Skip to main content

वाळूचा पाऊस

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 25/06/2013 या दिवशी प्रकाशित केले.
२५ फेब्रुवारी २०१२ ला रियाध परिसरात झालेल्या वाळूच्या वादळाची (?? पावसाची ;) ) काही चित्रे...  .  .   .   .  .  .  .  .  .
लेखनविषय:

वाचने 45413
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

हे राम... भयंकरच प्रकार आहे हा... ते अ‍ॅक्सिडेंटस द्रुतगती मार्गावर समोरचे न दिसल्यामुळे सीरियल टक्कर झाल्याने घडलेले दिसताहेत.

In reply to by गवि

वाळूचे वादळ हा खरंच भयानक प्रकार असतो. अगदी पुळणीसारख्या बारीक ते गोट्यांएवढ्या मोठ्या वालुकणांचा (गारांसारखा) सपाटून मारा चालू असतो. असल्या मोठ्या वादळात चारचाकी अडकली म्हणजे तिचे केवळ भंगारात रुपांतर होते. गाड्या पाईल-अप होतात त्याचे कमी दिसणे हे जेवढे कारण असते तेवढेच (किंवा किंचीत जास्तच) पुळणीसारखी अतीबारीक कोरडी वाळू रस्त्यावर पसरणे हेही असते... ही वाळू अगदी चिकणमातीच्या चिखलाइतकी निसरडी असते.

In reply to by बॅटमॅन

तो आहे एक अनामिक सिंदबाद... जो वाळूच्या वादळाला "तोंड" द्यायला आणि मग त्या तोंडाचे लोकांना फोटो काढून द्यायला घाबरला नव्हता !

बापरे.. ऐकले होते या वादळांबद्दल पण फोटो पहिल्यांदाच पाहिले. तुम्ही कुठुन काढले हे फोटो? हवामानखाते आधी काही सुचना देते का या वादळांची?

अल्केमिस्ट मध्ये वाचलेलं simum ते हेच काय? भारी आहे.

अल्केमिस्ट मध्ये वाचलेलं simum ते हेच काय? भारी आहे.

जबरदस्त. 'मिशन इम्पॉसिबल - घॉस्ट प्रोटोकॉल' मध्ये असे वादळ पाहिले आहे. इतके भयानक वाळूचे वादळ प्रत्यक्षात असूच शकत नाही असे वाटले होते पण आज हे वादळाचे फोटो पाहून अचंबित झालोय.

In reply to by प्रचेतस

सिनेमात बघूनच शिकतो आपण बर्‍याच गोष्टी! ;)

In reply to by प्रचेतस

ममी मध्ये पण होते की. तो टकला पुरोहीत अनक्सनामुन सोबतचा, तयार करत नस्तो का असली वादळे. त्यात त्याचा चेहरा दिसत असतो

In reply to by मालोजीराव

हो नैतर काय. इमहोटेप= इमे हो तेपे. इमे=मी आहे (ग्रीकमध्ये). तेपे=पर्वत (तुर्कीमध्ये). हो=लुप्त झालेल्या भाषेतील शब्द (भाषेचे नावही लुप्तच आहे.) अर्थः- -च्या पलीकडचा/वरचा. इमहोटेप पृथ्वीवर पहिल्यांदा तुर्कीमध्ये उतरला. नंतर ग्रीसमध्ये गेला आणि नावेतून इजिप्तला आला. मग तू कोण? असे विचारल्यावर त्याने सरमिसळ भाषेत उत्तर दिले की मी पर्वताच्याही वरचा आहे. म्हंजे एलियनच.

जबरदस्त प्रकार दिसतो आहे हा. याविषयी आणखी माहिती, ही वादळे कशी निर्माण होतात, याची पूर्व-सूचना मिळते का, वर्षातून कितीवेळा येतात, याचे काय काय परिणाम होतात, वगैरे?

In reply to by चित्रगुप्त

वातावरण धुसर करण्या इतकी वाळू हवेत पसरवून देण्याएवढी मोठी वादळे सतत होत असतात... वर्षातून १५-२० वेळा तरी. चित्रातल्या प्रमाणे मोठे वादळ वर्षा दोन वर्षातून एकाद्या किंवा कमी वेळा होते. वादळाची काहिशी पूर्वसूचना सॅटेलाईट पिक्चरवरून मिळू शकते पण त्याच्या ताकदीचा अंदाज घेणे कठीण असते. वादळाचा परिणाम म्हणजे वातावरणाचे प्रदुषण वाढते आणि श्वसनाचे विकार असणार्‍या लोकांना फार काळजी घ्यावी लागते... शक्यतो बाहेर जाणे टाळणे अथवा जरूर असल्यास मास्क घालून जाणे वगैरे. पण एक बरे आहे की वार्‍याचा वेग कमी झाला की वाळू पटकन खाली बसते... मात्र हे कधी कधी दिवस दोन दिवस होत नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वाळवंटातल्या तापलेल्या वाळूमुळे गरम झालेली हवा वर जाते आणि तेथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळे समुद्रावरची त्यामानाने थंड असलेली हवा त्या पट्ट्यात वेगाने घुसते आणि तिच्या प्रबळ प्रवाहाबरोबर वाळवंटातली वाळू उडू लागते. हे या वादळांचे मुख्य कारण.

वादळाचा पहिला फोटो भयंकर आहे पण कला दालनात अपघातांचे आणि वादळाचे फोटो टाकण्याचे प्रयोजन समजले नाही.. असो

सुरवातीचे ३ फोटो एखाद्या हॉलीवूड चित्रपटातील प्रसंग शोभतील असे आहेत. वाळुची वादेळे पाहिलीत पण असल्या डेंसिटीची नाही.

In reply to by गणपा

दुसर्‍या फोटोतली त्रिकोणी भोकवाली इमारत ३०२ मिटर उंच आहे... यावरून त्या उडालेल्या वाळूच्या ऊंचीचा आणि वादळाच्या आवाक्याचा अंदाज बांधता येईल !

भयानक प्रकार आहे. श्वसनाचा त्रास असलेला किंवा धुळीची अ‍ॅलर्जी असलेला एखादा अशा वादळात सापडला तर? :(

In reply to by पैसा

श्वसनाचा त्रास असलेला किंवा धुळीची अ‍ॅलर्जी असलेला एखादा अशा वादळात सापडला तर? तर त्याचे नशीब फार खराब असे हे नक्की ! अश्या माणसाने गाडीच्या काचा घट्ट बंद करून बसावे आणि मास्क व आपली औषधे बरोबर घेऊनच नेहमी प्रवास करावा हे उत्तम.

ह्या वादळाची वर्णने वाचली,ऐकली होती.. फोटो पाहून रौद्रता समजते आहे, स्वाती

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांचे धन्यवाद !

च्यायला, पयीलाच फटू बघून सटारली ना भौ!!! :-|