Skip to main content

हे ठिकाण

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (१)

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 14/06/2013 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
२९ मे २०१३ आज ऑफिसमधून घरी आलो, बॅग फेकली, कपडे भिरकावले, बाथरूममध्ये जाऊन झटपट शॉवर घेतला, तोपर्यंत माझा चहा रेडी होता. बस तो हातात घेऊन माझ्या नेहमीच्या जागेवर म्हणजे हॉलमधील भल्यामोठ्या खिडकीसमोर आरामखुर्ची टाकून बसलो, पाय पुढे पसरवून त्या खिडकीच्या कठड्यावर टेकवले अन लांबवर दूरवर जिथवर नजर जाईल तिथवर पसरलेल्या मुंबईकडे पहात, जिच्यासमोर एअर कंडीशन सुद्धा झक मारेल अश्या दहाव्या मजल्यावरील आमच्या खिडकीतून आत शिरणार्‍या वार्‍याच्या थंडगार झुळकीचा आनंद घेत हातातल्या कॉफी मगातील गरमागरम चहाचे घोट मारत.... बस्स ती पंधरा-वीस मिनिटे..

श्रामो

लेखक सहज यांनी गुरुवार, 30/05/2013 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या इनबॉक्स मधले वरुन तिसरे इमेल / फेसबुक नोटीफिकेशन -Shravan Modak mentioned you on Facebook श्रामो , आपल्या पैकी बरेच जण त्यांना श्रामो याच नावाने संबोधित करतो. सरकारी धोरणे, आदिवासी लोकांचे प्रश्न, आंदोलने, डावी विचारसरणी असे धाग विषय आले की लगेच मी श्रामो यांचा प्रतिसाद वाचायला/शोधायला उत्सुक. त्यांच्या डाव्या बाजूला झुकलेल्या मतांमुळे किंवा माझ्या मनात खटकलेल्या / नकोश्या वाटणाऱ्या विचारसरणीमुळे थोडा बहुत मी कायमच श्रामो यांच्या पेक्षा जरा वेगळ्या मताचा होतोच पण श्रामो काय म्हणतायत, त्यांची माहिती काय याबाबत कुतूहल कायम असायचे. दोन वेळेला ग्रुप/ कट्या मधे त्यांना भेटायचा योग आला.

श्रावण मोडक

लेखक चिंतातुर जंतू यांनी गुरुवार, 30/05/2013 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
कळवण्यास अत्यंत दु:ख होते आहे की मराठी संकेतस्थळांवरील जुने आणि लोकप्रिय लेखक व सामाजिक कार्यकर्ते श्री. श्रावण मोडक यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. येथील अनेक सदस्यांसाठी ते एखाद्या कुटुंबियाप्रमाणे होते. त्यांना श्रद्धांजली.

जीव

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 27/05/2013 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
जीव दुखतो..

कार्यकर्ते येती घरा...

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 09/05/2013 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाला शीर्षक काय द्यावं हा प्रश्न अनेकदा आ वासून उभा रहातो. हा लेख लिहिताना देखील त्याने तेच केलं. मग त्याने उघडलेल्या मोठ्ठ्या तोंडात 'माझ्या तोंडात कचरा टाका' असं म्हणत चोच वासून बागांमध्ये उभे राहिलेल्या पेंग्विनांच्या पुतळारूपी कचरापेटीच्या आजूबाजूला जितक्या सहजतेने आपण कचरा टाकतो तशी काही नावं भिरकावून बघितली. 'बिपिन कार्यकर्तेंनी अमेरिका प्रवास केला हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न', 'आंगतुक पाव्हण्याचं मोठ्या मनाने आदरातिथ्य करून अमेरिकेत जपलेली भारतीय संस्कृती', 'कार्यकर्तेंचं राजपण, आजपण, उद्यापण' वगैरे अनेक नावं लिहिली.

डोंबिवली कट्टा....

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 08/05/2013 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मित्रांनो आणि मत्रिणींनो, दि, २६/०५/२०१३ रोजी डोंबिवली कट्टा आयोजीत केला आहे. नंदी पॅलेसला सं.७:३० वाजता जमायचे ठरवले आहे. ज्या कोणाला शक्य असेल त्याने यावे आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी कट्ट्याचा व्रुत्तांत वाचून समाधान व्यक्त केलेत तरी चालेल. प्रत्येकाने आपापला खर्च करायचा आहे. ठिकाण जरी डोंबिवली असले तरी, फक्त प्रुथ्वीवरीलच नाही तर आकाशगंगेतील सर्व मिपा वाचकांना जाहीर आमंत्रण आहे... मला व्य. नी. केलात तरी चालेल. किंवा इथे प्रतिसाद दिलात तरी चालेल.

युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग १

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 29/04/2013 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire मित्रहो, आजपासून युद्धकथेच्या मालिकेत सातवे पुष्प गुंफत आहे...............हा लेख बराच मोठा असणार आहे कारण पर्ल हार्बरची पूर्ण कहाणी सांगायचा विचार आहे....आपल्या शंकांना मी उत्तरे सगळ्यात शेवटी देईन-अर्थात मला माहीत असली तर......आजचा भाग छोटा आहे कारण बाण सुटला आहे............त्या बाणाच्या प्रवासाची ही कहाणी मला तरी रोमांचकारक वाटली......आपल्यालाही ती तशी वाटेल अशी आशा आहे..........

एक सिगारेट पिणारी मुलगी

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 28/04/2013 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज ती दिसली.. जवळपास तीन-साडेतीन वर्षांनी.. ट्रेनमध्ये, जरा दूरच्याच सीटवर बसलेली.. मला ती दिसत होती, म्हणजे ती देखील मला बघू शकत असणार.. बस्स, अजून तिचे लक्ष गेले नव्हते माझ्याकडे.. पण गेले तरी ओळखेल का..? का, नाही ओळखणार..? मी नाही का ओळखले तिला..? तसा फारसा बदल ही झाला नव्हता तिच्यात.. माझ्यात तरी कुठे फारसा झाला होता.. बस्स, बर्‍याच काही घडामोडी घडल्या होत्या आयुष्यात.. या गेल्या तीन-साडेतीन वर्षांत.. वाशीवरून वी.टी.ला जाणारी ट्रेन पकडली. बायकोबरोबर तिच्या माहेरहून परतत होतो. रविवारची संध्याकाळ अन फर्स्टक्लासचा डब्बा. गर्दी नेहमीपेक्षा तशी कमीच.

अबोलीच्या निमीत्ताने...

लेखक नीलकांत यांनी शुक्रवार, 19/04/2013 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, अबोली नावाचा नवा विभाग मिपावर सुरू करायचे ठरले. पाडव्याला याची घोषणा झाली. आता एवढ्यात हा विभाग सुरू होईल. अपेक्षेप्रमाणे मिपावर याबाबतीत उलटसुलट चर्चा सुरू झाली. मिपावर काही एक नवीन होतंय तर त्यावर मिपाकरांच्या प्रतिक्रिया अपेक्षीत आहेत. काहींना हा विभाग आवडला तर काहींना अजिबात नाही आवडला. काहींनी आपला संबंधच नाही त्यामुळे कोरड्या शुभकामना दिल्यात तर काहींनी विभाग कधी सुरू होतो अशी चौकशीसुध्दा केली. मात्र काही लोकांच्या प्रतिक्रिया जरा मर्यादा सोडलेल्या वाटल्या त्याचे वाईट वाटले. आता त्याचे कारण काय? याच्या खोलात जायला नको. मात्र तरीही काही विचार या निमीत्ताने मांडायचे आहेत.

सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 28/03/2013 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
हि १९८८ सालची गोष्ट आहे. मी नौदलाच्या अश्विनी या ८२५ खाटा असलेल्या कुलाब्याच्या रुग्णालयात इंटर्नशिप करीत होतो. स्त्रीरोग शास्त्राच्या प्रभागात(वार्ड) मध्ये माझी नेमणूक होती. सर्वात लहान(कनिष्ठ) डॉक्टर असल्याने प्रभागातील हमाली कामे(रुग्णाला बेशुद्धीकरणा पूर्वीची तपासणी करून घेणे त्यासाठी लागणार्या सर्व तपासण्या करून घेणे रुग्णाकडून शस्त्रक्रिये पूर्वीची परवानगी लिखित घेणे ई.) हा वारसा हक्क माझ्याकडे होता. एके दिवशी सकाळी आमचे विभागप्रमुख सर्जन कप्तान सुरंजन मुखर्जी यांनी मला एका अधिकार्याचा वीर्य तपासणी अहवाल प्रयोग शाळेतून आणण्यास सांगितले.