शावा शावा
"हॅलो"
बोल रे जोशा
"चो, तु कभी खुशी कभी गम बघितला आहेस का रे?"
म्हटले तर हो म्हटले तर नाही
"म्हणजे"?
फॅमिली सकट गेलो होतो. एक मित्र आणि त्याची फॅमिली पण बरोबर होती. पहील्या २० मिनिटात भर एयर कंडिशन मधे आम्हा दोघांना घाम फुटला. मग गम मिटवण्यासाठी फॅमिली ला तिथेच सोडुन थिएटर जवळ असलेल्या बार मधे सिंगल माल्ट खुशी. शेवटची १५ मिनिटे बघितला.फुल्ल असल्यामुळे त्रास झाला नाही. पण त्या हॉरर ची अचानक तुच आठवण का द्यावीस बरे?
"अरे एक केस आहे. बघ तुला जमते का? माझेच नातेवाईक आहेत.
मिसळपाव