Skip to main content

देशांतर

पंछी बनू उडता फिरू...

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 03/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
गरमागरम धिरडी हाणली तोवर १०:४५ झाले होते. ११ ला निघायचे म्हणजे सगळ्यांना १०:४५ पासून हल्या करायला सुरू केले (पीएम ची खोड.... )शेवटी ११:०५ मिनिटांनी ७ जवानांनी साओ कॉन्राडो बीच कडे कुच केली.. तिथे पॅराग्लायडींचे कार्यालय कुठे आहे ही माहिती एप्रिल मध्ये किंमत विचारून हिंमत न झाल्याने आधीच झाली होती. तरी एकदा गुगलबाबाला शरण गेलो पेद्रो बोनीतो रँप इथे माहिती वाचली. बिगफ्लाय ह्या कंपनीची साईट बघून घेतली..

हनी बंचेस ऑफ ओट्स!

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 31/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
खाण्याच्या सीरिअल्सचे दोन रिकामे, जुने बॉक्सेस हे माझा अतिशय मौल्यवान ठेवा आहे हे सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. १९९९ साली जेव्हा मी भारतातून मिशिगन टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटीत अमेरिकेकडे यायला निघालो तेव्हा माझ्या खिशात पहिल्या सत्राच्या फीला पुरतील इतके $९३०० चे प्रवासी चेक्स होते. माझ्या शिक्षणाकरता आमच्या घरावर कर्ज काढायची तयारी माझ्या वडिलांनी चालवलीच होती परंतु माझ्या मनात मात्र माझ्या शिक्षणासाठी घरच्यांवर हा कर्जाचा डोंगर नको हे ठाम होते! पुढची चार वर्षे मी सफाई कामगाराचा मदतनीस ते प्रयोगशाळेतला असिस्टंट अशी सर्व प्रकारची कामे केली.