निघाला (गजल)
ज्याला हवे कळाया, तो भाबडा निघाला
नको नेमका तो, मनकवडा निघाला
त्याची अदा निराळी, मी लुब्ध आज झाले
अंदाज हा चुकीचा, तो दारुडा निघाला
नीती नियम सारे, त्याला जरी पढवले
माणूस पाहण्याला, तो नागडा निघाला
घेऊन कर्ज माथी, ते शेतात पेरले
म्हशीला टोणगा, ढग कोरडा निघाला
नागास पाहता मी, वार इतके केले
घाव ज्यावरी झाला, तो केवडा निघाला
शत्रूस पाजून पाणी, सैनिक तहानलेले
नदीच्या पात्राचा रंग तांबडा निघाला
देवास नवसून, ज्यास हुलकावले
‘तो’ पाहतो म्हणणारा शेंबडा निघाला
(दोस्त हो, इथे नुकतेच पदार्पण केले. आणि इतरांच्या अतिशय सुंदर गजल वाचून प्रभावित झालो. ही माझी पहिलीच गजल आहे. नियमांचा फारसा अभ्यास न करता लिहिली आहे. चुकत माकत शिकायलाच आवडते. बरोबर उतरली आहे की नाही हे कळल्यास आनंद वाटेल.)
वाचने
2693
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
गजल आवडली . नियम मलाही काही माहीत नाही पण ही रचना मनाला भावली. सुरेख लयबद्ध आहे.
फक्त शेवट मात्र कळला नाही. शक्य झाल्यास समजावुन सान्गा प्लीज.
In reply to गजल आवडली . नियम मलाही काही by पद्मावति
देवाला नवस करून, (देवळातून बाहेर पडले, तर समोर याचक होता - हा गर्भित अर्थ आहे), त्याला टाळले / हुलकावले.
म्हणजे आत स्वतः:साठी बरेच काही मागितले आणि बाहेर दुसऱ्याला थोडेही द्यायची तयारी नाही !
तेंव्हा तो याचक म्हणतो तुमचं हे वागणं 'तो' (देव) पाहतो आहे. शेम्बडा हा शब्द याचक कोवळ्या वयाचा आहे असं दर्शवण्यासाठी आहे. म्हणजे लहान मुलाला जे कळते ते मोठ्यांना वळत नाही असे दाखवायचे आहे.
वा उत्तम भाव. एक दोन शेर तर सुरेखच.
शत्रूस पाजून पाणी, सैनिक तहानलेले
नदीच्या पात्राचा रंग तांबडा निघाला
वेल्लाभट आणि समाधान राऊत, मनापासून आभार :)
सुन्दर
वाह !! प्रयत्न नक्कीच चांगला आहे.
In reply to वाह !! प्रयत्न नक्कीच चांगला by शार्दुल_हातोळकर
:)
काही ठिकाणी लय गंडलेली आहे.
In reply to काही ठिकाणी .. by चौकटराजा
म्हणजे नक्की काय? आणि कुठे?
In reply to म्हणजे नक्की काय? by संदीप-लेले
हे केवळ एक उदाहरण पाहा....
साऱ्या नीतीकथा मी अध्यापिल्या जयास
माणूस मानण्याला तो नागडा निघाला
In reply to सर्वप्रथम शेरांमधे लय आणि सहजता पाहिजे असे वाटते by शार्दुल_हातोळकर
" सर्वप्रथम शेरांमधे लय आणि सहजता पाहिजे असे वाटते "
बरोबर.
मात्रावृत्त / अक्षरगणवृत्त ई. गजलेच्या व्याकरणाची माहिती करायची आहे. ती झाल्यावर लयीचा अंदाज येईल असे वाटते.
In reply to " सर्वप्रथम शेरांमधे लय आणि by संदीप-लेले
मराठी गझलमधे लय, सुबोधता, सहजता आणि खोल अर्थ इत्यादी गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या. त्या साध्य झाल्यावर वृत्त, मात्रा, व्याकरण यामधे उन्नीस-बीस झाले तरी फारसा फरक पडत नाही.
बाकी गझल सर्वसामान्य रसिक वाचकाच्या ह्रदयापर्यंत पोचणे महत्त्वाचे आणि गझलेचा अर्थ रसिकांना समजुन सांगण्याची वेळ गझलकारावर अजिबात येता कामा नये.
आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्याला सुचलेली कल्पना/विचार वगैरे कोणत्या वृत्तात म्हणजे थोडक्यात सांगायचे तर किती मात्रा/अक्षरांच्या ओळीमधे व्यवस्थित बसेल हे प्रथम ठरविणे उत्तम. म्हणजे नंतर एखादा चांगला आशय शेरामधे ओढुन ताणुन बसविण्याची वेळ येत नाही.
In reply to मान्य, पण..... by शार्दुल_हातोळकर
वृत्ते व्यवस्थीत अभ्यासली की मग आपोआप वृत्तबद्ध आणि लयबद्ध लिहीणे सुरू होते. सरावाने सहज जमेल तुम्हाला.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा 'वृत्तबद्ध' कविता आणि गझल यात फरक आहे.
बाकी तुमच्याशी बोलल्याप्रमाणे हि रचना 'गझल' या प्रकारात मोडत नाही. आपल्यातल्या चर्चेनुसार काही बदल करता येताहेत का ते पाहा. जमतील तुम्हाला सहज. शुभेच्छा !
In reply to बाकी तुमच्याशी बोलल्याप्रमाणे by विशाल कुलकर्णी
शार्दुल आणि विशाल,
स्वत:च्या लिखाणा विषयी नवीन msg आल्याचे इथे सूचित होत नाही असे दिसते. त्यामुळे तुमचे नवीन msg मी आत्ता पाहिले.
सूचनांचे स्वागत.
आधी गजलेचे व्याकरण थोडे समजून घेतो - मग दुरुस्ती चे पाहतो.
धन्यवाद !
गजल आवडली . नियम मलाही काही