Skip to main content

हे ठिकाण

मैत्री

लेखक अनंतसागर यांनी शुक्रवार, 04/07/2008 22:03 या दिवशी प्रकाशित केले.

गवळ्याने दुधात पाणी घातलं होतं,
ते दुध माईनं चुलीवर ठेवलं होतं.
इकडे पातेल्यात मात्र निराळीच काहानी होती,
दुध आणि पाण्याची मैत्री झाली होती.

पातेल्याची गर्मी वाढू लागली,
तशी दुधातल्या पाण्याची वाफ होऊ लागली.
हे पाहून दुध दु:खी झाला,
त्याने पाण्याला अटकाव केला.

सायीचा थर त्याने दिला ठेऊन,
पाणी बिचारं त्यात बसलं अड्कून.
इच्छा असताना त्याला दुधात राहता येईना,
सायीच्या भिंतीने बाहेर जाता येईना.

सस्नेह निमंत्रण.

लेखक धमाल मुलगा यांनी गुरुवार, 26/06/2008 10:44 या दिवशी प्रकाशित केले.

प्रति,
समस्त मिसळपाव.कॉम कुटुंबीय.

सप्रेम नमस्कार वि.वि.

मंडळी,
येत्या जुलै महिन्याच्या ८ तारखेस (आषाढ शु.६, शके १९२९) तुमचा मित्र "धमाल मुलगा" विवाहबध्द होत आहे.
वैयक्तिकरित्या सर्वांनाच व्यक्तिशः भेटून निमंत्रण पत्रिका देणे केवळ अशक्य असल्याकारणे, सोबत पत्रिकेचे स्कॅन केलेले चित्र इथे चढवत आहे.
कृपया हेच आग्रहाचे निमंत्रण समजुन ह्या विवाहसोहळ्यास उपस्थित राहून आम्हांस आपले शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती.

आपलाच,
धमाल उर्फ कैवल्य.

लूज कंट्रोल...दीर्घांक ... एक परीक्षण / अनुभव

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 18/06/2008 17:25 या दिवशी प्रकाशित केले.

लूज कंट्रोल...

२००५ च्या सुदर्शन रंगमंचावर महाराष्ट्र कल्चरल सेंटर आयोजित दीर्घांक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारं नाटक..

लेखक : हेमंत ढोमे
दिग्दर्शक : निपुण धर्माधिकारी
कलाकार : अमेय वाघ,हेमंत ढोमे,निपुण धर्माधिकारी, सुषमा देशपांडे
निर्मिती : समन्वय पुणे.

या नाटकाचा दीर्घांक मी जुलै २००६ मध्ये पाहिला. त्याचे नंतर दोन अंकी नाटक आले, पण ते जास्त काळ टिकले नाही. ते नाटक मी पाहिले नाही.मी आत्ता बोलणार आहे ते दीर्घांकाविषयी..

मि.पा. कट्ट, पुणे दिनांक - १२ जुन २००८

लेखक मनिष यांनी शुक्रवार, 13/06/2008 13:09 या दिवशी प्रकाशित केले.

सविस्तर माहिती (कोणी लिहिली तर) येईलच नंतर, हे आपलं 'सिनॉप्सिस' :)

स्थळ : हॉटेल अभिषेक आणि हॉटेल पुरेपूर कोल्हापुर - दोन्ही एरंडवणे, मेहेंदळे गॅरेज जवळ (फु़कट पत्त्यावरून परत पुण्यालाशिव्या नकोत)

(सु) संवाद -

प्र. हॉटेल अभिषेक कुठे आहे?
उ. हॉटेल पुरेपूर कोल्हापुर समोर.
प्र. बरं, हे हॉटेल पुरेपूर कोल्हापुर कुठे आहे?
उ. हॉटेल अभिषेक समोर!
प्र. हम्म! दोन्ही कुठे आहेत?
उ. समोरासमोर! ;)

असो! हजेरी -

मीलनाची ओढ

लेखक काळा_पहाड यांनी गुरुवार, 12/06/2008 16:40 या दिवशी प्रकाशित केले.

ती त्याच्या वाटेकडे डोळे लावुन होती. वाट बघुन शिणली होती असे म्हणण्याइतका वेळ अजुन गेला नव्हता. मात्र त्याच्या येण्याची वेळ जवळ आली तशी ती सवयीने त्याची वाट बघू लागली. मीलनाची स्वप्ने रंगवू लागली. त्या मधुर स्वप्नांत असतानाही तिला चटके मात्र बसतच होते. रविराजाची नजर चुकवायची आजपर्यंत तिला कधीही हिंमत झाली नाही. वडिलांचा दराराच तसा होता. तापट , कडक आणि शीघ्रकोपी. त्यांच्यामोर कुणाचीच धडगत नसते. अशा वेळी तिला हमखास निशेची आठवण व्हायची. निशा आली की रविराज गायब होतात. किंबहुना रविराज दिसेनासे झाले की मगच निशा येते. निशा मायाळू आहे. ती आली की शांत, शितल वाटते.

बेळगावी मांडे

लेखक अजय जोशी यांनी सोमवार, 09/06/2008 13:05 या दिवशी प्रकाशित केले.

प्रथमच मी बेळगावात गेलो. एका खानावळीत (फारशी वळवळ नव्हती.तशी ती रिकामीच होती) गेलो.
बाके नव्हती. कसाबसा खाली बसलो. ओथंबलेला (चारी बाजूने) आचारी एकदम म्हणाला, "मांडेऽऽ".
मला कळेचना. नेमकी काय चूक झाली.
पुन्हा म्हणाला , "मांडेऽऽऽऽ".
"असं होय..", म्हणून मी मांडी घालून बसलो.
तो पुन्हा म्हणाला , "मांडेऽऽऽऽ ए ऽऽऽऽ".
मला वाटले बेळगावात सेल्फ सर्विस असावी. म्हणून मी स्वतःच उठून ताट-वाटी वगैरे घेतले.
तो पुन्हा म्हणाला , "मांडेऽऽऽऽ ए ऽऽऽऽ". यावेळी इतक्या जोरात म्हणाला की,
मी घाबरून काहीतरी अर्थ लावून ताट वगैरे सर्व मांडीवर ठेवले. (अर्थातच स्वतःच्या)

वटहुकूम...

लेखक आणिबाणीचा शासनकर्ता यांनी गुरुवार, 29/05/2008 18:35 या दिवशी प्रकाशित केले.

मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सभासदांना सप्रेम नमस्कार वि वि,

भाषाशास्त्र, भाषाशुद्धी, भाषेचा विकास, भाषेचे व्याकरण, शुद्धलेखन व त्याचे नियम, संस्कृतचा मराठी भाषेवर कसा प्रभाव आहे, इत्यादी विषयांवर मिसळपाव डॉट कॉम ह्या संकेतस्थळावर आजपासून लेख व प्रतिसादाच्या रुपात काहीही लिहिण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

मी पाहिलेले मयत

लेखक आंबोळी यांनी मंगळवार, 20/05/2008 19:40 या दिवशी प्रकाशित केले.

साधारण ७-८ वर्षापूर्वीची कथा. आषाढातला रविवार. पाउस धो धो कोसळत होता. दुपारची जेवणे होउन जरा पडापड होतेय तेवढ्यात फोन वाजला. गावाकडे चुलत आजी वारल्याची बातमी आली. सगळी आवराआवर करुन आम्ही घरातले सगळे २० मैलावर आसलेल्या गावी निघालो. गावाकडचा आमचा दुमजली वाडा एकदम टिपिकल आहे. दगडी पायर्‍या. दींडी दरवाजा , तटबंदी,पायर्‍यांना लागुन डाव्याबाजुला दगडी कट्टा. पायर्‍यांच्या उजव्या बाजुला मोकळे वावर. तिथे म्हशींचे गोठे. गोबरग्यासची टाकी. दरवाज्यातून आत गेले की मोठे अंगण. खालचा सोपा, वरचा सोपा, माजघर, स्वयंपाकघर. ७-७ फूटी मातीच्या भिंती. भिंतीतून वर जायला जिने.