कधीतरी .... कुठेतरी.... थोडेसे रसग्रहण....
कधीतरी .... कुठेतरी....
.........खरेतर लेखन हा आमचा प्रांत नव्हे, तरिपण या छायाचित्रांचे थोडेसे रसग्रहण करण्याचा एक प्रयत्न.....
खालील चित्राचे चार भाग, म्हणजे आकाश, दूरचा डोंगराळ प्रदेश, खालील जमिनीचा उतार, घरे आणि त्याभोवतालची झाडे, खडक.... या चारी भागात एक सुंदर समतोल तर आहेच, शिवाय या सर्वांवर असलेले धुक्याचे एक हलकेसे आवरण या चारी भागांना बांधून ठेवते. अगदी समोरील झुडुपांचा, घराखालच्या खडकांचा, तसेच घरांच्या छपरांच्या सावलीचा भाग, लहान झाडांचे खुंट आणि मोठ्या झाडांच्या फ़ांद्या...या सर्व चित्रात विखुरलेल्या गहिर्या जागा, आणि तश्याच विखुरलेल्या प्रकाशमान जागा...
मिसळपाव