मदनगड
या वर्षी थर्टी फस्ट्ला मदनगडावर जाऊया असा नुसता विषय काढ्ला आणि नाक्यावरच्या काही लोकांचे चेहरे सुतकी झाले. थर्टी फस्ट्ला गडावर ? आणि ते सुध्दा मदनगडावर ?? ~X( तिथे काय ठेवलयं ? :''( वेड**च आहेत मस्त एन्जॉय करायचं सोडून शरीराचे हाल करुन घ्यायला चाललेत #:S वगैरे वगैरे चर्चा झाल्या. मन का राजा (म्हणजे आपण आप्ल्याला हवं तेच करायचं) ही आमच्या नाक्यावरची पॉलीसी असल्याने ही अशा प्रकारची बोलणी आम्ही गडप्रेमी मंड्ळींनी अर्थातच मनावर घेतली नाहीत. गडावर दारू प्यायला आमचा कट्टर विरोध असल्याने दारुकाम करणारी ;) आणि निव्वळ मौज मजा (धांगडधिंगा म्हणा हवं तर) करणारी मंड्ळी अर्थातच आमच्या बरोबर येणार नव्हती. आधी ऊत्साहाने आम्ही येतो आम्ही येतो म्हण्णार्यांची संख्यासुध्दा थर्टी फस्ट् जवळ जवळ येत गेला तशी गळत गेली. शेवटी ३१ तारखेला पहाटे गिरीष साठेच्या मारुती ओमनीमधुन आमची सहा जणांची स्वारी निघाली.
कसारा, ईगतपुरी, घोटी फाटा असे थांबे घेत घेत आम्ही कळ्सुबाई, अलंग, मदन, कुलंग या डोंगररांगांशी जवळीक साधणार्या आंबेवाडी या गावात आलो.
आंबेवाडीच्या वाटेवर
आंबेवाडीतुन दिसणारे कळ्सुबाई
अलंग, मदन, कुलंग रेंज
महाकाय मदन आंबेवाडीतुन
आंबेवाडीतील एका घराजवळ गाडी पार्क केली. चहा प्यायला, पाणी भरुन घेतलं आणि सॅक पाठीला लावल्या. साधारण तास-सव्वा तासाच्या चालीनंतर आम्ही अलंग, मदन, कुलंग यांच्या बेचक्यात आलो.
खरी चढाईला सुरवात ईथुनच होणार होती. त्यातच आमच्या जोडीला सुशील ऊर्फ तात्या ऊर्फ वोल्वोचा ट्र्क (वजन ९८ कि.) याला मदनची उंची बघुन फेफरं यायला लागलं @) . त्याला सांभाळ्त-गोंजारत वरती घेऊन जायच होत. अलंग आणि मदन मधील खिंड म्हणजे भारी काम. सगळा अंगावरचा चढ.
शेवटी मजलदरमजल करीत, तात्याला सांभाळ्त दीड तास चढुन खिंडीच्या वरच्या अंगाला आलो. ईथुन डावी कडची वाट अलंगला तर उजवी कडची वाट मदनला जाते. येथून भंडारदराचे बॅक वॉटर आणि आजोबा डोंगर फार छान दिसत होते.
लगेचच मदनकडे मोर्चा वळवला. १०-१५ मि. पुढे गेलो आणि मदनच्या पायर्यांनी आमच स्वागत केलं.
पायर्यांहून मागे पहातो तर अलंगची महाकाय भिंत छातीत धड्की भरवत होती.
अलंग व मदन यामधील खिंड
येथुन पुढची ५-१० मिनीटाची वाट म्हणजे पाय ठेवायला जेमतेम पाऊलभर जागा, आधाराला डाव्या बाजुच्या कातळातील खोबण्या तर ऊजव्या बाजूला सरळ १,००० फुट खोल दरी अशा स्वरुपाची होती.
या वाटेवरुन पुढे आलो तर समोरच मदनचा प्रसिध्द ४० फुटी रॉक पॅच. रॉक पॅच पाशी आलो. बोल्ट मारलेले दिसत होतेच. आमच्यातला अनुभवी क्लाईंम्बर सुजीत याने रोप फिक्स केला आणि पटापट वरती गेला सुध्दा. तात्याला हे असले प्रकार नवीनच होते. तात्याला रोप फिक्स केला, खास त्याच्यासाठी झुमार सुध्दा आणलेला होता. तो त्याला दिला आणि जा म्ह्ट्ले. दोन पावल गेला, पण ९८ किलो वजनामुळे बॉडी पुलींग जमेना, असला अच्चाट प्रकार कधी केलेला नाही, मागे १,००० फुट फॉल, आणि कुठ्ल्याही क्षणी आपण पडू ही भिती यामुळे रॉक वरचं त्याचे पाय थरथरायला लागले. वेगवेगळ्या प्रकाराने समजावुन झाले पण हा पठ्ठ्या काही वरती सरकायला तयार होईना. त्याच्या या थरथरण्याला आम्ही "हेलनचा डान्स" =)) असे नाव देऊन टाकले.
सुजीत
तात्याचा हेलनचा डान्स
शेवटी कसबस तात्याला खेचून वरती घेतलं. रॉक पॅचच्या वरती काही पायर्या आणि एक छोटी गुहा होती. या गुहेतून समोर अवाढ्व्य पसरलेला अलंग सुंदर दिसत होता.
अलंगचा पसारा
या पुढ्ची वाट देखील थोडी घसार्याचीच होती. साधारण २०-२५ मिनीटे या वाटेने चढून गेल्यावर भर दुपारच्या चांदण्यात आम्ही मदनच्या गुहेत पोचलो.
मदनवरील पाण्याची टाकी
गुहेतच थोडावेळ आराम केला. झट्पट मॅगी खाल्लं. चहा वगैरे झाला, आणि मदनगडाच्या अत्युच्च्य टोकावर जाण्यासाठी निघालो. १५-२० मि.त मदनच्या टॉपवर आलो.
मदन टॉप
कुलंग गड - मदनच्या टॉपवरुन
नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येचा सुर्यास्त
रात्री मस्तपैकी साखरभाताचा बेत केला होता. जेवून गप्पा मारत बसलो. १२.०० वाजता एकमेकांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि झोपलो. सकाळी चहा-पोहे खाऊन १०.०० च्या सुमारास ऊतरायला सुरुवात केली. ऊतरताना तात्याने काही त्रास दिला नाही हे विशेष.
दुपारी १.३० च्या सुमारास ऊतरुन पुन्हा अलंग, मदनच्या बेचक्यात आलो. झट्पट मॅगी केलं आणि आंबेवाडीकडे निघालो.
कर्ण कर्कश्य संगीत नाही, आजुबाजूला दारूकाम नाही असा या वर्षी चा थर्टी फस्ट् जरा वेगळ्या पध्द्तीने साजरा केला.
गड्प्रेमी बज्जु
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
7354
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
फारच सुंदर
बज्जुभैय्या
In reply to फारच सुंदर by विसोबा खेचर
मदनगडावर
In reply to बज्जुभैय्या by jaypal
मस्त रे भिडु....
सह्ही... या
नमस्कार
In reply to सह्ही... या by मदनबाण
आयच्यान!
In reply to नमस्कार by बज्जु
झक्कास!!!!!
जबर्या!! ख
मस्तच फोटॉ
मस्त लेख
मस्तच फोटो
!!!!!!!!
मस्त....आवडल
फोटो आणि
असेच म्हणतो
In reply to फोटो आणि by प्राजु
इतकं डेंजर मला रगड...
जो ब र्या!!
एकदम भारी!!!
तुमच्या बरोबर ना येण्याची कारणे :
साहसी
मस्त आहेत .