Skip to main content

हे ठिकाण

सारे प्रवासी गाडीचे

लेखक भोचक यांनी सोमवार, 21/04/2008 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
परशुरामची झोप मोडू नये म्हणून भुंग्याने पार मांडी फोडली तरी कर्णाने हु की चू केले नव्हते, असे म्हणतात. तद्वतच मध्य प्रदेश नामे राज्यात सार्वजनिक प्रवास करण्यासाठी कमीतकमी एवढी तरी सहनशीलता हवीच. सहनशीलतेची परीक्षा वा कसोटी पाहणारे प्रसंग आपल्या आयुष्यात अधून मधून येत असतील, पण या बाबतीत आपल्या लोकांना अधिक मजबूत करणेसाठी मध्य प्रदेश सरकारने कायमस्वरूपी सोय केली आहे, ती वाहतुकीच्या खासगीकरणाच्या रूपाने. आपल्याकडे 'यष्टी'च्या खासगीकरणाची आरोळी आली की सगळे कर्मचारी एकत्र येऊन शड्डू ठोकून उभे रहातात.

मिनी स्प्रिंग रोल्स

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 21/04/2008 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
वसंतोत्सवाची खासियत असणार्‍या ह्या पदार्थाला सृष्टीमध्ये नवचैतन्य आणणार्‍या वसंतऋतुचेच नाव ह्या पदार्थाला देणारे चिनी रसिकच म्हणायला हवेत,नाही का?ह्या स्प्रिंग रोल्सची मजा घ्यायला दर वेळी 'हाटेल' गाठायची गरज नाही.ही घ्या रेसिपी- साहित्य- कोबी,गाजर,सिमला मिरची (लाल,पिवळी,हिरवी अशा रंगीत असल्यास उत्तम,नसल्यास ज्या असतील त्या),सेलरीपात २ काड्या,पातीचे २कांदे+कांदापात - ह्या सर्व बारीक चिरलेल्या भाज्या १.५ ते २ कप. सोयासॉस,मिरपूड,चिलीगार्ल
Taxonomy upgrade extras

भाषा आणि प्रमाण

लेखक नीलकांत यांनी रविवार, 20/04/2008 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांपासून(ण) मिसळपाव वर शुद्धलेखन(ण) आणि(न) प्रमाण(न) भाषेचा जयघोष चालला आहे. काय आहे हो ही प्रमाण(न) भाषा? प्रमाण कशासाठी हवं? आणि प्रमाणा(ना)चं प्रमाण किती असावं? 'चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य. त्याकाळी मराठीला प्राकृत म्हणत असत. त्यानंतर आमच्या अमृतातेही पैजा जिंकणार्‍या मराठीत 'ज्ञानेश्वरी' लिहिल्या गेली. सुरुवातीला मराठीत पद्य रचनाच लिहिल्या जायच्या. लिहायला कमी जागा, गेयता असल्यामुळे सहज मुखोद्गत होत असत आणि सहज प्रसार होई.

आभास

लेखक सुवर्णमयी यांनी बुधवार, 16/04/2008 02:36 या दिवशी प्रकाशित केले.
आभास आभास फक्त होता, मी थांबले कितीदा माझ्याच सावलीने धास्तावले कितीदा पाने झडून गेली,पक्षी उडून गेले मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा गर्दीत माणसांच्या का ओळखू न आला? मी चेहऱ्यास माझ्या धुंडाळले कितीदा पत्ता जुनाच होता, रस्ता तसाच होता मुद्दाम आठवांना त्या टाळले कितीदा होऊन वाघ फिरणे होते तसे नफ्याचे ( गाढव मनात त्याच्या ओशाळले कितीदा) नव्हते म्हणे कुणाच्या यादीत नाव माझे मुद्दाम त्यास त्यांनी डागाळले कितीदा सोनाली जोशी
Taxonomy upgrade extras

मी पाहिलेला मृत्यू

लेखक आंबोळी यांनी मंगळवार, 15/04/2008 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी थोडक्यात मरता मरता वाचलो.... काळ आला होता पण वेळ आली नव्हती... असले वाक्प्रचार आपण बर्‍याच वेळा वापरतो / ऐकतो. पण खरेच कधी कधी अगदी जिवावरचा प्रसंग ओढवलेला आसतो. माझ्या आयुष्यातले असे 2 प्रसंग येथे सांगतो. आपल्यालाही असे अनुभव आले असतील तर जरूर सांगा. तसा जन्माला येताना मी गुदमरलो होतो, काळानिळा पडलो होतो, थोडक्यात वाचलो, अशी आख्यायिका माझी आजी, आई आमच्याविषयी सांगतात पण तो प्रसंग नीट आठवत नसल्याने येथे तपशीलवार देत नाही. पण थोडक्यात मरता मरता मी जन्माला आलो असे म्हणता येईल. मी साधारण 6-7 वर्षाचा आसताना आम्ही एका वाड्यात माडीवर राहात होतो.

मिसळ!

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 13/04/2008 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम पावणं.. मला तर वळिखलं असनंच म्हना तुमी.. अवो, तात्या म्हनं माज्यावर इष्टोरी लिवनार हाय म्हनून वाट बगून राहिले ना मी,पन किती दिस झालं त्यानं काय अजून लिवल नाय ते व्यकतीचित्तर का काय ते!
Taxonomy upgrade extras

काही संवाद

लेखक ॐकार यांनी रविवार, 13/04/2008 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
आजानुकर्ण यांच्याशी गप्पा मारता मारता असे काही कल्पनारम्य संवाद सुचले. संवाद कल्पनेतले(च) आहेत. काही साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा, न आढळल्यास सुदैव! संवाद १ ( वेळ : एकाची सकाळ, एकाची संध्याकाळ माध्यम : जीटॉक-चॅट स्थळ : नसत्या चौकश्या करू नका. ) १: नमस्कार २: नमस्कार १: नविन काय लिहिले? २: काही नाही. वेळच नाही मिळत हल्ली. १: अच्छा. काल त्या पाककृतीवर तुमचा प्रतिसाद वाचला. २: अं? हो हो. १: पण त्यात तुम्ही कविता छान झाली आहे असं लिहिलयं! २: असं काय? बहुदा झोपेत दिला प्रतिसाद. कवितेलाच द्यायचा होता खरा. १: हेहेहे , प्रतिसाद झोपेतही देता पण लिहायला वेळ नाही!

नको मारू खडा रे सख्या

लेखक फटू यांनी शनिवार, 12/04/2008 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
(1993 च्या आसपास कधीतरी आलेल्या दलाल या मिथुन चक्रवर्ती अभिनीत टुकार हिंदी चित्रपटातील "ठेहरे हुए पानीमें" या भावस्पर्शी गीताचा स्वैर मराठी अनुवाद...) नको मारू खडा रे सख्या संथ निवांत या पाण्यावर उमटतील रे तरंग त्याचे माझ्या स्तब्ध या मनावर तुझ्यासाठी अनोळखी मी अन् तुही तसा परका मला कसं जाणल तू दु:ख माझं घाव जगापासून लपलेला सा~यानाच वेड असतं रे फुलांचं कुणी प्रेम करत नाही काट्यांवर मीही अशीच एक अभागी काटा नसू दे रे त्याची सावट तुझ्यावर तूच सांग रे सख्या मला आता कसा घ्यायचा स्वप्नांचा झोका अपुर्‍या राहतील इच्छा मनीच्या चालत नसते कधी वाळूत नौका नको मारू खडा रे सख्या संथ निवांत या पाण्याव