ईस्ट इंडिया कंपनी
हल्ली एका वादातून काही नवीन गोष्टी लक्षांत आल्या. मिपा सदस्यासाठी इथे लिहीत आहे.
अमेरिकेने इराक आणि अफगाणिस्तान भागांत जी युद्धे चालवली आहेत त्याचा अंत अजून तरी दृष्टिक्षेपाला येत नाही. त्याशिवाय सीरिया आणि येमेन इथे अजूनही अमेरिकेचे सैन्य कार्यरत आहे. चारी ठिकाणी मिळून अब्जावधी डॉलर्स चा चुराडा दार वर्षी होत आहे. इराक युद्धांत अमेरिकेने सुमारे २ ट्रिलियन डॉलर्स उडवले आहेत आणि युद्धाचा एकूण खर्च (जखमी सैनिकांचे पेन्शन, बॉण्ड्स वरील इंटरेस्ट इत्यादी ) मिळून तो सुमारे ६ ट्रिलियन डॉलर होईल. काही दिवस आधी अमेरिकन सैन्याने ९६ मिसाईल्स सीरिया मध्ये वापरली ह्यांचा एकूण खर्च १०० मिलियन इतका होता.
मिसळपाव