मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

यारहो ...

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
दुष्मनांचा जोर आहे वाढलेला यारहो जीव माझा आरशावर भाळलेला यारहो बोर जिथल्या गावची तिथलीच बाभळ अंगणी संग काट्यांचा मलाही भावलेला यारहो पिंड कुठल्या वासनांचा राहिला मागे इथे? कावळ्यांनी दंभ माझा टाळलेला यारहो ती म्हणाली सोड तू जमणार नाही आपले मी दुरावा मस्तकावर माळलेला यारहो कोण तो वेडा भिकारी रोज हाका मारतो प्राक्तनाने आरसा मज दावलेला यारहो एकदा केसात वेडे वीज तू माळून बघ बोल मग श्रृंगार मीही टाळलेला यारहो ! हंस कुठला? कोण कागा? वाद भलते वाढले मी पुरावा सुज्ञतेचा जाळलेला यारहो एकट्याने झुंजताना कैफ चढतो आगळा दोर परतीचा तसाही कापलेला यारहो © विशाल वि. कुलकर्णी

वाचने 11042 वाचनखूण प्रतिक्रिया 19

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

गवि गुरुवार, 03/22/2018 - 10:39
विकुशेठ, मस्त ग़ज़ल. इथे पहा:
एकट्याने झुंजताना कैफ चढतो आगळा दोर परतीचा तसाही कापलेला यारहो
एकट्याने झुंजताना कैफ चढतो आगळा दोर परतीचा तसाही मी कापलेला यारहो हा "मी" घातल्यास मीटरपूरक वाटेल का? आगाव सूचनेबद्दल क्षमस्व..

In reply to by प्रचेतस

गवि गुरुवार, 03/22/2018 - 11:04
जाहीर माफी मागत आहे. माझ्या म्हणण्याचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केला आहे. माझ्या म्हणण्याचा उद्देश असा होता की नवनवीन लेण्याना भेटी देऊन अधिकाधिक नवनवे अभ्यासपूर्ण लेख वाचकांस मिळत राहावेत. आय अपोलोगाईझ. -ग.वि. केजरीवाल

In reply to by गवि

धन्यवाद गवि ! तुम्ही सांगितलेला बदल केलास वृतभंग होइल, कारण मग दोन मात्रा वाढतील आणि अक्षरगणाची रचना बदलेल> एकट्याने झुंजताना कैफ चढतो आगळा दोर परतीचा तसाही कापलेला यारहो गालगागा गालगागा गालगागा गालगा यात अजुन एक मी जोडायचा म्हणजे 'गालगागा गालगागागा गालगागा गालगा' असे होइल, त्यामुळे वृत्तभंग होतो, लयही चुकते कारण मात्रा चुकताहेत. हवे तर असे करता येइल.. एकट्याने झुंजताना कैफ चढतो आगळा दोर परतीचा स्वतः मी कापलेला यारहो मनःपूर्वक आभार !