जीवनमान
दयेच्या छावण्या
पाणी पितो ती नदी आमची नाही
अन्न गिळतो ती शेतं आमची नाहीत
आकाश पक्षी चंद्र झाडं हे तर राहूच द्या
ही कुत्री मांजरं बदकं कोंबड्या पण आमची नाहीत!
युनिसेफची गुळगुळीत पुस्तकं अन तुळतुळीत मडमा
WHO ची झटपट औषधं अन चाकपाक डॉक्टर्स
RedCross चं जगभरातील वैविध्यपूर्ण एकच रक्त
युनोने थाटलेले Waterproof तंबू अन मिनरल बाटल्या
यातलं काहीच आमचं नाही!
नाही हो, आमची माणसं इतकी दयावान नाहीत!
ती रासवट आहेत, मारतात, मरतात
तलवारीने गळे चिरतात,
रक्ताच्या कुर्बान्या देतात
महाहिंसक माणसं!
त्यांच्या कर्तृत्वामुळेच तर आम्ही आज तुमच्यामध्ये आलो.......
पण तुमच्यात आलो म्हणजे
तुमचे नाही झालो, होऊ शकत नाही!
एक काम कर
---------------द्वं--द्व---------------
संध्याकाळी ऑफिसवरुन सिटीत मित्रांकडे बाईक वरुन जात असेन. यूनिवरसिटी चौकातल्या जगातल्या सर्वात मोठ्या सिग्नलला गाडी बंद करून उगाच हिकडं तिकडं बघत असेन. तेवढयात एक काळं-शेंबडं पोरगं कडेवर घेतलेली -त्या पोरापेक्षा थोड़िशीच मोठी पोरगी , स्वत् अन कडेवरच्या त्या पोराला कशीबशी सावरत 'कितीही कललं तरी ते बारकं पडणार नाही' या कॉंफीडन्सनं समोर चालत येईल. क्षणार्धात डोळ्यात अतिशय करूण अन हतबल भाव आणून , मारून-मारून शिकवलंय तितकं बारकं तोंड करून खाडकन 'आशेने' आपला तळहात पुढे करेल.
---------एका प्रवासाचा क्रॉससेक्शन------------
---------एका प्रवासाचा क्रॉससेक्शन------------
गांधीबाबांची जयंती. सुट्टी. लॉन्ग वीकेंड. घरी जायचं म्हटलं की आजही तेवढाच आनंद.
पुणे-सोलापूर सकाळी 9.30ची इंटरसिटी गाठायची आहे. जगताप-डेरीच्या नवीन BRTस्टॅंड वर कानात हेडफोन अडकवुन प्रसन्न मनानं बसची वाट पाहतो. गाणं चेंज करेस्तोर 5 मिनटातच -हादरा बसताना फ़क्त चुंयि-चुंयि असा आवाज करणारी वातानुकुलीत BRT येते. स्वयंचलित दरवाजातून प्रवेशतो. संपूर्ण भला मोठा अन व्यवस्थित लेन्स आखलेला गुळगुळीत प्लेन रोड. प्रवास म्हणजे सु:ख! आत बसल्यावर बस हालली तरी फ़क्त हत्तीच्या पाठीवर इकडून-तिकडे मऊ झुलल्यासारखं वाटावं इतका मऊपणा..
प्रेरणादायी प्रकाश!!
सूर्य उगवतो आणि मावळतो. दिवसा सूर्य प्रकाशमान असताना पृथ्वीवरील सगळेजण त्याचा फायदा घेतात. मावळताना एकटा सूर्य मावळतो. सगळे जग सूर्याबरोबर मावळत नाही. रात्री सूर्य नसतो म्हणून त्याला काहीजण दूषणे लावतात तर काहीजण दिवसभर प्रकाश दिल्याबद्दल रात्री सूर्याचे आभार मानून झोपी जातात. यश हे उगवत्या सूर्यासारखे तर अपयश हे मावळत्या सूर्यासारखे असते....
तुम्हाला मिळालेल्या यशात सगळे भागीदार होतात व श्रेय घेतात. तुमच्या अपयशाचे भागीदार कुणीच नसते. तुम्ही एकटेच तुमच्या अपयशाला जबाबदार ठरता.
पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की
२४ सप्टेंबर २०१५ (ख्रिस्तपुर्व लिहायचा मोह आवरला) मिपावरचं एक भव्य (?) दिव्य (नमस्कार माझा तया दिव्यश्रीला) वॅक्टीमॅट्व श्री.स्त्री.दी.भव्यश्री ह्यांनी युरोपखंडे जर्मनदेशे नामक भुभागावरुन भारतामधल्या पुण्यभुमीमधे एक समस्तं मिपाकरांचा एक कट्टा व्हावा असा डाव्या पायातला बुट काढला.
एका मंदिरात...
मी राहतो त्याठिकाणी एक अवजड बोजड मंदिर आहे. पण मी तिकडे फारसा जात नाही. रात्रीचं हे मंदिर मला भेसुर वाटते. कलुळात 'कवशी' दिसते असं मला एकजण म्हणाला होता. बऱ्याच वर्षापुर्वी कुण्या 'कौशल्या'ने ईथेच ऊडी मारली मारली होती. तिचं भेसुर भुत ईथंच वावरतयं असा माझा समज झालाय. रात्रीचं मी तिकडं कधीच फिरकत नाही.
भल्या सकाळी उठुन मी मंदिरात जातो.
गाभाऱ्यातल्या अनाम परड्या मला जोगवा मागतात. पाट्यावरचा लालबुंद गंध माझ्या कपाळावर अलगद जाऊन बसतो. चाफ्याची सुगंधी फुले माझ्या हाताकडे झेपावत येतात. मी त्यांना देवीकडे फेकतो. आतल्या काळोखात मला फारसं दिसत नाही.
पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल.
तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५
वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता
स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा
कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे
फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम.
कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का?
(संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको)
धन्यवाद.
मटणाचं कालवण! (शतशब्द्कथा)
फाट्यावरच्या ट्रकमधून गर्दी सांडून ओघळ फुटल्यासारखी गाव आणि वस्त्यांकड निघालेली.
कलंडलेल्या उन्हातनं तिघी वस्तीकडं निघाल्या. गर्दीत मिसळू न देण्यासाठी सासूने त्या दोघींचे हात धरलेले!
भयानक दुष्काळ पडलेला! दुष्काळी कामावरूनच तिघी परतत होत्या. स्वयंपाकासाठी काय करायचं हा नेहमीचा प्रश्नही सोबत चालत होता. पण कुणीच काही बोलत नव्हत. मुक्याच जणू!
नेहमीच्या वळणावर तिघी थांबल्या. थोरली सून रस्ता उतरली, ढासळलेल्या पवळंवरून पलिकडं गेली. कंबरेच्या विळ्याने 'विचका' स्वयंपाकासाठी काढू लागली.
गोष्ट छोटी डोंगरा एवढी.....( वर्गणीचा हिशोब )
माझ्या एका मित्राच्या ऑफ़िसमध्ये एका मंडळाचे काही कार्यकर्ते गणेशोत्सवात सी सी टि व्ही संदर्भात चर्चा करण्यास आले होते.
पण अजून फ़्लेक्स स्टार अध्यक्ष आले नव्हते म्हणून ते गप्पा मारत बसले होते.
कार्यकर्ता नं 1- आपण ह्या वर्षी काहितरी वेगळा देखावा करुया.
कार्यकर्ता नं 2- आयला खरच आपण कायतर वेगळे केल पाह्यजे. साले ते वरच्या मंडळाचा तो अमर्या लय भाव खातो.
का. 1- आं काय? अमर्या साला त्याचा काय संबंध?
का. 2- तसं नाय
ते काय करतय नगरसेवकाच्या हापीस वर पडीक असतय ना मग तिथ कामासाठी आलेले त्याला ओळखत्यात मग वर्गणीच्या येळेला सालं चांगल्या पावत्या फ़ाडतय.
का. 1-अरे पण आपण देखाव्याचा विषय
का.
मिसळपाव