मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ८)
लेखनविषय:
मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ७)
भावानुवादाच्या आधीच्या भागांचे दुवे सातव्या भागात मिळतील.
--------------------------------------------------
सातव्या भागात आपण सुंदर रुपकांनी सजवलेला मधुशालेचा अवतार बघितलाच आहे.
आता तसेच थोडे पुढे जाऊयात. इथेही मधुशाला निसर्गातल्या रुपकांची साथ सोडत नाहीये!
सकाळ, संध्याकाळ आणि रात्र ह्या निसर्गचक्रातल्या नेहेमीच्या गोष्टीतही कवीला मधुशाला दिसते आहे.
आणि नुसती दिसतेच आहे असे नव्हे तर ती इतकी भावली आहे की त्याचं वर्णन करताना बच्चनांच्या प्रतिभेला कमालीचा बहर आलेला आहे!
निसर्गातल्या विभ्रमांशी आपल्या अनुभवातून इतके तादात्म्य होणे ही असामान्य प्रतिभेची देणगीच आहे!
(आईसक्रीम खाताना लहान मुलांकडे जर तुम्ही एकटक पाहिलंत तर ती त्या आईसक्रीम मधे मनाने अक्षरशः घुसलेली दिसतील!
त्यांच्या चेहेर्यावरचे ते भाव, विस्फारलेले डोळे, एकटक आईसक्रीमकडे लागलेली नजर ह्यातून त्यांना आत्मानंदच मिळत असतो. आजूबाजूचे लोक, बरबटलेले तोंड, हात आणि कपडे ह्याचं त्यांना भान नसतं, ती तादात्म्य पावलेली असतात!)
कवी निसर्गाशी असाच तादात्म्य पावलेला आहे आणि एवढे कमी म्हणून की काय योगेश्वर कृष्ण आणि त्याच्या मुरलीतही त्याला मधु आणि मधुशालाच भासते आहे, दिसते आहे!
निसर्गातल्या विभ्रमांशी एकरुप झालेल्या मधुशालेतली एकेक रुबाई वाचत पुढे जाताना शेवटच्या रुबाईत भल्याभल्यांना आपल्या इशार्यावर नाचवणार्या मधुशालेचे वर्णन करतानाच आपल्याला लौकिकातून पारलौकिकाकडे घेऊन जाण्यात कवी यशस्वी झाला आहे की नाही ते तुम्हीच ठरवा!
चला घेऊयात आस्वाद - रुबाया ३६ ते ४० -
---------------------------------------
मधुशाला -
साकी बन आती है प्रातः जब अरुणा ऊषा बाला,
तारक-मणि-मंडित चादर दे मोल धरा लेती हाला,
अगणित कर-किरणों से जिसको पी, खग पागल हो गाते,
प्रति प्रभात में पूर्ण प्रकृति में मुखिरत होती मधुशाला।।३६।
उतर नशा जब उसका जाता, आती है संध्या बाला,
बड़ी पुरानी, बड़ी नशीली नित्य ढला जाती हाला,
जीवन के संताप शोक सब इसको पीकर मिट जाते
सुरा-सुप्त होते मद-लोभी जागृत रहती मधुशाला।।३७।
अंधकार है मधुविक्रेता, सुन्दर साकी शशिबाला
किरण किरण में जो छलकाती जाम जुम्हाई का हाला,
पीकर जिसको चेतनता खो लेने लगते हैं झपकी
तारकदल से पीनेवाले, रात नहीं है, मधुशाला।।३८।
किसी ओर मैं आँखें फेरूँ, दिखलाई देती हाला
किसी ओर मैं आँखें फेरूँ, दिखलाई देता प्याला,
किसी ओर मैं देखूं, मुझको दिखलाई देता साकी
किसी ओर देखूं, दिखलाई पड़ती मुझको मधुशाला।।३९।
साकी बन मुरली आई साथ लिए कर में प्याला,
जिनमें वह छलकाती लाई अधर-सुधा-रस की हाला,
योगिराज कर संगत उसकी नटवर नागर कहलाए,
देखो कैसों-कैसों को है नाच नचाती मधुशाला।।४०।
-------------------------------
भावानुवाद
पहाट होता येती साकी, होऊन अरुण-उषाबाला,
तारक-मंडित वस्त्र अर्पुनी धरती घेई मदिरेला
किरण-करांनी अगणित, पिउनी विहंग वेडे गाती हो,
प्रभातकाली सृष्टी इथे जणु येई बनुनि मधुशाला ||३६||
नशा उतरता त्या मदिरेची, अलगदते संध्याबाला,
नित्य घेऊनी येत असे ती अन् मादकशा वारुणिला,
करुन सुरेचे पान जीवनी शोक, ताप जाती सारे,
सुरेत सुप्तचि होत मद्यपी, राहे जागृत मधुशाला ||३७||
अंधकार हा मधुविक्रेता, शशि सुंदर साकीबाला,
किरणा-किरणातुन हिंदोळे निद्रा-मदिरेचा प्याला,
धुंदच होती, डुलकी घेती, पिऊन मादक मदिरेला,
तारकांतुनी प्राशुन घेती, निशा नाही, जणु मधुशाला ||३८||
कुठे जरी मी नयन वळवितो, मद्य तरीही दिसे मला,
पुन्हा तरी मी नजर फेरतो, तरीही भेटते प्याल्याला,
बघता इकडे अथवा तिकडे, मधुबालेविण नाही कुणी,
जिकडे तिकडे दिसे मला तरी सखीच माझी मधुशाला ||३९||
हाती घेऊन प्याला मुरली बनुनी आली मधुबाला,
हिंदोळत जणु घेऊन येई अधर-सुधा-रस मदिरेला,
योगेश्वर तो कृष्णहि बनुनी जाई नर्तक तिच्यासवे
कुणाकुणाही पहा नाचवी कैसी येथे मधुशाला ||४०||
चतुरंग
वाचने
5940
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
ह्म्म
वा!
काव्यवाचनात खरा आनंद.
In reply to काव्यवाचनात खरा आनंद. by कलंत्री
सहमत..
मस्त !!!
मस्त!
In reply to मस्त! by धनंजय
धनंजय, तुमचे काकदृष्टीपूर्ण विश्लेषण मला प्रगतीपथावर
सुंदर...
तात्या, केसु, प्राजु, धनंजय
व्वा....