Skip to main content

रिता गाभारा .....

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 01/08/2008 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
देहात माझीया हा चंद्र वितळून गेला । अन अंतरी मोगराही सुगंध मिसळून गेला । झुकवुनी लाख पाहिले नजरेस मी माझीया । तीर तुझ्या नजरेचा काळजास वेधून गेला । बेरंगी दुनियेचा ना कायदा मी मोडला । इशाराच एक तुझा मज हाय रंगवून गेला । वेचियेली मी दुःखेही माझ्या दोहो करांनी। फासा दुर्दैवाचा मज दान देऊन गेला । ओळखले नसे कधीही माझ्याच मी जगाला । सौख्याचा क्षण मजला नेहमीच फसवून गेला । गर्दीत अनोळख्यांच्या मज मैत्र एक भेटला । जीवलगच तो जीवाचा मग घाव घालून गेला । लाविले कसास माझ्या मी प्रत्येक श्वासाला । क्षणाक्षणांनी काळही मजला परखून गेला । शोधियले त्रिखंडात मी त्याच सर्वेश्वराला । -हुदयीचा गाभारा पण रिताच राहून गेला ।
लेखनविषय:

वाचने 2966
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

झुकवुनी लाख पाहिले नजरेस मी माझीया । तीर तुझ्या नजरेचा काळजास वेधून गेला । व्वा.. ओळखले नसे कधीही माझ्याच मी जगाला । सौख्याचा क्षण मजला नेहमीच फसवून गेला । मस्तच.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

In reply to by मदनबाण

हीच कडवी विशेष आवडलीत. सुंदर. राघव

मस्त कविता आवडली -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

सुचेल-तसं, मदनबाण, अमोल ..........मनापासून आभार

मनिषा, फारच सुंदर कविता. वेचियेली मी दुःखेही माझ्या दोहो करांनी। फासा दुर्दैवाचा मज दान देऊन गेला । ओळखले नसे कधीही माझ्याच मी जगाला । सौख्याचा क्षण मजला नेहमीच फसवून गेला । बिपिन.

अतिशय सुंदर कविता. काही ठिकाणी थोडी लय चुकते आहे. पण शब्दसामर्थ जबरदस्त आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सर्वच ओळी आवडल्या, सुंदर कविता. अजून येऊ दे अशाच सुंदर शब्द-आशयांची रचना.