ज्याला हवे कळाया, तो भाबडा निघाला
नको नेमका तो, मनकवडा निघाला
त्याची अदा निराळी, मी लुब्ध आज झाले
अंदाज हा चुकीचा, तो दारुडा निघाला
नीती नियम सारे, त्याला जरी पढवले
माणूस पाहण्याला, तो नागडा निघाला
घेऊन कर्ज माथी, ते शेतात पेरले
म्हशीला टोणगा, ढग कोरडा निघाला
नागास पाहता मी, वार इतके केले
घाव ज्यावरी झाला, तो केवडा निघाला
शत्रूस पाजून पाणी, सैनिक तहानलेले
नदीच्या पात्राचा रंग तांबडा निघाला
देवास नवसून, ज्यास हुलकावले
‘तो’ पाहतो म्हणणारा शेंबडा निघाला
(दोस्त हो, इथे नुकतेच पदार्पण केले. आणि इतरांच्या अतिशय सुंदर गजल वाचून प्रभावित झालो. ही माझी पहिलीच गजल आहे.