शाळेची वेळ झाली -बालकविता
लेखनविषय:
- Read more about शाळेची वेळ झाली -बालकविता
- 9 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
शाळेची वेळ झाली
चला चला बॅग भरा
चला चला डबा भरा
शाळेची वेळ झाली
शाळेची वेळ झाली
एक वही सापडत नाही
गृहपाठाचा पत्ता नाही
पेन्सिल तर तुटकी बाई
पेनामधून गळते शाई
शाळेची वेळ झाली
अंघोळ म्हणजे दोनच तांबे
नुसती बुडबुड जरा न लांबे
बाबांची तर चाले लुडबूड
टॉवेल मिळेतो माझी कुडकूड
शाळेची वेळ झाली
डब्यात काय ? पोळीचा रोल
आणि दोन बिस्किटं गोल
शाळा माझी तिची घाई
कित्ती कामं करते आई
शाळेची वेळ झाली
घाई आमची झाली भारी
तोच व्हॅन आली दारी
पण आई घे ना पापा
नाहीतर करणार नाही टाटा
शाळेची वेळ झाली