Skip to main content

हे ठिकाण

सखाराम गटणेंचे हर्दिक अभिनंदन व नवीन खरडफळ्यास अनेकोत्तम शुभेच्छा! :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 25/09/2008 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, मिपाचे एक सन्माननीय सदस्य सखाराम गटणे यांनी स्वत:चा खरडफळा सुरू केला आहे त्याबद्दल मी समस्त मिपाकरांतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो व नवीन खरडफळ्यास अनेकोत्तम शुभेच्छा देतो! हा नवीन खरडफळा सुरू करून गटण्यांनी एक बंडखोरीचे व धाडसी पाऊल उचलले आहे असेच म्हणावेसे वाटते. आणि म्हणूनच गटण्यांचे मला व्यक्तिश: विशेष कौतुक वाटते. कारण मीही एक बंडखोरच मनुष्य आहे आणि मिपाचा जन्मदेखील बंडाळीतूनच झाला आहे! असो, नवीन खरडफळ्यास पुनश्च एकदा शुभेच्छा! :) तात्या.

बाप्पांची आवडती जास्वंद (प्रकाशचित्रे)

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 07/09/2008 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
गौरी-गणपतीचे दिवस आहेत, बाप्पांच्या भक्तित महाराष्ट्र रंगलाय, सर्वत्र गणेशोस्तवाचे वातावरण आहे त्यानिमित्त गणपतीबाप्पाला प्रिय अशा जास्वंदीची ही काही प्रकाशचित्रे.

मिपाचा प्रथम वर्धापन दिन आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा...!

लेखक सरपंच यांनी बुधवार, 03/09/2008 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, समस्त मिपाकरांना मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आणि गणेशोत्सवानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा! केवळ अन् केवळ मायबाप मिपाकरांच्या सहकार्यामुळेच मिपाला गेल्या वर्षभराची वाटचाल करता आली. गेल्या वर्षभरात जे काही चांगलं झालं असेल, उत्तम झालं असेल ते सर्व मिपाकरांमुळेच झालेलं आहे आणि जे काही चुकलं असेल त्याकरता मी स्वत: जबाबदार आहे... या पुढेही मिपाकर सभासदांचा स्नेहाशीर्वाद मिपाच्या डोक्यावर अखंड राहो एवढीच श्री गजाननाचरणी प्रार्थना..! गणपतीबाप्पाची तुम्हाआम्हा सर्वांवर नेहमीच कृपादृष्टी राहो, हीच शुभकामना...! आपला, (कृतज्ञ) तात्या अभ्यंकर. मिपाचे श्रद्धास्थान - लालबागचा राजा.

आमची मुंबई

लेखक वृषाली यांनी रविवार, 31/08/2008 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमची मुंबई असे शहर जेथे सारे काही शक्य आहे खासकरुन अशक्य. येथे carbon-dioxide हा oxygen पेक्क्षा जास्त आहे. येथे रस्त्यां नाच कचरापेटी म्हणुन गनले जात आहे. येथे मनुष्य गोळी घेतल्या खेरीज रात्री झोपु शकत नाही. येथे दुरध्वनीचे बिल माणसाला जगू देत नाही. येथे प्रत्येकजण स्वत:ला star समजत आहे. येथे सायकल सूद्धा कार पे क्षा जलद गतीने धावत आहे. येथे sky-scrapers मान उंचावून slum कडे पाहत आहेत. येथे पावसाळ्याचे आगमन होताच घरे कोसळत आहेत. येथे मनुष्य पहिल्यांदा कॄती करत आहे आणि मग विचार क

निर्धार

लेखक सर्वसाक्षी यांनी शनिवार, 30/08/2008 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
चीनचा दौरा संपत आलाय. उद्या घरी परतणार. या दौर्‍यात नेहेमीप्रमाणे चावज्झौ होतेच. चावज्झाउ गेस्ट हॉटेल म्हणजेच ईंग बिंगवान ला उतरलो होतो. दुसर्‍या दिवशी सकाळी साडे आठ ला नाश्त्याला मी आणि हुंग यान भेटणार होतो. सकाळी लवकतच जाग आली. आवरले आणि आवारात फिरायला निघालो. अचानक चार वर्षांपूर्वीच्या प्रसंगाची आठवण झाली. मी असाच कामानिमित्त आलो होतो. बरोबर माझा एक दाक्षिणात्य सहकारी होता, आपण त्याला रामू म्हणुया. दिवसभराचे काम संपले. साडेसातच्या सुमारास हॉटेलवर परत आलो. सोडायला आलेल्या मंडळींनी विचारणा केली की आता इथेच जेवुन झोपणार की जरा फिरायला जाउया? वा! आणखी काये हवे?

हू एम आय!

लेखक प्राजु यांनी बुधवार, 20/08/2008 02:52 या दिवशी प्रकाशित केले.
"चांगला धुतला त्या शोएब ला धोनी ने" असे उद्गार बर्‍याच वेळेला ऐकायला वाचायला मिळतात. इथे हे उद्गार एक भारतीय एका पकिस्तानी बद्दल बोलत असतो. कित्येक वेळेला सहज गप्पांमधून जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय सिमा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा पाकिस्तान बद्दल वाईटच बोललं जातं. पाकिस्तानातून होणारि घुसखोरी, मुशरर्फ सरकारचा ओसामाबीन लादेन ला असणारा पाठींबा, दाऊद इब्राहिम ला पाकिस्तानात राहण्यासाठी आश्रय देण्याच्या बातम्या यांनी भारतीय मनात पाकिस्ताना बद्दल एक अढी निर्माण झाली आहे. भारतीय सामान्य जनता ही पाक सामान्य जनतेचा विलक्षण तिरस्कार करते.

..

लेखक प्रियाली यांनी मंगळवार, 19/08/2008 07:01 या दिवशी प्रकाशित केले.
..