मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धोरण

आरसा

प्रावि ·
अजून किती दिवस आपण , असेच 'उपटत' बसणार ? कलियुगातल्या रामराज्याच्या 'अवताराची ' वाट ' बघतं बसणार ? कॉग्रेस गेलं , भाजप आलं , तरी 'गव्हर्नमेंट ' ला शिव्या द्यायची खोड जात नाय ..... अन आपलाच आरसा 'बघायची' सवय काय जडत नाय.... देशाची प्रगती -आपण नियम तोडूनही व्हायलाच पाहिजे , अन सकाळी कुठल्यातरी 'कोपऱ्यात 'जाऊन घाण केलीच पाहिजे .... दारू अन बाईच्या नादात -हाय नाय तो पैसा उडवायची हौस , अन दुसऱ्या दिवशी -सरकार आमच्या इकडं नाय पाऊस .....

प्रिय नर्मदेस

शिव कन्या ·
( आज सरिता दिन. त्या निमित्त.....) प्रिय नर्मदेस, कारण काहीही असो, माणूस अनिकेत होतो तेव्हा पाण्यापाशी पोहचतो. मी तुझ्यापाशी पोहचले. अजून ती पहाट आठवते. मध्यरात्री कधीतरी मराठी मुलुख मागे पडला. दुसरा मुलुख लागला हे एसी गाडीतही कसं कळतं? पण कळतं. माणसं निराळी भासू लागली. हळूहळू अनोळखी भाषा कानावर पडू लागली. लक्ष देऊन ऐकलं कि कळतेय असं वाटायचं. पण थकून गेले. किती वेळ कान ताणणार? उन्हाळ्यातील पहाट म्हणजे तशी सकाळच. एकदम गाडीचा आवाज बदलला. कुणी म्हणालं, ‘नर्मदाजी’. मी फट्कन खिडकीवरचा जाड पडदा बाजूला सारला. बाहेर पाहिलं ....... गाडी तुझ्यावरच्या एका अजस्त्र पुलावर उभी होती. टोल भरायला.

प्रिय घरास

शिव कन्या ·
प्रिय घरास, नाही, तुझी आठवण येत नाही. बाई आहे मी. जाईन तिथे चूल मांडीन. रांधेन. खाऊ घालीन. चार फुले लावीन. शेज सजवीन. संग करीन. पोरं जन्माला घालीन. संसार थाटीन. वाढवीन. इथेही नवे घर करीनच की. नव्हे नव्हे केलेच आहे. नाही, तुझी आठवण येत नाही. इथे मी पायी कुठे जात नाही. गाडीत जाते. पायी चालले असते तर थबकले असते. वळून पाहिले असते. मग एखादे घर तुझ्यासारखे दिसले असते. मग खिडकीतून आत शिरले असते. पडद्यामागे लपून बसले असते. नाही नाही ते आठवले असते. उगीच तो दिवस रडून घालवला असता. म्हणून मी इथे गाडीतून गालिच्यावर, गालिच्यावरून गाडीत एवढेच पाय खाली ठेवते.

बोलशील तर मरशील...

शिव कन्या ·
बंदुकीची गोळी कशी गोल गोल गोल गोल रक्ताचा रंग कसा लाल लाल लाल लाल सोनू, तू माझ्याशी नीट बोल नीट बोल.... पैशाचा झोल कसा गोल गोल गोल गोल सत्तेचा माज कसा खोल खोल खोल खोल सोनू, तू माझ्याशी नीट बोल नीट बोल.. सोनूची केस कशी वायलंट वायलंट सोनूचा आवाज कसा सायलंट सायलंट सोनू, बोलशील तर मरशील मरशील..... सोssssनूssss शिवकन्या #GauriLankesh etc....

'अक्षर मैफल'ची भूमिका

रणभोर ·
शनिवारी रात्री कोणत्या तरी मित्राच्या घरी किंवा रूमवर सगळे जमतात. आपल्याला आवडतं ते खायला प्यायला घेऊन येतात. आणि गप्पा मारत बसतात. हा अनुभव बहुतेक सर्वांना असेल. अशा मैफलींना वयाचं बंधन नसतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशा मैफलींना विषयाचं बंधन नसतं. मला तर असा अनुभव आहे कि एरवी उघडपणे बोलता येणार नाहीत असे सर्व गंभीर विषय सुद्धा तिथे सहज मोकळे होतात. रात्रभर गप्पा सुरु राहतात. मित्र दर्दी असतील तर कदाचित मागे बेगम अख्तर किंवा नुसरत फतेह अली (आपापल्या आवडीनुसार) सुरु असतो. एका प्रसन्न वातावरणात, हसत खेळत यच्चयावत विषय बोलले जातात. आम्ही सुरु करतोय अशीच एक मैफल.

लिफ्ट करा दे

सरनौबत ·
लिफ्ट करा दे दिवसभर ऑफीसमध्ये एकामागोमाग एक मिटींग्समुळे पुरती दमणूक झालेली. संध्याकाळी उशीरा एकदाची कामं संपली. आता घरी जाऊन मस्तपैकी अंघोळ करायची आणि मग टीव्हीवर 'चला हवा येऊ द्या' बघत जेवायचं ह्या विचारात घराजवळ कधी पोचलो समजलंच नाही. तळमजल्यावर लिफ्ट जणू काही माझीच वाट बघत थांबली होती. लिफ्ट मध्ये मी एकटाच होतो. पाचव्या मजल्याचं बटण दाबलं. आता काही सेकंदातच घरी पोचणार ह्या विचाराने आनंद झाला. काही सेकंदातच लिफ्टचं दार उघडलं. मी बाहेर पडणार तेवढ्यात लक्षात आलं कि (च्यायला!) हा तर तिसरा मजला आहे.

गेम थेअरी : खोटे पणाने नुकसान कसे होते ?

साहना ·
नितीश कुमार हे आधी भाजपचे चांगले मित्र होते. अचानक भाजप त्यांना कम्युनल वाटू लागला आणि त्यांनी तिसरी चूल मांडली. काही वर्षांनी भाजप त्यांना जवळचा वाटू लागला आणि ती चूल मोडून ते पुन्हा भाजपात आले. अश्या प्रकारची शेकडो उदाहरणे आपणाला राजकारणात सापडतील. सामान्य माणसाला अश्या व्यवहाराचे आश्चर्य वाटेल पण राजकारणातील अश्या प्रकारच्या तडजोडी आणि "पास्ट इस पास्ट" अश्या प्रकारचे वागणे त्यांना बहुतेक वेळा फायदेशीर ठरते. पण खोटेपणा नक्की किती करावा ? दुसर्याने तुम्हाला गंडवल्यास तुम्ही त्याच्याशी कसे वागावे ? ह्या प्रश्नाची उत्तरे ह्या पोस्ट मधून मिळतील.

ट्रेड (व्यापार) - झिरो सम गेम इत्यादी

साहना ·
गेम थेअरी म्हणजे गणित, तर्कशास्त्र आणि मानवी स्वभाव विशेषतः निर्णय घेण्याची मानवी क्षमता ह्यांची सांगड घालणारे एक क्षेत्र आहे. अर्थशास्त्र, राजकारण, युद्धशास्त्र इत्यादीने अनेक क्षेत्रांत गेम थेअरी वापरली जाते. गेम थेअरी मधील काही संकल्पना जर आपण समजून घेतल्या तर अनेक क्षेत्रांत आपण निर्णय पद्धतीने घेऊ शकतो. गेम म्हणजे काय ? बुद्धिबळ हा एक खेळ आहे आणि ह्यांत दोन खेळाडू एक मेका विरुद्ध खेळतात. ह्या खेळाचे ठराविक नियम असतात आणि आलटून पालटून प्रत्येक खेळाडू एक निर्णय घेतो. प्रत्येक निर्णय घेण्याआधी खेळाडूंकडे काही "पर्याय" असतात.

मी

sudhirvdeshmukh ·
माझा कुठला धर्म, माझा कुठला पंथ मी कुठल्या तळ्यातला, माझा कोण संत माझी कुठली जात, कुठली उपजात नेमकी कुठल्या समईतली, मी वात निळे अंबर, हिरवा निसर्ग भगवा सुर्योदय, कोणाचा कुठला रंग हा संप्रदाय, तो संप्रदाय ज्याचा त्याचा आपआपुला समुदाय अनादी मी, अनंत मी आत्ममग्न, निसंग मी सुधीर देशमुख अमरावती https://sudhirvdeshmukh27.blogspot.in/?m=1

मादाम तुसॉ ह्यांना पत्र

सरनौबत ·
माननीय व्यवस्थापक, मादाम तुसॉ वॅक्स म्यूझियम, मुक्काम पोस्ट लंडन पत्र लिहिणेस कारण कि परवाची बातमी. तुम्ही आमच्या अतिशय लाडक्या मधुबाला चा मेणाचा पुतळा बनवणार आहात म्हणे! साक्षात विधात्याला पुन्हा इतकी सुंदर स्त्री घडवणे जमले नाही. त्याने माधुरी बनवून पाहिली, गेला बाजार कतरीना देखील केली. पण मधुबाला ची सर काही त्यांना आली नाही. तुम्ही देखील आत्तापर्यंत अतीव सुंदर पुतळे घडवले. इतके हुबेहूब कि बघणाऱ्यांचा 'पुतळा' झाला. मात्र भारतीयांचे पुतळे तुम्हांला म्हणावे तसे जमले नाहीत बुवा. बच्चन कुटुंबियांवर तुमचा इतका राग का? अमिताभचा पुतळा एखाद्या उर्दू शायर / गज़ल गायकासारखा दिसतो.