एके दिवशी ऑफिसमधून येताना माझा सहकारी मित्र प्रदीप मला म्हणाला "अरे मनिष, मलाव तलाव मध्ये मी कमळे फुललेली बघितली. " हा मलाव तलाव म्हणजे आमच्या घरापासून १ ते १.५ किलोमीटर दूर असलेली एक पाणथळीची जागा. त्याच्या भोवती एक बगिचा बनवलेला. जॉगिन्ग साठी सोय केलेली.
आता इतक्या जवळ असलेल्या जागी फुललेली कमळे बघायची सन्धी मिळते आहे म्हटल्या वर आम्ही ठरवले की रविवारी सकाळी उठून तिकडे जायचे. एरवी रविवार म्हणजे झोप पूर्ण करण्याचा दिवस. पण त्या रविवारी सकाळी साडे सातला आम्ही घराबाहेर पडलो. मलाव तलाव ला पोहोचलो. तिकडच्या रखवालदाराला सान्गितले की आमहाला काही फोटो काढायचे आहेत.