Skip to main content

छायाचित्रण

राजमाची ट्रेनींग कॅम्प - समीट माउंटेनिअर्स (१६,१७,१८ एप्रील, २०१०)

लेखक बज्जु यांनी रविवार, 02/05/2010 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या पालकांशिवाय ३ दिवस दुर रहाण्याची बहुतेक मुलांची ही पहिलीच वेळ होती. मुलं गाडीत निट चढ्तील कि नाही?, नीट रहातील ना? जेवतील कि नाही? रात्रीची रड्णार तर नाहीत ना? अशा शेकडो शंका पालकांना. त्यामुळे १६ तारखेला सकाळी ६.३० ला ठाणे स्टेशनला मुलांना सोडायला आलेल्या पालकांच्या चेहर्‍यावरच जास्त काळजी दिसत होती. मुलं एकदम बिनधास्त. मोहिमेचे आयोजक सुजीत साठे यांनी पालकांना आणि मुलांना सर्व सुचना दिल्या आणि ४१ मुलं आणि १० इन्सट्र्क्टर असे आम्ही ५१ जणं इंटरसिटी एक्स. पकड्ण्यासाठी ५ नं. प्लॅट्फार्म कडे रवाना झालो. रिपोर्टींग साठी पहाटे ६.३० ला ठाणे स्टेशन १ नं.

गडकोटांचा महाराष्ट्र माझा

लेखक योगेश२४ यांनी शनिवार, 01/05/2010 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!! महाराष्ट्रदिनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त गडकिल्यांचा हा चित्रनजराणा.
महाराष्ट्र - इथल्या मातीचे ढेकुळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाचाच, वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसचं इतिहास निर्माण करतात.
किल्ले रायगड हे तूफान स्वातंत्र्याचे, हे वादळ उग्र विजांचे!!!!

मनीमाऊ

लेखक अस्मी यांनी शुक्रवार, 23/04/2010 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
मझ्या घरचे मनीमाऊ :)

चतुर

लेखक झकासराव यांनी सोमवार, 19/04/2010 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
घोराडेश्वरला गेलो होतो तेव्हा त्याच्या अलिकडेच असलेल्या अमरदेवी मंदिरात जाउन आलो होतो. तिथेच एका पायरीवर हा चतुर बसलेला दिसला. फार हालचाल करत नव्हता म्हणुन ह्याचा फोटो सहजगत्या मिळाला. एरवी हे चतुर भलतेच तुरेतुरे असतात. फोटो मिळण कठीण असतं. 1

मोनालिसा

लेखक मॅन्ड्रेक यांनी रविवार, 18/04/2010 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, माझ्या छंदातुन केलेला एक प्रयत्न. मॉडेल - माझी कन्या -किन्नरि

घोराडेश्वर

लेखक झकासराव यांनी शुक्रवार, 16/04/2010 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसानी इकडे चक्कर मारु मारु म्हणत रहातच होत. एका रविवारी जमवलच आणि निघालो. घरुन उरकुन जायल १० वाजुन गेले होतेच. उन्हाचा तडाखा भारीच जाणवत होता. निगडीतुन हे ठिकाण एकदम जवळ आहे. देहुरोड क्रॉस केला की सोमाटणे फाट्याच्या अलिकडेच घोराडेश्वराचा डोंगर आहे. पावसाळ्यात मस्त हिरवेगार डोंगर बघुन मजा वाटत असते पण आता ओकेबोके डोंगर. 1 तिकडे गेलो. दुचाकी सावली बघुन लावली. (हो नायतर नंतर पोळुन कोण घेणार?? ;) ) पायर्‍या बसवल्या आहेत आता. पण दुतर्फा झाडी नाहिये.