Skip to main content

मनाचिया अंगणात.....

लेखक उदय सप्रे यांनी रविवार, 18/05/2008 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
मनाचिया अंगणात मनाचिया अंगणात दरवळतो हा वसंत संगतीस नाहिस तू , ठुसठुसते हीच खंत ! गुरफटलो अवचित मी , मोकळ्यां केसांत तुझ्या तप भंगले महर्षिंचे , मी कुठला होय संत? भिजलेल्या रात्रींच्या आठवणी त्या अनंत जगण्याचे श्वास ज्यांस नसे आदी नसे अंत ! संवेदनांच्या पल्याड , जाऊन मी तिष्ठतोय होशील ना माझी मग, जन्माची सरताच भिंत ? -----------------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे------१८ मे, २००८------------ आम्हांस इथे ही भेटा..... कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com/ कवितांजली :http://uday-sapre.blogspot.com/
लेखनविषय:

वाचने 2624
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

सुद॑र काव्य रचना.

गुरफटलो अवचित मी , मोकळ्यां केसांत तुझ्या तप भंगले महर्षिंचे , मी कुठला होय संत?
हे खास आवडलं. :) उदयराव, स्पष्ट सांगतो, राग नसावा, पण नाय बॉ भिडली ही गज़ल. आणखी येऊद्या....छान...ह्याहून मस्त :)

In reply to by धमाल मुलगा

दोस्त, तुमचा राग ठरवून पण येणे शक्य नाही ! असं होऊ शकतं , मी जीव तोडून लिहिलेलं सगळंच सगळ्यांना तेव्हढं भिडेलच असं नाहे, मई याहून चांगलं लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. उदय सप्रे