आमच्या घराबाहेरच्या आवारात ५-६ ढोली असलेले आंब्याचे पुरातन झाड आहे. खंड्या, हळद्या, कोकिळा, कावळे, हॉर्नबिल यासारखे अनेक पक्षी सकाळची कोवळी उन्हे अंगावर घ्यायला, तसेच निवांत व्हायला ह्या झाडावर बागडत असतात. तसं पाहील तर ह्या झाडाला साळुंखी पक्षांची वसाहत म्हणू शकतो. कारण झाडावरच्या ढोलीमध्ये साळुंखी पक्षांची कुटुंबे गुण्यागोविंदाने नांदत असतात. हे पक्षी इतरत्र वावरतानाही जोडीने किंवा घोळक्याने दिसतात. क्वचित एखादा भरकटून किंवा भांडून-रागावून एकटा फिरताना दिसतो.
माझ्या निरीक्षणानुसार वेगवेगळ्या मूडनुसार ह्या पक्षांच्या आवाजात चढ-उतार असतो.