टायटल
लेखनप्रकार
अरे चोच्या बोलतोय
डॉक्टर आहे का?
"आज इतक्या वर्षांनी आठवण काढलीत मालक गरीबाची. डॉक्टर ५ दिवसासाठी बाहेर गेले आहेत"
डॉक्टर आणि सुट्टी, अशक्य
"सुट्टी नाही रे. लेक्चर ला गेले आहेत. पुर्ण महाराष्ट्राचा दौरा आहे. वॉर अगेन्स्ट एच. आय. वी वर"
आयला ह्याला पण भिकेचे डोहाळे लागेल की काय? एवढी मोठी प्रॅक्टिस सोडुन हे गावभर फिरतय.
" क्लिनिक मुलगा बघतोय. हुशार आहे. डॉक्टर फक्त कॉम्प्लिकेटेड केस असेल तरच येतात"
पॅनेल सोडले काय?
" एक वर्ष झाले. पॅनेलचा अध्यक्ष 'भारतीय संस्कृती' वाला निघाला. डॉक्टरच्या प्रेझेंटेशन मधली काही वाक्ये त्याला न सांगता वगळली. भडकला. शिव्या देत राजीनामा देउन बाहेर पडले"
च्या मारी, सॉलीड अथॉरीटी होता यार.
" हो. अजुन तुझी आठवण काढतो. अविनाश आणि तुझ्याबरोबर काढलेला फोटो अजुनही बाळगतो. त्या दिवसाची आठवण काढली की इमोशनल होतो"
डॉक्टरचा काउंट काय रे?
"१ लाखानंतर त्यांनी काउंट सोडुन दिला. आता आत्मचरित्र लिहीणार म्हणताहेत. तुझ्यावर एक फुल चॅप्टर"
हां यार टीम च तशी होती.
" बोल काय काम काढलस"
लेटेस्ट डेटा कुठल्या सालचा आहे.
"२००७"
काही बदल
"फ्रॅक्शनल"
मग एवढ्या सगळ्या कँपेन्सचा काहीही फरक नाही?
"ते तु ठरव. कुठला रेफरन्स आहे ते सांग"
९ ते १५ अर्बन
"काहीही फरक नाही. तुझ्या वेळेला नउ वर्ष ५ महीने -२० आठवड्याचा गर्भ"
आज पण तेच चालु आहे."
अजुनही ह्या ग्रुप मधे सर्व गर्भधारणा फक्त बलात्काराने होतो हा समज.
" अगदी तसाच"
१५ ते २१ मधे काय?
"२५% अनमॅरीड प्रेग्ननसी चे प्रमाण ७८ मधे होते तसेच आहे. आणि आता करीयर ओरीयंटेशन मुळे २२ ते २८ ग्रुप पण आलाय. ह्या ग्रुप मधे मात्र रीमार्केबल इंप्रुवमेंट आहे. इथे अवेयरनेस प्रोग्राम्स चा इफेक्ट जाणवतो"
म्हणजे ९ ते २१ ग्रुप तसाच ओपन अँड वलनरेबल.
"हो. पालक आजही संवाद साधु शकत नाहीत. बाचकतात. मोकळ्या चर्चेपासुन पळतात. ७५ चे टॅबुज अजुनही तसेच आहेत."
अर्ली एक्स्पोजर चे प्रमाण?
"आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी जास्त. अक्रॉस ऑल कास्ट क्रीड रिगार्डलेस फायनान्शियल कंडीशन"नंबर वाढला आहे म्हणुनच % मेंटेन होते आहे."
हम्म. डॉक्टरला भेटायला पाहीजे.
"कधी येतोस ते सांग. माझा पोरगा आता अकरावीत गेलाय. त्याची धुलाई पण तुच कर. अगदी डॉक्टरच्या पोराची केली होतीस तशी"
ठीक आहे. डॉक्टरला त्याच्या पुस्तकाचे टायटल मी सुचवतो.
जाता जाता: काय असावे बरे टायटल?
वाचने
2742
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
टायटल....
तीच तीच
In reply to तीच तीच by अवलिया
तेच
मी लय भारी
विदा घ्या विदा
टायटल -
७८ मधे आणि
म्हणजे