयघोष, नग्न करून धिंड काढलेल्या स्त्री बद्दलचे, भाड्याने आणलेल्या रडव्यांचे मुक्त पंचतारंकित परिसंवाद गरिबी हटाव आणि जाती वादाच्या मादक गर्जना.......... पहातो लोकशाहीच्या शाही सुपुत्रांकडून लोकांवर झालेला पाशवी बलात्कार निर्विकारपणे मनावर एकही ओरखाडा उमटू न देता मी मित्रांबरोबर चहा पितो ,सिगारेट ओढतो, हिंदी सिनेमा पहातो प्रयेसीच्या दारावर चक्कर मारतो............ मग रात्री निर्लज्जपणे माझ्यातला मी, स्वत:ला विचारतो एवढा का मी षंढ अजून ही????????????
काव्यरस

सिनेमे आणि त्यांच्याशी निगडित आपल्या फक्त आपल्या आठवणी

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी शुक्रवार, 14/12/2012 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमा आणि त्यांच्याशी निगडित आपल्या फक्त आपल्या काही खास आठवणी असतात. आभासी जगतात भटकत असतांना ह्या भन्नाट विषयावर वाचायला मिळाले. ह्या निमित्ताने माझ्या आठवणींना लागलेला पाझर मी येथे रिता करतो. भारतात सिनेमे आवडत नाही अथवा पाहत नाही असा माणूस विरळाच आपण सिनेमे पाहतो म्हणजे काय तर एकतर थेटर माफ करा मल्टिप्लेक्स.

चावडीवरच्या गप्पा - बळीराजा आणि रामगिरी

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 11/12/2012 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee चिंतोपंत“शेतकर्‍यांनी म्हणे हल्लाबोल केला रामगिरीवर, पोलिसांशी चकमक झाली त्यांची.”, चिंतोपंत चावडीवर प्रवेश करत. “आजकाल काय कोणीही उठते आहे आणि कायदा हातात घेते आहे, काय चालले आहे ते त्या विश्वेश्वरालाच ठाऊक”, घारुअण

गाल चोळ फक्त

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 11/12/2012 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,

गजरा - एक प्रवास

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 06/12/2012 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
(ऐसीअक्षरे ह्या मराठी संस्थळाच्या दिवाळी अंक 2012 मध्ये पूर्वप्रकाशित) लहान असताना टी.व्ही. ही एक ठराविक वेळी पाहण्याची आणि चॅनल्सचा रतीब न घालणारी एक करमणूकीची सोय होती. त्यावेळी दूरदर्शनवर 'गजरा' नावाचा एक कार्यक्रम यायचा. त्या कार्यक्रमामुळे मला गजरा हा शब्द, तो खराखुरा फुलांचा गजरा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायच्या आधी कळला. त्या कार्यक्रमात सुरुवातीला कॅलिडोस्कोपमधून दिसते तशी वेगवेगळ्या आकारांची हालणारी नक्षी दिसायची. त्यामुळे गजरा ही एक रंगीबेरंगी वस्तू असावी असेच मला वाटायचे.

आस्थेचे बंध

लेखक रणजित चितळे यांनी बुधवार, 05/12/2012 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी रझा ऍकॅडमीने चालवलेल्या विरोध प्रदर्शनाच्या वेळेस मुंबईच्या आझाद मैदानावर जेव्हा तोडफोड झाली त्यात एक फोटो प्रामुख्याने आपल्या मनाला ठेच लावून गेला. आझाद मैदानावर असणाऱ्या हुतात्मा स्मारकाला एक इसम तोडतानाचा तो फोटो होता. हा फोटो पाहून बऱ्याच जणांना राग आला असेल, व काहींना तर अगदी आताच ह्या इसमाला पकडून हाणायला पाहिजे असे वाटले असेल. हुतात्मा स्मारकाला तोडतानाचे दृश्य आठवून आपल्या मनात कोलाहल सुरू झाला असेल. कोण असेल हा इसम? कोणी भारतीय नागरिक असे कृत्य करू धजेल का? हे कृत्य करताना त्याच्या मनात काय असेल? असे करणारा आपल्या देशाचा शत्रू तर नसेल? पाकिस्तानी तर नसेल?

मी काय करू??..........

लेखक बटाटा चिवडा यांनी रविवार, 02/12/2012 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी काय करू??.......... तो रिटायरमेंट घेणार आहे म्हणे.. मग मी काय करू?? त्यांचं स्मारक इथं नाही तिथं बांधणार म्हणे मग मी काय करू?? त्याच्या त्या मुव्ही मध्ये ती मर्डरर नाहीये म्हणे मग मी काय करू?? म्हणे तो तर डेंग्यू ने मेलाय मग मी काय करू?? तो म्हणे भारताचा नेक्स्ट पंतप्रधान मग मी काय करू?? आणि तो म्हणे भारताची नवीन WALL मग मी काय करू?? फेसबुक BAN होणार आहे म्हणे मग मी काय करू?? अरे पेट्रोल महाग ..Gas महाग महागाईची भडकलीये आग तसं म्हंटलं तर मी काहीच करू शकत नाही.. कारण ना मी "हृदयसम्राट", ना मी कोणाचा "माही" तुटपुंज्या कमाईत जगतोस रे कसा तू.. अशी कोणीच विचारपूस करत नाही