गोखूळवाडी बुद्रूकचा गंपू-भाग दूसरा
लेखनप्रकार
गोखूळवाडी बुद्रूकचा गंपू-भाग पहिला
एक दिवशी नंदू माने तालूक्याला गेला असताना त्याची वासूअण्णाशी भेट झाली. बर्याच दिवसांनी भेट झाल्यामूळे दोघांनी एकमेकांची ख्याली खुशाली विचारली.बोलता बोलता वासूने नंदूच्या मुलाची (गंपूची) चौकशी केली आणि पोरगं चांगल्या घरात जाऊन पडल्याचा त्याला मनोमन आनंद झाला.कणसेच्या भितीने वासूने आपल्या पहिल्या पत्नीच्या मुलाला-बाळूला आपल्याजवळ ठेवून घ्यायची नंदूला विनंती केली. बाळू बेकार होता पण तालमीत तयार झालेला बाळु अंगाने चांगलाच भरदार होता. त्याची कामात काहीतरी मदत होईल असा विचार करुन त्याने वासूला होकार दिला आणि बाळूला आपल्या घरी घेऊन आला. 'ही ब्याद आपल्या घरी कशाला' म्हणून नंदूची बायको त्याच्याशी भांडायला लागली,पण गंपूच्या आग्रहाखातर त्यांनी बाळूला आपल्या घरी ठेवून घेतले.
हळूहळू गंपू आणि बाळूची चांगलीच भट्टी जमली.गंपूच्या दिवसभर चालणार्या उद्योगांमध्ये बाळू त्याला हातभार लावू लागला. बाळू खोटं बोलण्यात फारच पटाईत होता.विशेष म्हणजे आपल्या शहरातल्या गमती-जमतींच्या नावाखाली तो त्याच-त्याच गोष्टी तिखट मीठ लावून सांगत असे. त्याच्या या खोट्या कथांना वैतागून काही लोक त्याची चेष्टा करु लागले, बाळूने त्यातील एक्-दोन जणांचे दात(त्यांच्याच) घशात घातले तेव्हापासून बाळूच्या कथा 'दंतकथा' म्हणून गोखूळवाडीत प्रसिद्ध झाल्या.आणि बाळूचा बाळासाहेब झाला.(खोट्या कथांना 'दंतकथा' म्हणण्याचा प्रघात ह्याच काळात पडला असावा.-इति भाषातज्ञ) काही दिवसांनी गंपूने बाळूच्या मदतीने गावात व्यायामशाळा सुरु केली.त्याचे नाव त्यांनी 'गोखूळ वस्ताद तालिम' असे ठेवले.
दिवसें दिवस गंपूची प्रतिष्ठा वाढत होती.त्याचा मित्रपरीवार आणि कार्यकर्ता वर्ग वाढत होता. या ना त्या कारणाने गावात आणि तालूक्यात गंपूच्या नावाचे फलक झळकत होते. आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात म्हणून कुठल्यातरी मुद्द्यावर आंदोलन करणे गरजेचे आहे हे गंपूने ओळखले होते. गावाजवळच्याच हाय-वे वर इंदरसिंग नावाच्या पंजाब्याचा 'इंदर दा बार'नावाचा डान्सबार होता.या बारमधे बेकायदेशीररीत्या बारबालांचे नृत्य चालायचे. या मुद्द्याचा राजकीय फायदा उचलण्यासाठी गंपूने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार केली.पोलिसांना इंदरसिंगकडून चिरीमिरी मिळत असल्याने त्यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली.पण गंपूपुढे त्यांचे काही चालले नाही. वेगवेगळ्या 'न्यूज चॅनेल'मध्ये या आंदोलनाच्या बातम्या झळकवायची गंपूने खबरदारी घेतली. शेवटी खूपच बोंबाबोंब झाल्याने पोलिसांनी डान्सबारवर कारवाई केली. गंपूच्या तक्रारीमुळे बार बंद पडला.यामुळे इंदरसिंगने गंपूचा काटा काढायचे ठरवले. गंपूला मात्र या आंदोलनामुळे खूपच प्रसिद्धी मिळाली. वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये गंपूला आपल्या पक्षात खेचण्यासाठी चढाओढ सुरु झाली.
इकडे गोखूळवाडीत जत्रेच्या निमित्ताने धामधूम होती. गावातले सगळे रस्ते माणसांनी फूलून गेले होते.गंपू आणि मंडळीही त्यानिमिताने गावात फेरफटका मारायला निघाले होते.त्याचवेळी दबा धरुन बसलेल्या इंदरसिंग व त्याच्या भाडोत्री गुंडांनी गंपू आणि कंपूवर सोडा वॉटरच्या बाटल्यांनी हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामूळे गंपू आणि कंपूने शेजारच्या 'न्यू गोवर्धन अमृततुल्य' या हॉटेलात आश्रय घेतला. इंदरसिंग आणि त्याच्या गुंडांना सरळ सरळ प्रत्युत्तर देणे शक्य नसल्याने गंपूने गनिमी काव्याचा वापर करायचे ठरवले.हॉटेलाची दारे बंद करुन गंपू आणि कंपू तिथेच लपून बसला. अखेर गंपू बाहेर येत नाही हे पाहून इंदरसिंग आणि त्याचे गुंड तिथून निघून गेले. गंपूच्या या प्रसंगावधानाने 'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ' हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.(या प्रसंगात गंपूचा पळपुटेपणा दिसून येतो-काही टिकाकार)
इकडे गोखूळवाडीचा गंपू आणि बाळू ही वासूची पोरं असल्याची कणसे पाटलाला कुणकुण लागली आणि ज्योतिषाने दिलेली धोक्याची सूचना त्याच्या डोक्यात घुमू लागली.गंपूचे वाढते राजकीय वजन पाहता तो भविष्यात आपले राजकीय वर्चस्व धोक्यात आणु शकतो,याची कणसेला जाणिव झाली. गंपूचा झंझावात रोखण्यासाठी तो योजना आखू लागला. त्यासाठी त्याने आपल्या गटातील सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने 'माथेरान फेस्टीवल'चे आयोजन केले. या निमित्ताने त्याने वेगवेगळ्या मैदानी खेळांच्या स्पर्धा भरवल्या आणि कुस्ती लढतीचे गंपू आणि बाळूच्या 'गोखूळ वस्ताद तालमीला' आमंत्रण पाठवले.गंपूनेही आमंत्रण स्विकारले.
सकाळी -सकाळीच गंपू,बाळू आणि त्यांचे सहकारी व तालमीतील काही मोजकी पैलवान मंडळी माथेरानला निघण्यासाठी तयार झाले.त्यांना निरोप देण्यासाठी गावाच्या वेशीवर गावकरी जमा झाले.गंपूची शरीरयष्टी पाहता तो धड परत येईल की नाही या विचाराने गावातल्या पोरी व्याकूळ झाल्या.काही पोरी तर गंपूच्या विरहाच्या नुसत्या कल्पनेनेच रडू लागल्या.त्यांना जवळ घेऊन त्यांचे अशृ पुसावे अशी परोपकारी भावना गंपूच्या मनात तरळून गेली,पण सगळ्या गावासमोर हे शक्य नसल्याने आपल्या उदात्त विचारांना गंपूने मनातच दाबून टाकले.काही लोकांनी कुत्सितपणे गंपू आणि त्याच्या सहकार्यांवर टिका केली त्यावेळी गंपू आणि मंडळींनी त्या लोकांना बाजूला नेऊन 'नम्रपणे' आपला हेतू समजाऊन सांगीतला.तेव्हा त्यांचेही हृदयपरीवर्तन झाले व डोळ्यात अशृ दाटले. निरोप समारंभ आटपून गंपू आणि मंडळीने माथेरानच्या दिशेने कूच केले.
सबंध माथेरानातच फेस्टीवलच्या निमीत्ताने उत्साह संचारला होता. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला कमानी उभारल्या होत्या.ठिकठिकाणी कणसे पाटील आणि त्याच्या सहकार्यांच्या जय-जयकाराचे फलक लागले होते.गंपू माथेरानात पोचला असल्याची वर्दी कणसेला मिळाली आणि त्याने आपल्या खास लोकांना कामगिरीवर पाठवले.
गंपू प्रथमच मोठ्या शहरात आल्याने भारावून गेला होता.(गंपूचा स्त्रीलंपट स्वभाव पाहता,तो शहरातील पोरी पाहूनच भारावून गेला असावा-पुनश्च काही टिकाकार)गंपू आणि मंडळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला नजर मारत फेस्टीवल भरवल्या गेलेल्या मैदानाकडे चालू लागले. मैदानाच्या प्रवेशद्वारापाशी भव्य अशी कमान उभारली होती.कमानीच्या दोन्ही बाजूला हत्तीच्या दोन भव्य अशा प्रतिकृती उभारल्या होत्या.गंपू आणि मंडळी प्रवेशद्वारातून प्रवेश करणार तेवढ्यात त्यातला एका बाजूचा हत्ती धाडकन खाली कोसळला.प्रसंगावधान राखून गंपूने आधीच बाजूला उडी मारल्यामूळे तो थोडक्यात बचावला.या हलगर्जीपणाबद्दल व्यवस्थापनाला जाब विचारायचाच असा निश्चय करुन गंपू आणि त्याचे सहकारी मैदानात प्रवेश करते झाले.मैदानाच्या एका बाजूला मोठेसे व्यासपीठ मांडले होते.व्यासपीठावर कणसे आणि त्याचे सहकारी बसले होते.व्यासपिठाच्या समोरच कुस्तीचा मंच होता.गंपूला समोर पाहताच कणसेला घाम फूटला,ज्योतिशाचे शब्द त्याला पुन्हा पुन्हा आठवू लागले.त्याने बाजूलाच असलेल्या आपल्या साथीदारांना इशारा केला.गंपू आणि मंडळी जशी कुस्तीच्या मैदानाजवळ पोचली तशा दहा -बारा पैलवानांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.गंपू आणि त्याच्या सहकार्यांचे धाबे दणाणले.पण आधीच्या कुस्त्या बघून चेकाळलेले प्रेक्षक स्वतःला पैलवान स्मजत त्यांच्या मदतीला धावून आले.त्यामूळे गंपू आणि त्याचे सहकारी बचावले. या प्रकारामुळे संतापलेला गंपू कणसेकडे तक्रार करण्यासाठी तरातरा व्यासपीठाच्या दिशेने चालू लागला.गंपूला आपल्या दिशेने येताना पाहून आधीच भयभीत झालेला कणसे डोळे फिरवत खुर्चीवरुन खाली कोसळला आणि गतप्राण झाला. शवविच्छेदनानंतर हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने त्याचे निधन झाल्याचे जाहीर केले गेले.
क्रमशः
वाचने
6976
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
मजा आली वाचुन
अरे वा..
ख वा ट
इन्या मस्त
हे, झक्कास इन्या!!
In reply to हे, झक्कास इन्या!! by पिवळा डांबिस
पिडाकाका,
In reply to पिडाकाका, by ३_१४ विक्षिप्त अदिती
आयला, ही काय गंमत आहे?
In reply to आयला, ही काय गंमत आहे? by पिवळा डांबिस
>> हि काय
In reply to हे, झक्कास इन्या!! by पिवळा डांबिस
पिडां इन फुल फ्लो
वा, वा!!
मस्त!
धन्यवाद!
गोवर्धन, नम्रपणे
आनदो भाय
बाळूने
In reply to बाळूने by विजुभाऊ
निषेध
क्या बात