'नाते' म्हणून आहे!
तुटली सतार पण मी गाते म्हणून आहे
या मैफलीत मीही,'नाते' म्हणून आहे!
निर्व्याज सोबतीच्या भेटी गहाळ झाल्या
नाते अता खरेतर 'खाते' म्हणून आहे!
जेवण,चुडा नि साड्या,देतोच ना मला तो
खात्यात नाव त्याचे,'दाते' म्हणून आहे!
गजरा गुलाब अत्तर,निर्गंध होत गेले
शृंगारही अताशा,'न्हाते' म्हणून आहे!
स्मरते नि छिन्न करते,एकेक गीत त्याचे
या काळजात फिरते पाते म्हणून आहे!
या लेखणीस कितिदा,तोडून पाहते पण
माझ्यासवेच तीही,'जाते' म्हणून आहे!
—सत्यजित
वाचने
4638
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
वाह! क्या बात!
वाह!
सत्यजित,
In reply to सत्यजित, by संजय क्षीरसागर
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by सत्यजित...
कवीवर्य ,
In reply to कवीवर्य , by संजय क्षीरसागर
.
In reply to . by संजय क्षीरसागर
व्वा व्वा व्वा !
In reply to कवीवर्य , by संजय क्षीरसागर
माशाल्ला
In reply to सत्यजित, by संजय क्षीरसागर
+१ येस!
ते दाते चं बघा तेव्हढं. बाकी
In reply to ते दाते चं बघा तेव्हढं. बाकी by अत्रुप्त आत्मा
नवर्याचं आडनांव दाते असेल आणि
धन्यवाद!
सतार तुटली.... ? ही काय भानगड ?
In reply to सतार तुटली.... ? ही काय भानगड ? by चौकटराजा
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by सत्यजित...
यावरून एक किस्सा
In reply to यावरून एक किस्सा by चौकटराजा
हा हा हा!
सत्यजितजी आशय छान आहे
-१ नै जम्या.
शार्दूलजी,चतुरंगजी