लेखकसंपादक मंडळयांनी गुरुवार, 04/09/2014 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र. १ मानवनिर्मित स्थापत्य
**********************
नमस्कार मंडळी! छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र.१ मानवनिर्मित स्थापत्य - निकाल जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या स्पर्धेला उदंड प्रतिसद देऊन यशस्वी करण्यात तुमचा सर्वांचा हातभार लागला आहे. आलेली सर्वच छायाचित्रे अतिशय सुरेख होती आणि डावे-उजवे करणे फारच कठीण. म्हणूनच सर्व सदस्यांना चित्रे निवडायची विनंती केली होती. एकूण २८ स्पर्धकांची ७९ छायाचित्रे आली. निकाल लावताना ४० सदस्यांनी आपल्या पसंतीची चित्रे निवडली.
लेखकसंपादक मंडळयांनी मंगळवार, 19/08/2014 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला आज १७५ वर्षे होत आहेत.
या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला आहे. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वात पहिल्या स्पर्धेचा विषय मानवनिर्मित स्थापत्य हा आहे. नव्या, जुन्या, प्राचीन, अर्वाचीन इमारती आणि स्थापत्य यांची तुम्ही काढलेली छायाचित्रे इथे या धाग्यावर प्रकाशित करावीत ही विनंती.
लेखकआदूबाळयांनी सोमवार, 28/07/2014 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा प्रथम उघडला तेव्हा त्यावर एकही प्रतिसाद आला नव्हता. थोडासा वाचताच लक्षात आलं - बंदे में है दम! लहानग्या सचिनचा पहिला कव्हर ड्राईव्ह पाहून रमाकांत आचरेकरांना काय वाटलं असेल? मिसरूडही न फुटलेल्या खन्नाच्या हातची पहिली मिसळ खाऊन पहिलं गिर्हाईक पार्श्वभागी हात लावून बोंबललं असेल तेव्हा रामनाथ उपहारगृहाच्या तत्कालीन मालकांना मिसळीच्या लालजर्द तर्रीत भविष्य दिसलं असेल का?
आम्हाला दिसलं. हा धागा इतिहास घडवणार याची खूणगाठ आम्ही मनातल्या उपरण्यास बांधली. खरडफळ्यावर तसं लिहूनही आलो.
लेखकdrsunilahirraoयांनी शुक्रवार, 11/07/2014 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
टीचभर ही भूक सांभाळी, विठोबा
जन्मभर होतीच आषाढी, विठोबा
मोजली कोणी अशी ही पापपुण्ये
चांगला तू आण मापारी, विठोबा
पारखोनी घे जरासे भक्त आता
हे तुला विकतील व्यापारी, विठोबा
शेवटी आलास ना गोत्यात तूही
माणसे असतात थापाडी, विठोबा
सोड गाभारा, अता घे वीट हाती
झोड जी झोडायची माथी, विठोबा
देहभर पाण्यात तरला जन्म देवा
तू खरा निष्णात नावाडी, विठोबा !
डॉ.सुनील अहिरराव
कां कोण जाणे पण परत
उंबरठा बांधायची हिंमतच
होत नाहीये
----
न जाणो ती अंगणातली
फुलदाणी घरात परत
आलीचं नाही तर?!
----
मग वाटतं बरं झालं
उंबरठा वाहून गेला
कच्चाच होता नाहीतरी
----
तुझी डायरी तेवढी
बाहेर काढून वाचायची
अनिवार इच्छा होतेय
किमान ती अलमारी तरी
शांत होईल...
लेखकविवेकपटाईतयांनी बुधवार, 02/07/2014 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या २७ तारखेला सकाळी लाल रंगाच्या बस (एसी बस) मधून कार्यालयात जाताना कळले, हृदयाच्या राजमार्गावर ठीक ठिकाणी ट्रफिक जाम झाल्यामुळे शरीराच्या अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम झाला आहे. ताड्ताडीने शरीराच्या मंत्रिमंडळाची मिटिंग घेण्यात आली. ट्रफिक जाम दूर करण्यासाठी यथाशीघ्र ह्रदयाच्या राजमार्गावर बाय पास बांधावे लागतील, असा निर्णय घेण्यात आला. तूर्त काही काळ लेखणीला विश्रांती द्यावी लागेल. असो.
लेखकनिखळानंदयांनी शनिवार, 28/06/2014 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनी वसवलेला हा नेटका गाव..
घेतो आम्हा नेटसरुंच्या मनाचा ठाव..
इथे कोणासही नाही पावभाजी ची हाव..
सगळे मारतात फक्त मिसळीवरच ताव..
इथे सगळ्यांमधे दिसतोय आपुलकीचाच भाव..
नाही दिसत कुठे आत्मप्रौढीचा प्रभाव..
मझ्यासारख्या नवख्याला सांभाळून घ्या राव..
चुकलो माकलो तर घालू नका घाव..
मला बघायला आवडतील तुमचे हाव-भाव..
मला आपले म्हणा.. निखळानंद माझे नाव !
- मी इथे नवीन सभासद आहे. इथल्या कोणाशीही मझी ओळख नाही. इथल्या मोजक्याच गोष्टी वाचल्यायत. पण पहाताक्षणी प्रेमात पडतात तसे मी लगेचच इथला सभासद होण्याकडे ओढला गेलोय ! आशा आहे इथला प्रवास रम्यच होइल...
काय झालं कुणास ठाऊक पण
काल रात्री पावसात या घराचा
उंबरठाच वाहून गेलाय
तेव्हापासून घरातल्या सगळ्या वस्तू
जणू स्वतंत्र झाल्या आहेत
----
बैठकीच्या खोलीत
कोपर्यातल्या मेजावर
एक फुलदाणी होती
..
काल रात्रीपर्यंत होती
सकाळी अंगणात सापडली
पहाटेच्या वर्षावात एखादं फुलं
पदरात पडेल
या आशेने अंगणात आली असावी बहुदा
----
देवघरासमोरील समईची मंद ज्योत
आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्याशी
पोहचेनाशी झालीये
त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या
दिशेने झुकत राहते
थरथरत
----
तिच्या पुस्तकांची एक अलमारी आहे
उजाडल्यापासून बघतोय
थडाथड दारं आपटतायत
बहुदा तिची डायरीही असावी त्यात
----
काय झालं कुणास ठाऊक पण
गेला एकदाचा
रात्रभर बरसू