Skip to main content

अधोरेखीत

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 12/07/2010 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
"तुमच्या कार्यक्रमातुन स्फुर्ती,प्रेरणा घेउन आम्ही एक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम चालु केला आहे. पण त्यात काही इंग्लिश माध्यमाच्या शिक्षकांचा अभिव्यक्तीचा अहं अधोरेखीत झाल्यामुळे सुसुत्र संचालनाला बाधा येत आहे". अहो, लेले जरा मराठीत बोला.चुपके चुपके मराठीतुन काढला तर स्क्रीप्ट रायटींग तुम्हीच करा. "इगो मॅनेफेस्टेशन." थोडक्यात थेम्स नदीच्या काठी जन्माला आलेले तुमच्या कार्यक्रमात राडे घालतायत. मी उद्या येतो. सगळ्यांना एकत्र बसवा. दहा मिनिटात प्रश्न सुटेल. ........................................................................................... लेल्याने ओळख करुन दिली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेश पासुन करियर ची सुरुवात वगैरे वगैरे... इंग्रजी वाले कपड्यावरुन ओळखता येत होते. मराठी वाले गुर्जी आणि बै त्या मानाने साध्या कपड्यात. पाहुण्यांनी पहीलाच सवाल टाकला. The quality of English teaching is on decline. What is your opinion? "I do not know about other mediums. But I in my 10 years of teaching have never allowed it to happen. I believe it is same with all convent high schools." एक कोट आणि टाय जरा रागातच बोलला. पाहुण्यांनी काहीही न बोलता फळ्यावर चार शब्द लिहीले. पहीला शब्द सोपा होता. पण तोच इतर शब्दां च्या उच्चारणाचे वांदे करणार होता. CHARITY, CHARISMA,CHARADE, FACADE एक मराठी माध्यमाच्या बै नी ह्याचे उच्चार बरोब्बर केले. बाकी सर्व चॅरेड्,फॅकेड, करीश्मा मधे अडकले. पाहुणे मराठी माध्यमात शिकलेले होते. पुढील ३ दिवस कार्यक्रम कुणाच्याही अभिव्यक्तिचा अहं अधोरेखीत न होता निर्धोक पार पडला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4007
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

मास्तर त्या सायबाच्या भाषेचे आणि उच्चारांचे काय सांगु नका. कशाचेही काहिही उच्चार करतात. सॉमरसेट मॉम च्या नुसार GHOTI या शब्दाचा उच्चार फिश असा होऊ शकतो. GH = फ as in TOUGH O = इ as women TI = श as in RATIO घोरपडी चे स्पेलिंग GHOUAPURI पण एक मात्र नक्की सायबाच्या नियमांनुसार उच्चार केले तर SION चा उच्चार बर्रोब्बर सिंव असा होतो आपण शिप आणि शीप / शिट आणि शीट यांच्या उच्चारात घोळ करतो

गुर्जी ओ गुर्जी.... लोकांस्नी तुमच्यावाला लेख बाउन्सर गेला की काय... तरी सांगत हुतो सुद्द भासेत लिव्हा म्हनुन --अवलिया

हॅहॅहॅ!!! मस्त. गुर्जी विकेटा पटकन आणि सुमडीत काढतात. (व्हर्नाक्युलरवाला) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ते बरोबर आहे. पण facadeचा उच्चार माझ्या माहितीत फसाऽड असा, charadeचा शरेऽड असा आणि charismaचा उच्चार करिझ्मा असा करतात. (अधूनमधून डेऽझवरून इंग्रजी बोलणारी) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शरेऽड (अमेरिकन) किंवा शराऽड (ब्रिटिश) दोन्ही बरोबर आहे.

मराठी माध्यमातल्या शाळेत प्रवेश घ्या, घेतला तर नुकसान होणार नाही असे तर जगाविपरीत शिकवत नाहीत ना मास्तर ;-)

पोशाखी लोकांची विकेट काढलीत ते बरे झाले! B) (ऑनलाईन 'डिक्टिओनरी' वापरणारा)चतुरंग तर्खडकर

च्यायला माझी लेख वाचायच्या आधीच विकेट पडली :( मी शिर्षक आधी 'अधररेखीत' असे वाचले. असो, निराशा झाली. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

हाण्ण तिच्यायला! राणी एलिझाबेथच्या झग्यातुन पडल्याच्या आविर्भात वावरणार्‍यांची दोन मिनिटात बिनपाण्यानं करुन टाकली! :D मास्तर रॉक्स! (ऑन द रॉक्स नाय हो....)

hymn असाच भयानक ट्रिकी शब्द. मी कधीच बोलायला जात नाही. :( सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मराठी लोकांचे उच्चारच नाही तर शब्दकोशही इतरांपेक्षा वरचढ/योग्य असतात. _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे http://www.fl

Rendezvous(भेटण्याची जागा) चा उच्चार रण्देव्झुअस असा करुन हा शब्द "रणदिवे" ह्या मराठी आडनावावरुन आला आहे असे मला एका तेलुगु मित्राने सांगितले होते. P = NP

In reply to by चिरोटा

रांदेवु झेड्वीओयुस फोनेटीक्स न वापरलेले चांगले. नाही का? शरा द अगदी सौम्य जवळ जवळ सायलेंट झेड तसेच करीझ्मा झेड जरा सायलेंट स आणि झ चे मिश्रण.

लै भारी.. दक्षिणी लोक security चा उच्चार सेक्योरिटी का करतात बरं? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/