ठाणे कट्ट्यावर मी दोन प्रश्न उपस्थित केले होते.
त्यातील दुसर्या प्रश्नाचा उहापोह पुन्हा केव्हा तरी.
"काय हो, चिरंजीव आज काल तुमची भरपुर काळजी घेतात."
म्हणजे काय?
मला सांगत होता," तुला उशीर होणार असेल तर बाबांसाठी काहीतरी खायला काढुन ठेव. ह्या आधी असा कधी बोलत नव्हता"
हॅहॅहॅहॅ
"हसताय काय, हा काय प्रकार आहे ते सांगा बघु"
हलकट आणि नीच दुसरे काय. आता ग्रॅज्युएशन पुर्ण होतय ना. बापाने पुढच्या शिक्षणाकरता लागाणारा पैसा पुरवताना हात आखडता घेउ नये म्हणुन मस्का पॉलिश. आणि हे तु मला सांगणार ह्याची खात्री. मला कॅथरीन झीटा जोन्स आवडते.