Skip to main content

जीवनमान

ll गंगास्मरण ll

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 26/09/2015 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
सप्टेंबर महिन्यातला शेवटचा शनिवार हा जगभरात 'सरिता दिन' म्हणून साजरा केला जातो. (जगभरातील नद्यांचे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहेच.) पण आजच्या दिवशी, परमपावन मानल्या गेलेल्या गंगेचे, तिच्या नितळ स्वरूपात केलेले स्मरण समयोचित ठरावे! तू कावेरी तूच नर्मदा, गोदा भद्रा सरस्वती तुझीच सारी अनंत रूपे, कृष्णा पद्मा शरावती तू कल्याणी, नीरदायिनी तुलाच नमितो सांबसदाशिव, हरहर गंगे तुलाच स्मरती भगिरथाचे पुत्र चिरंजीव प्रकटयोगिनी बिकटगामिनी तुझ्या तटाचे कडे निसरडे…. कितीक आले गेले भुलले तुझ्या किनारी शांत निमाले प्रयागसंगम अलख निरंजन तुझ्यात फिरते चक्र चिरंतन विशालसुंदर तरल निरंतर तुझ्यात विरते माझे अ

श्रीगणेश लेखमाला ९ : माझी चित्तरकथा

लेखक अभ्या.. यांनी शनिवार, 26/09/2015 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
.......................... वर्दळीच्या नव्या पेठेतली सकाळी ७.००ची वेळ. इंच इंच लढवणार्‍या दुकानदारांची स्टँडीज, मॅनिक्वीन बाहेर ठेवण्याची घाई. पाच मजली भव्य शोरूम. २० बाय ५ चा ग्लोसाईन. वजन अंदाजे ३५० किलो. त्यात ट्यूबलाईट्स. लहान जिन्यावरून तो नेता येत नाही, म्हणून बाहेरून चढवतोय. वरून सोडलेले दोर. पाळणा बांधून त्यावर उभे राहून ड्रिल करणारे कामगार. त्यांच्या कमरेला दोर बांधून धरलेला मी. दोर थोडा हलला की धस्स होतंय. बोर्ड हळूहळू जागेवर बसताना निम्म्याच्या वर मी कठड्यावरून बाहेर आहे. .......................... पाच लाख पॅम्पलेट्सची ऑर्डर. एकाच वेळी सोलापूर अन कोल्हापुरात पेपरमध्ये पडले पाहिजेत.

श्रीगणेश लेखमाला ८ : सोर्सिंग व प्रॉक्युरमेंट (खरेदी विभाग)

लेखक अन्या दातार यांनी शुक्रवार, 25/09/2015 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
उत्पादन अभियांत्रिकीची पदवी घेऊन नोकरीच्या शोधात बाहेर पडलो. शून्य अनुभव पण शिकण्याची व कष्टाची तयारी या जोरावर नक्कीच काहीतरी मिळवू हा विश्वास ठेवत इंटरव्ह्यू देत होतो. अखेर एके ठिकाणी हातात ऑफर लेटर पडले. पोस्ट - ग्रॅज्युएट ट्रेनी इंजीनिअर (मटेरिअल्स). लगोलग रुजू झालो. ट्रेनिंगच्या पहिल्या दहा दिवसात एकेका विभागाची ओळख करून देण्यात आली. कंपनी काय वस्तू पुरवते, कुणाला पुरवते इ. इ. बाबींची व्यवस्थित ओळख करून घेतली. उत्पादन विभागात असेंब्ली कशी होते, काय काय गोष्टी लागतात हे नीट समजून घेतले. कोणत्याही आस्थापनेस एखाद्या वस्तूची निर्मिती करण्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता असते.

सुंदर पिचाईंच्या स्वागत संदेशा निमित्ताने

लेखक विकास यांनी गुरुवार, 24/09/2015 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
आज गुगल प्रमुख सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सिलिकॉन व्हॅलीच्या भेटी निमित्ताने स्वागत संदेशगुगल इंडीयाच्या युट्यूब चॅनलवर ठेवला आहे. एकीकडे बॉबी जिंदाल सारखा अमेरीकन रिपब्लीकन राजकारणी जो स्वतःची भारतीय मुळे लपवायचा प्रयत्न करत आहे तिकडेच सुंदर पिचाईंसारखा तरूण सिइओ, लोकं काय म्हणतील वगैरेचा विचार न करता, गुगल इंडीयाचॅनलवर मोदींचे स्वागत करतो, हे नक्कीच स्वागतार्ह आहे. भारतीय असणे हे न लपवणे, मोदींचे स्वागत हे माझ्या दृष्टीने किरकोळ मुद्दे आहेत...

काहीतरी करण्याची जिद्द

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 24/09/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
जिद्द, आत्मविश्वास या गोष्टी शोधायच्या असतील तर थोरांची आत्मचरित्रच वाचावी लागतात, त्यांचे शब्द ऐकावे लागतात असं नाही. अगदी साध्या सोप्या माणसांशी केलेल्या संवादातूनही अशा मूल्यांची ओळख होते. असाच एक माणूस मला भेटला. हा माणूस म्हणजे आमच्या कँटीन स्टाफ मधला एक जण. अगदी ४-५ महिनेच झाले असतील त्याला कँटीन मधे लागून. इथे एका केटरर चं कंत्राट आहे, ज्याच्याकडे हा कामावर आहे. तसेही कँटीनमधले चेहरे नियमितपणे बदलत असतात त्यामुळे सुरुवातीला 'आणखी एक नवीन चेहरा' म्हणून त्याच्याकडे फार लक्ष दिलं नाही कुणी आणि मीही.

श्रीगणेश लेखमाला ७ : अनुभवांची शिदोरी

लेखक पिशी अबोली यांनी गुरुवार, 24/09/2015 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
'अ गुड फील्डवर्कर विल मॅरी इंटू द कम्यूनिटी ही/शी इज वर्किंग विथ, दॅट्स द ऑन्ली वे टु मेक देम ट्रस्ट यू' फील्डवर्कवरच्या व्याख्यानात अंदमानी भाषांवर परिश्रमपूर्वक काम केलेल्या बाईंनी मिश्कीलपणे म्हटलं आणि आमच्या हॉलमध्ये खसखस पिकली. पण फील्डवर्करमध्ये आपल्या कॉलेबरेटर समाजाबद्दल किती आत्मीयता असली पाहिजे, हा मॅडमनी त्यांच्या एकूणच व्याख्यानात सांगितलेला मुद्दा, तो मात्र मनात पक्का ठसला. फील्डवर्क म्हणजे काय, याची काही व्याख्या करण्याइतका माझा अजिबातच अनुभव नाही. प्रत्येक क्षेत्राची काम करण्याची पद्धत वेगळी, त्यामुळे ही व्याख्या क्षेत्रानुसार बदलत असावी.

सनबर्न फेस्टीवल , गोवा , २७- ३० डिसेंबर २०१५

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 23/09/2015 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
मला पुर्ण कल्पना आहे की मी हा धागा चुकीच्या फोरम वर टाकत आहे . आमचे येथील कंपुबाज मित्र क्राऊडोफोबियाक , स्वमतांध दांभिक ,टनाटनी, अभ्यासु , मुंबैकर चाकरमाने , आणि प्रापंचिक सांसारिक आहेत , इतर ओळखीचे मिपाकर लोकही ज्येष्ठ नागरिक किंव्वा काथ्याकुटविशारद किंवा अध्यात्मिक तत्वज्ञ किंव्वा डु आयडी किंव्वा फिलॉसोफर्स वगैरे आहेत .... पण तरीही वचने किं दरिद्रता म्हणुन आपले विचारत आहे
यंदा गोव्याला सनबर्न- २०१५ फेस्टीवलला जायचे का ?
सनबर्न हा ख्रिसमस नंतर होणारा एक एलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टीव्हल आहे जो की २००७ साला पासुन होत आहे .

श्रीगणेश लेखमाला ६ : कथा एका आयुर्वैद्याची (संवादमालिका)

लेखक प्रास यांनी बुधवार, 23/09/2015 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
काळ - वर्ष १९९२ (ट्रींग ट्रींग! ट्रींग ट्रींग!!) "हॅलो! नमस्कार!" "अरे मी अरुण बोलतोय. काय म्हणतायत चिरंजीव? काल बारावीचा रिझल्ट लागला ना?" "हो ना! रिझल्ट चांगला आहे पण नेहमीप्रमाणे अडनिडा आहे..." "अडनिडा? का रे? पास झालाय ना? किती टक्के मिळालेत?" "पास झालाय रे. टक्केही चांगलेच आहेत, पण मेडिकलची अॅडमिशन हुकतेय. त्यासाठी थोडे टक्के कमी पडतायत." "मग आता विचार काय आहे?" "तशी त्याला नाशिकच्या फार्मसी कॉलेजात अॅडमिशन मिळालीय. उद्या सकाळी तो आणि मी निघतोय नाशिकला जायला." "अच्छा, पण मला सांग, त्याला मेडिकलला जायचंय ना?" "त्याला जायचं असून काय उपयोग?

श्रीगणेश लेखमाला ५ : माझी पत्रकारिता

लेखक pradnya deshpande यांनी मंगळवार, 22/09/2015 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
माझी पत्रकारिता राष्ट्रीय वाहिनीवरील सलमा सुलतान, मराठी दूरदर्शनवरील प्रदीप भिडे, स्मिता तळवलकर, ज्योस्त्ना किरपेकर, नलिनी सिंग यांच्यानंतर ९०च्या दशकातील बरखा दत्तपर्यंत तमाम पत्रकारांचे आणि वृत्तनिवेदकांचे लहानपणापासून प्रचंड आकर्षण होते. ३१ डिसेंबरला दिल्ली दूरदर्शनवरून सादर होणारा 'अराऊंड द वर्ल्ड' कार्यक्रम असो वा साप्ताहिकी, प्रत्येक कार्यक्रम लहानपणापासून मनावर नकळत पत्रकारितेचे संस्कार घडवत होता.