संवेदना
रोजच्याप्रमाणे कामावरून घरी जात होतो, दुकानातून काही घेण्याकरिता थांबलो, पुन्हा गाडी चालवत निघणार; तेंव्हा रस्त्यात कडेला एक कुत्रा विव्हळताना दिसला, बहुदा पायावरून गाडी गेली असावी, लोक पहात होते, मला फार वाईट वाटले, त्याला काही बिस्किटे टाकली. गडबड नेहमीची पाचवीला पुजलेली, घरी गेलो. काही केल्या तडफडणारा कुत्रा डोळ्यासमोरून जाईना. आवरून झोपायला गेलो, पुन्हा तेच विचार! काय वेदना होत असतील त्याला?, त्याचे सोबती? ते तरी काय मदत करणार? त्याचे खायचे काय? मला असले फार विचित्र प्रश्न पडू लागले, उत्तरे मिळत नव्हती मी कूस बदलून काही फरक पडत नव्हता.
मिसळपाव