मिपा, पुणे कट्टा...अचानक!!!
लेखनप्रकार

|| ॐ मिसळाय नमः|| ॐ मिसळपावाय नमः|| ॐ वाडेश्वरी मिसळपावाय नमः||
मंडळी,
तुम्हा सर्वांना २२ मार्च रोजी झालेला पुणे कट्ट्याचा कार्यक्रम आठवत असेलच, नाही का?
ज्यांना येणं जमलं त्यांना तर नक्कीच. ज्यांना नाही जमलं त्यांना आपल्या बखरनवीस विजुभाऊ कलमदानेंच्या बखरीनं आपण काय चुकवलं ह्याची चांगलीच माहिती झाली!
इथं, मिपावर लिहिणारे काही तरल, काही वैचारिक, काही कवीमनाचे, काही उत्स्फुर्त, तर काही निव्वळ दंगेखोर नग एकमेकांस प्रत्यक्षात भेटले, चार गप्पा केल्या (आणि काही-काही उतमात घातला..) ह्याचं साग्रसंगीत वर्णन वाचून आणि ते वाचण्यापुर्वीही अशा अफलातून 'नगोत्तमांना' भेटण्याची मनिषा कित्येकांच्या ठायी आहे. त्यातलीच एक आमची प्राजुताई :-)
प्राजुताईच्या भारताभेटीमध्ये आणि कट्ट्याच्या तारखेमध्ये फक्त दोन आठवड्यांचा घोळ झाला होता. तिला बिचारीला इतकी इच्छा असुनही कट्ट्याला येणं जमलं नव्हतं.
मग तिने ठरवलं...हे असले निरुद्योगी धंदे कोण करतं? त्याला गाठायचा आणि जमतील तितक्यांना भेटायचं.
आता, आधिच्या कट्ट्याच्या जाहिरातबाजीमुळे "भडकमकरर्स क्लासेसच्या" "इव्हेंट मॅनेजमेंट" चा ऍडव्हान्स कोर्स करणार्या 'धमाल मुलगा' ह्याचं नाव तसं मिपागावात आणि ग्रामपंचायतीमध्ये झालं होतं. अनायसे प्राजुताईला एक इव्हेंट म्यानिजर मिळाला. तीने छानपैकी आधीच धमाल्याला फोन-बीन करुन त्याची 'ऍव्हेलॅबिलिटी' पाहिली. हो! आधीच्या 'भर उन्हाळ्यातल्या सुखद पावसाळी' इव्हेंट असाईनमेंटमुळे धमाल्याला बर्यापैकी कामं मिळायला लागली आहेत आता :-)
धमाल्यानेही 'चला, अजुन एक गिर्हाइक मिळालं आणि एक इव्हेंट पदरी पडलं' असा विचार करुन होकार भरला.
काही जुजबी फोनाफोनी करुन धमाल्याने मंडळींना गोळा करायला सुरुवातही केली.
ह्याचा घटनाक्रम काहीसा असा:
शुक्रवार तारिख.१८ एप्रिल: आपले गज़लसम्राट चित्तरशेठ, आणि विडंबन बादशहा केशसुमार ह्यांनी आयोजित केलेला गज़लवाचनाचा कार्यक्रम. स्थळ: भरत नाट्य मंदीर, वेळः रात्रौ १५:४५ ते ०१:०० दरम्यान.
केशवसुमारांचे इव्हेंट मॅनेजमेंटचे कौशल्य पाहून धमाल्याने त्यांच्या खांद्यावर दिली बंदूक ठेऊन.म्हणाला, "शेठ तुम्ही कार्यकारिणीचे अध्यक्ष व्हा, आणि मी मुख्य कार्यकारी अधिकारी."
केशवसुमारः अरे, पण आपण भेटणार कुठे? काटा किर्रर्र... ला जाऊया?
धमाल्या: (डोळे उर्ध्वदिशेला लाऊन, झुरका घेत) च्छ्या: तिथं मांजराच्या पिल्लालातरी बसायला जागा असते का?
के.सु.: मग? टिळकरोडचं संजीवनी चालेल? तिथे नसते गर्दी!
धमाल्या: मिसळ चांगली मिळते का?
के.सु.: आयला, असं करु, काटा किर्रर्र मधून पार्सल उचलू आणि पेठकरकाकांच्या घरीच जाऊ!
धमाल्या: हॅ: कोणाच्या घरी कसं जायचं असं? पोरांना लाजल्यागत होइल ना!
असं करता करता, पक्कं काहीच होइना! मग 'देखते है कल, जो होगा सो होगा' असं म्हणून ही मिटिंग मोडली. त्यानंतर रात्री एक-दिडच्या सुमारास धम्याला साक्षात्कार झाला की आज दिवसभरात आपण काहीच खाल्लेलं नाही..मग काय..सगळ्या गाड्या सुसाट 'साईबा' ला. मस्त कोल्हापुरी थाळी चापून घरी पोहोचेस्तोवर ४! धम्या 'घोडे बेचकर' छबो करुन पडला.
शनिवार, तारिख १९ एप्रिल, स्थळः धम्याचं घर.
पहाटे पहाटे ११ वाजता जेव्हा तो जागा झाला तेव्हा मोबाइलचं मुखदर्शन करायच्या सवयीनं त्याने मोबाइल घेतला आणि जाग्यावर उडालाच. टोटलमध्ये ११ मिस्ड कॉल्स...जगदंब...
झोप बीप सगळी गायब. पटकन प्राजुताईला फोन लावला...
धम्या: हॅलो प्राजुताई...
प्राजुताई: अरे...आहेस कुठे? किती फोन करायचे तुला?
धम्या: (ओशाळवाणं) झोपलो होतो.
प्राजुताई: लाज वाटते का? वाजले किती पाहिलंस? काय ठरलं? कधी, कुठे भेटायचं?
धम्या: फक्त १५ मिनिटं दे...सगळं सांगतो.
लगेच धम्यानं केसुशेठला फोन लावला...
धम्या: सायबा, कुठे जमायचं? डेक्कन बिक्कन बघा.. प्राजुताईला फार लांब येणं जमायचं नाही.
केसु: वाडेश्वर फायनल करुन टाका!
धम्या: बेष्ट! पोहोचा तिथे १२-१२:३० पर्यंत...बाकीच्यांना तोपर्यंत गोळा करुन आणतो :-)
मग रिवाजाप्रमाणे फोनाफोनी करुन पेठकर काका, इनोबा,नीलकांत, विवेकवि आणि छत्रपती ह्यांना निमंत्रण धाडली.
कसंबसं आवरुन १२:२५-१२:३० दरम्यान वाडेश्वरी पोचला. तिथे आधीच केसुशेठ, प्राजुताई, विवेकवि आणि छत्रपती हजर होते. थोड्याच वेळात इनोबा आपल्या मिसळपाव डाट काम च्या विश्वकर्मा नीलकांत ह्यांना घेऊन वाडेश्वरी थडकले!
कोरम तर भरला होता, फक्त कमी होती ती बल्लवाचार्य पेठकर काका ह्यांची!
काही मिनिटांत धमाल्याच्या मोबायलावर पेठकरकाकांचा फोन आला...अंदाजानंच धम्यानं गेटाकडे पाहिलं आणि नजर भिरभिरवत शोधणार्या भारदस्त पेठकर काकांना बरोब्बर ओळखलं.
काकाही आले....येता येता 'वाहतुक नियमन' नावाखाली हैदोस घालणार्या दोन शिपुरड्यांना हग्या दमही भरुन आले. नाही म्हणलं तरी धम्याची चिवचिव काकांना बघून आणि हा किस्सा ऐकून काही वेळ बंद पडली.
आता कट्टा रंगायला लागला होता.हळूहळू एकेक विषय निघत होते...पेठकर काकांनी मधून अधून टाकलेल्या कोट्यांमुळे खसखस पिकत होती..हे बघून धम्याचीही भिती जरा ओसरली..तोही चालू झाला :-)
जिच्यासाठी केला होता हा अट्टाहास, ती प्राजुताई, तीही मस्त गप्पा टप्पा करत होती...काय बडबडी आहे आमची प्राजुताई...मजा येते बॉ! जोडीला तिने अमेरिकेतून आणलेली चाकलिटं हाणणंही चालू होतं.
येणारे डायलॉग्ज शांतपणे ऐकून त्यावर मधूनच एखादा बाऊंसर टाकण्याचं महत्कार्य केसुशेठ नेहमीप्रमाणेच निभावत होते.
असा सगळा सुखसंवाद चालू असताना आत्मानंद आश्रमाचे संस्थापक आपले तात्याबा महाराज कट्टाभेटीसाठी मोबाइलवरुन सुक्ष्मरुपाने अवतिर्ण जाहले. सर्वांची ख्यालीखुशाली विचारुन तात्याबा अचानक अंतर्धान पावले.
ह्या सगळ्यामध्ये हळूहळू सगळ्यांना पोटातल्या कावळ्यांची कावकाव ऐकू येऊ लागली होती. मिसळपाव धर्माला जागून सगळ्यांनी मिसळपावच खाण्याचे ठरवले. पेठकरकाकांना सध्या मसालेदार चालत नसल्याने त्यांनी 'सॉल्टेड लस्सी' मागवली.
"ही सॉल्टेड लस्सी अतिशय आंबटढॅण असुन बहुधा करणारा नुकताच दांडीयात्रेहून आला असावा अशी शंका घेण्याइतकी लस्सी सॉल्टेड आहे" असा काकांचा अभिप्राय ऐकल्यावर मूढ धम्याच्या बथ्थड तोंडाकडे बघून काकांनी स्पष्टीकरण दिले की 'बहुतेक स्वीट लस्सी मार्केट करायची ही वाडेश्वरी युक्ति असावी"
तोपर्यंत मिसळही टेबलावर पोचली होती..आणि थंड अमेरिकेतून गरम भारतात आणलेल्या वितळलेल्या चॉकलेट्सकडे करुण नजरेने पाहणार्या धम्याच्या डोक्यात किडा वळवळला..इतका वेळ झाला पण आपण प्राजुताईला छळलेलंच नाहीय्ये !!!!
मग काय,
"प्राजुताईच्या प्लेटमधल्या मिसळीवर हे चॉकलेट आपण पसरवू म्हणजे ते छान लागेल.." असं धमाल्या म्हणाल्याबरोबर प्राजुताईला अगदी म्हणजे अगदीच ईईईईईईई...असं झालं....
पेठकरकाकांनीही धम्याला दुजोरा देत "चॉकलेट मिसळ" असं नाव सुचवलं आणि मिपाच्या पा.कृ.मध्ये रेशिपी टाकायची जबाबदारी घेतली!
ह्यावर तर कसंनुसं झालेला प्राजुताईचा चेहरा अग्गदी फोटोलायक होता....मठ्ठ धम्या...हा फोटो घेतलाच नाही!
छत्रपति नेहमीप्रमाणे खाण्यात दंग, तर विवेकवि आपल्याच विश्वात बुडालेले...
इनोबांना भर कामातून ओढून आणलेलं त्यामुळे ते त्या विचारात आणि विश्वकर्मा नीलकांत सगळ्यांचं पाणी जोखत बसलेले...
शेवटी खाऊन झाल्यावर नाईलाजाने तिथून निघणं क्रमप्राप्त होतं.
पुन्हा लवकरच भेटायचं ठरवून सगळ्यांनी एकमेकांची रजा घेतली.
असा हा कट्टा अचानक ठरुन अचानक पार पडला.
डावीकडूनः विवेकवि,केशवसुमार,प्राजु,प्रभाकर पेठकर,छत्रपति,नीलकांत,इनोबा म्हणे.
धमाल मुलगा,छत्रपति,नीलकांत,इनोबा म्हणे.
वाचने
16278
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
भारी...
In reply to भारी... by स्वाती राजेश
हेच
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
शाब्बास!
वाडेश्वर मध्ये मिसळ !
वाह!!
वा
अरे वा..
;-)
In reply to ;-) by धमाल मुलगा
स्पष्टीकरण हवे आहे.
मस्त! :)
मस्त रे दोस्तांनो :)
In reply to मस्त रे दोस्तांनो :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मि. धमाल
In reply to मस्त रे दोस्तांनो :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त !!!!!
वा वा
:)
सूनबाई?
In reply to सूनबाई? by इनोबा म्हणे
:-)))) नाही!
अपूर्ण....
अवांतर
वा! मस्त कट्टा झालेला दिसतोय!!
In reply to वा! मस्त कट्टा झालेला दिसतोय!! by पिवळा डांबिस
सहमत..
In reply to वा! मस्त कट्टा झालेला दिसतोय!! by पिवळा डांबिस
कोल्हापूरची रम??
In reply to कोल्हापूरची रम?? by कोलबेर
फोर्ट नॉक्स
In reply to फोर्ट नॉक्स by नारदाचार्य
वा!
In reply to कोल्हापूरची रम?? by कोलबेर
हा, हा, हा!!
In reply to हा, हा, हा!! by पिवळा डांबिस
छ्या...
In reply to वा! मस्त कट्टा झालेला दिसतोय!! by पिवळा डांबिस
काका
In reply to काका by इनोबा म्हणे
असं होय!
In reply to असं होय! by पिवळा डांबिस
काकानू,
मजा
वा वा वा
ह्म्म
In reply to ह्म्म by वरदा
मिसळ
चान्स हुकला
In reply to चान्स हुकला by डॉ.प्रसाद दाढे
नक्की नक्की !!!
In reply to नक्की नक्की !!! by धमाल मुलगा
धमाल्या..
चालू द्या
मिपा पुणे कट्टा
मज्जा चालू
मजा करा लेको....
In reply to मजा करा लेको.... by ब्रिटिश टिंग्या
वा!
धमूचा फोटो.
काय बोलायचे बॉ ???