मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आरसा

प्रावि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
अजून किती दिवस आपण , असेच 'उपटत' बसणार ? कलियुगातल्या रामराज्याच्या 'अवताराची ' वाट ' बघतं बसणार ? कॉग्रेस गेलं , भाजप आलं , तरी 'गव्हर्नमेंट ' ला शिव्या द्यायची खोड जात नाय ..... अन आपलाच आरसा 'बघायची' सवय काय जडत नाय.... देशाची प्रगती -आपण नियम तोडूनही व्हायलाच पाहिजे , अन सकाळी कुठल्यातरी 'कोपऱ्यात 'जाऊन घाण केलीच पाहिजे .... दारू अन बाईच्या नादात -हाय नाय तो पैसा उडवायची हौस , अन दुसऱ्या दिवशी -सरकार आमच्या इकडं नाय पाऊस ..... शिकलेल्याना 'इनकम टॅक्स' चोरायची सवय , अन फ्लॅट पाहिजे , क्लीन पुणे , मुंबई , पवई कचरा उचलायचा सोडाच , पण करायलाच पाहिजे अन माझा भारत - युरोप सारखा दिसलाच पाहिजे ... रस्त्यावर कार चालवताना , चाकं 'झेब्रा क्रॉसिंग ' वर चालतात चालणारे मरतात , मरू देत -रस्त्यावर तर 'कुत्री 'च मरतात ... शेजारची 'तरुण' पोरगी , काय घालते , ह्यावर तीला नावं ठेवलीच पाहिजे .. अन आपण मात्र बंद खोलीत पॉर्न बघत 'हलवलंच ' पाहिजे ... शेतकरी मारतोय कर्ज घेऊन , पण दुष्काळ कुणी आणला ? किती जणांनी मिळून पाणी अडवायला गावात 'बांध' घातला ? बरं.... शेतकऱ्यांना माहित नाय -जमत नाय , मग त्या शेतकऱ्याच्या MPSC पास करून अधिकारी बनलेल्या पोराचं काय ??? आईला आपल्या पोराला , बलात्कार करू नये हे शिकवता नाय आलं ... बापाला आपल्या पोरीला , स्वतःची रक्षा कशी करायची हे शिकवता नाय आलं ... तरी पण पोलीस काय करतायेत साले - हे विचारायला सगळ्यांच तोंड उघडतात अन आपला खिसा भरला की - भरलेली लाखांची मूठ सगळेच आवळतात गव्हर्नमेंट कुणाचंही असो , इथं आपल्याला आपणच धीर द्यायचा , थोडी शिस्त अन वैचारिक कक्षा रुंदवायची गरज हाय , पण आपल्याला काय - 'पुन्हा एकदा या' असं घसा फाटोस्तर ओरडायचं कुणी थुंकला की तिथंच थुंकायचं अन कुणी मुतला की तिथंच मुतायचं ..... अजून किती दिवस आपण , असेच 'उपटत' बसणार कलियुगातल्या रामराज्याच्या 'अवताराची ' वाट बघणार ? कॉग्रेस गेलं , भाजप आलं , तरी 'गव्हर्नमेंट ' शिव्या द्यायची खोड जात नाय ..... अन आपलाच आरसा 'बघायची' सवय काय जडत नाय

वाचने 850 वाचनखूण प्रतिक्रिया 0