मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(नूर)

चतुरंग · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कुमार जावडेकरांची 'नूर' गजल पाहून कोणे एके काळी आमचा बदललेला 'नूर' पुन्हा एकदा आमच्या आठवणीत आला! दारावरुन गेली, पाहून हूर आलो आता इथेच होती, शोधीत दूर आलो! जाऊन बारमध्ये ना घेतली कशी मी (पाहून तेथला मी आनंद-पूर आलो) ही फौज बेवड्यांची, पाहू कशास आता भेटीस 'पेजथ्रीं'च्या येथे चतूर आलो... 'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला घालून शेपटी मी काढून धूर आलो थोडाच वेळ होतो, मी थांबलो तिथे, पण- भलताच मैफिलीचा पाहून 'नूर' आलो चतुरंग

वाचने 3071 वाचनखूण प्रतिक्रिया 8

रेवती Mon, 08/04/2008 - 04:55
विडंबन चांगले झाले आहे, पण दारु व बार या शब्दांचा आता कंटाळा आला आहे. गटारिच्या निमित्तानेही हे शब्द बरेचदा वापरले गेले आहेत. वेगळ्या विडंबनच्या प्रतिक्षेत आहे. रेवती

प्राजु Mon, 08/04/2008 - 07:57
'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला घालून शेपटी मी काढून धूर आलो हे वाचून खूप हसले.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

फटू Mon, 08/04/2008 - 10:25
'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला घालून शेपटी मी काढून धूर आलो या ओळी तर एकदम जबराट... :P पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

बेसनलाडू Mon, 08/04/2008 - 11:00
'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला घालून शेपटी मी काढून धूर आलो हाहाहाहाहाहाहा!!!!! रंगाशेठ,विडंबनाचा विषय 'तो'च असला,तरी आहे मात्र जबराट! (वाचक)बेसनलाडू

मदनबाण Mon, 08/04/2008 - 11:12
'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला घालून शेपटी मी काढून धूर आलो जबराट.... मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

विसोबा खेचर Mon, 08/04/2008 - 15:24
'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला घालून शेपटी मी काढून धूर आलो हे बाकी सह्ही लिहिलं आहेस रे रंगा! :)