Skip to main content

हे ठिकाण

मी पाहिलेले मयत

लेखक आंबोळी यांनी मंगळवार, 20/05/2008 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण ७-८ वर्षापूर्वीची कथा. आषाढातला रविवार. पाउस धो धो कोसळत होता. दुपारची जेवणे होउन जरा पडापड होतेय तेवढ्यात फोन वाजला. गावाकडे चुलत आजी वारल्याची बातमी आली. सगळी आवराआवर करुन आम्ही घरातले सगळे २० मैलावर आसलेल्या गावी निघालो. गावाकडचा आमचा दुमजली वाडा एकदम टिपिकल आहे. दगडी पायर्‍या. दींडी दरवाजा , तटबंदी,पायर्‍यांना लागुन डाव्याबाजुला दगडी कट्टा. पायर्‍यांच्या उजव्या बाजुला मोकळे वावर. तिथे म्हशींचे गोठे. गोबरग्यासची टाकी. दरवाज्यातून आत गेले की मोठे अंगण. खालचा सोपा, वरचा सोपा, माजघर, स्वयंपाकघर. ७-७ फूटी मातीच्या भिंती. भिंतीतून वर जायला जिने. मागच्याबाजुला २ एकराचे परस.

मिपा, पुणे कट्टा...अचानक!!!

लेखक धमाल मुलगा यांनी शुक्रवार, 25/04/2008 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
|| ॐ मिसळाय नमः|| ॐ मिसळपावाय नमः|| ॐ वाडेश्वरी मिसळपावाय नमः||
मंडळी, तुम्हा सर्वांना २२ मार्च रोजी झालेला पुणे कट्ट्याचा कार्यक्रम आठवत असेलच, नाही का? ज्यांना येणं जमलं त्यांना तर नक्कीच.

माझा ताटवा...

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 25/04/2008 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, बुधवारी पहाटेच आमचे आगमन आमच्या माहेरी म्हणजे करवीर नगरीत झाले. पहाटे ३.३० ला आम्ही आमच्या मुक्कामी दाखल झालो. घरी पोहोचताच आईने आमच्यावरून्(मी आणि माझा छोटा) भाकर तुकडा ओवाळून टाकला आणि आम्हाला घरांत घेतलं. आल्या आल्या घरातल्या लोकांबरोबरच कुत्री, मांजरी यांच्याशीही गाठीभेटी झाल्या आणि त्यांच्या मूक मायेनं मन खरंच भरून आलं. सगळ्यांसाठी आणलेल्या वस्तू बॅगेतून काढून दिल्या.. ..माझी झोप तर उडालीच होती त्यामुळे घरच्यांना (खरंतर आईलाच) झोपू देणार नाही असं सांगून टाकलं. आणि मग इथे येण्याच्या आधी काय काय धमाल चालू होती माझी.. रेडीओवर काय काय घोळ घालते आहे.. आजारी कशी पडले..

औरंगझेब - एक (बर)बादशहा !

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 23/04/2008 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्ता-रविवार दिनांक ०७-जानेवारी'०७ : मुखपृष्ठावरील बातमी : "औरंगजेबाच्या मॄत्यूला फेब्रुवारीत ३०० वर्षे पूर्ण - भूषण देशमुख-नगर" वरील लेख वाचनात आला आणि मन विषण्ण झाले ! लोकसत्ता सारख्या प्रथितयश वॄत्तपत्राने असा लेख पहिल्या पानावर द्यावा याचे आश्चर्य किंबहुना खेद वाटला !

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग ३ ... इव्हेंट मॆनेजर व्हा

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 23/04/2008 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल लोकांकडे पैसा खुळखुळायला लागला आहे आणि कला, क्रीडा क्षेत्राला बरे दिवस यायला लागले आहेत..गल्लोगल्ली निघालेले नृत्य वर्ग, वाद्यवृंद, नाट्यसंस्था , मॊडेलिंग एजन्सीज यातून नक्कलवाले अभिनेते, किंचित गायक, अर्धेमुर्धे नर्तक, मॊडेल तयार होत आहेत पण या सार्‍यांची तक्रार एकच आहे की व्यासपीठ उपलब्ध होत नाहीये.....शिवाय काही छंदवाली मंडळी आहेत, काही व्यावसायिक मंडळी आहेत , त्यांना त्यांच्या व्यावसायिक कलेचे प्रदर्शन मांडायला व्यासपीठ नाहीये...