Skip to main content

जीवनमान

श्रद्धाळु

लेखक आनंद कांबीकर यांनी गुरुवार, 22/10/2015 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
जे दिसतं, खरं असतं ते पटत नाही. जे अस्तित्वात नसतं नुसतं भासतं त्याच्यासाठी तंडायचं. इतिहासातल्या कथेपायी एक मेकायला तोडायचं. भाकर दुसरेच भाजतात आपण पेटुन राख व्हायचं. कोपर्यातल्या म्हतारीला कधी उठून तांब्याभर पानी नाही द्यायचं अण् झेंडे घेऊन रानोरानभटकायचं. 'तो' सर्वत्र आहे म्हणायचं वरतुन दगडापुढं रात्रंदिस रांग धरायचं. 'त्याला' ही हे पटत नसल पोट धरून 'तो' ही हसत असल. उपासातापासाने 'तेव' पावला असता तर रसत्यावरचा भिकारी रास्त्यात मावला नसता. आपण रक्ता-घामाच्ं टाकून पेटी भरतो आणि पुजारी गाड्यात फिरतो

झोपडपट्टीतले दिवस: भाग एक

लेखक तर्राट जोकर यांनी गुरुवार, 22/10/2015 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही तेव्हा झोपडपट्टीत राहायचो, रेल्वेच्या जागेत अतिक्रमण झालेली अठरापगड जातींच्या सरमिसळीची गोधडी. एक मोठा निळा फडका आणि बाकीचे छोटे छोटे रंगीबिरंगी ठिगळ असलेली. शहराच्या आजूबाजूच्या शेकडो गावांतून इथे दोन-चार, दोन-चार करत आलेली, मोलमजुरी, हमालीचं काम करणारी बिर्हाडं. आवसेला न चुकता डडंग-डंग...चिक...डडंड-डंग....डडंग-डंग...चिक...डडंड-डंग करत येणारा स्वच्छ कपड्यातला, अगदी वारकरी वाटणारा मांग.

से ह वा ग!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 21/10/2015 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
से ह वा ग! वीरेंदर सेहवाग! खराखुरा वीरोत्तम! क्रिकेटशी परिचित असलेल्यांना सेहवागबद्दल काहीही सांगायची गरज नाही. पण इथे सेहवाग एक क्रिकेटर म्हणून नव्हे तर एक अभिव्यक्ती म्हणून विचार करूया. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून त्रिशतक करणारा एकमेव फलंदाज (तेही दोन त्रिशतके!); अत्यंत जलद गतीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये फलंदाजी करणारा आणि आश्चर्यकारक प्रकारे सातत्य दाखवणारा (२००९- १० मध्ये शिखरावर असताना ५४ ही कसोटी सरासरी सलामीवीर म्हणून) आणि सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गांगुली, लक्ष्मण अशा ता-यांच्या समोरही स्वत:चा वेगळा प्रभाव निर्माण करणारा असा हा वीरू!

नवरात्र जल जागर : माळ नववी

लेखक नाखु यांनी बुधवार, 21/10/2015 09:19 या दिवशी प्रकाशित केले.

मायें...

लेखक आनंद कांबीकर यांनी मंगळवार, 20/10/2015 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण मनाला कुरताड़ते, तुझं आणवाणी पायाणं रानं धुंडाळनं तापत्या उन्हात, अड़मुठ्या पावसात अन् गारठ्यात मिळलं ते काम करणं आज ही जेव्हां ऑफिसला निघतो, अरशात दिसतेस तु तळपत्या ढेकाळात, ललाटावरच्या कुंकवासगट घामाच्या धारांत लतफत उभी. तुझ्या हातातलं खुरपं माझं काळीज कापतं. तु ढेकळं फोडायचीस मला चारान्याची पेन्सिल देण्यासाठी. दिवाळी ला ठिगळं लाउन नाटी नवी करायचीस खाकी चड्डी मात्र कोरी शिवायाचीस. लई भोगलस तू माझ्यासाठी अता तुला गावांत ठिवनार नई बस्ं झालं तुरःट्या म्होरं सारुण धुर फुंकनं ती फुंकनि चुलीत घालून, येणार आहे मी आज तुला हिकडं घेऊन.

नवरात्र जल जागर : माळ आठवी

लेखक नाखु यांनी मंगळवार, 20/10/2015 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== नव रात्र जल जागर : माळ पहिली... माळ दुसरी... माळ तिसरी... माळ चवथी... माळ पाचवी... माळ सहावी... माळ सातवी... माळ आठवी...

सत्य घटना

लेखक आनंद कांबीकर यांनी सोमवार, 19/10/2015 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
सिंहगड ने पुण्यातुन निघालो.नेहमी प्रमाणे ट्रेन तुडुंब भरलेली. दरवाज्या जवळच्या पैसेज मधे श्वास घेत उभा होतो. समोर एक मुलगा,साधारणता विशितला, स्वताच्याच् बॅग वर बसला होता. खेड्यातला असावा आणि मुंबईला कुठेतरी कामाला असावा. त्याच्या जवळ तळहातात मावनार नाही असा फ़ोन होता. तसा तो काहीखुप महागडा वगैरे नव्हता. म्हणजे चीन च्ं मॉडल असावं. लोनावला क्रॉस केल्यावर एक विक्रेता आला. त्यामुलाने मोबाइल साठी स्क्रीन गार्ड विकत घेतले. विक्रेता ९० ला वगैरे म्हणतहोता पन घासाघिस करुण त्याने ते ७० ला घेतले. आपले अगोदरचे काढून फेकून दिले. नविन मधे ७० ला तिन मिळाले होते. एक घेतले फ़ोन वर बसवले.

नवरात्र जल जागर : माळ सातवी

लेखक नाखु यांनी सोमवार, 19/10/2015 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== नव रात्र जल जागर : माळ पहिली... माळ दुसरी... माळ तिसरी... माळ चवथी... माळ पाचवी... माळ सहावी... माळ सातवी...

शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ?

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 19/10/2015 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, नुक्ताच वयाच्या पासष्ठाव्या वर्षात प्रवेश करता झालो. खूप पूर्वी होतो, तसा पुन्हा आता मी एकदम फिट आणि उत्साही झालेलो आहे. गेली पंधरा-वीस वर्षे मात्र मी असा नव्हतो. यासाठी मी कोणताही औषधोपचार वा खास व्यायाम केलेला नाही. फक्त आहारात बदल केल्याने हे सर्व कसे घडून आले, हे मी या लेखात सांगतो आहे. १. आरोग्यातून अनारोग्याकडे वाटचाल : पंचविशी - तिशीत सडपातळ आणि उत्साह- ऊर्जेने भरलेला मी पुढे चाळीशी-पन्नाशीत हळूहळू स्थूल, आळशी, निरुत्साही कसा होत गेलो, हे कळलेही नाही. अपचन, सुटलेले पोट, वाढलेले वजन, प्रमाणाबाहेर कोलेस्टरोल, यातून आता आपली सुटका नाही या विचाराने आणखीनच नैराश्य येऊ लागले.