छायाचित्रण
होळी, धूळवड, रंगपंचमी
नमस्कार,
होळी, धूळवड, रंगपंचमीच्या शुभेच्छा. या निमीत्ताने विकिपीडिया करता लागणार्या मुक्त छायाचित्रांच्या विकिमीडिया कॉमन्स या ऑनलाईन संग्रहाचा थोडक्यात परिचय करून द्यावा असा उद्देश आहे. उदाहरणार्थ होळी हा लेख इंग्रजी आणि भारतीय भाषा आणि इंग्रजी विकिपीडियावर आहेच पण त्या सोबत अगदी कोरीयन नॉर्वेजीयन अशा भाषात देखील आहे. आपण विकिमीडिया कॉमन्स या संयुक्त प्रकल्पात एखादे छायाचित्र चढवले की प्रत्येक भाषेतील विकिपीडियात वेगळे चढवावे लागत नाही. त्यामुळे अजून नवीन इतर नवीन भाषेत लेख अनुवादीत झाला तर त्या भाषेत त्या देशात आपली संस्कृती माहिती होण्यास हातभार लागतो.
'क्वीन' : कंगनाच्या सहज-सुंदर अभिनयातून साकारलेली स्त्री-मुक्तीची अनोखी कथा
'क्वीन' हा कंगना रनावतचा नवीन सिनेमा.फ़्यंड्री...!
राम राम मंडळी. मंडळी, मिपावर फ्यंड्रीबद्दल उत्तम लिहून आल्यानंतर आणि इतरही ठिकाणी फ़्यांड्रीवर येता जाता चर्चा व्हायला लागल्यामुळे चित्रपट पाहण्याची उत्सूकता लागली होती. मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे. पारंपरिक चित्रपटापेक्षा काही तरी वेगळे मराठी चित्रपटातून यायला लागले आहे. वास्तवतेवर आधारित सकस कथा, ध्वनी, छायाचित्रण,कलाकार, या आणि विविध अशा बदलांनी मराठी चित्रपट जरा हटके यायला लागले आहेत. मराठी चित्रपटांना विषय फुलवता यायला लागले थेटरात शांतपणे चित्रपट बघायला जावे, इथपर्यंत मराठी चित्रपटांनी भरारी घेतली आहे, असे वाटायला लागले आहे.
माझे स्वयंपाक प्रयोग छायाचित्रण
येथे मी बनविलेल्या काही पाककृतींचे छायाचित्रण देत आहे ,बघा आवडते का??


काळा घोडा कला महोत्सव कट्टा - वृत्तांत (३)
आम्ही उत्सवस्थळी दाखल झालो. माझा या उत्सवाला हजेरी लावण्याचा पहिलाच प्रसंग. कलेचा आणि माझा काडीमात्र संबंध नाही, अगदी रेघ देखिल सरळ मारता येत नाही. पण चार लोक जातात तर आपणही जावे, लोकांना कुठे माहित असतं की मी 'ढ' आहे? मागे एकदा तर मी जहांगिरला एक चित्र प्रदर्शन देखिल पाहुन आलो होतो. मूढ मुद्रेने एका चित्रापुढे 'हे काय असावे' याचा अंदाज घेत असता तिथल्यांपैकी एकाने मला 'जाणकार' समजुन अनेक भिकार चित्रांची सहल घडवली होती वर वहीत अभिप्राय लिहावा असा आग्रह देखिल केला होता. असो.
काळा घोडा महोत्सव कट्टा - वृत्तांत (२)
प्रत्यक्ष कट्टाकारांनी अनुमोदन दिल्याने शिर्षकात आवश्यक तो बदल करण्यात आला आहे :)
तर मंडळी, आम्ही पुढे सरकलो आणि लगोलग स्टेट बँकेच्या इमारतीला अडकलो. बॅलार्ड पिअर, फोर्ट वगैरे ठिकाणी दिसणार्या दगडी इमारती मला अतिशय आवडतात. स्टेट बँक म्हणजे पूर्वीची ईंपिरियल बँक. ही बहुधा भारतातील सर्वात जुनी वाणीज्य बँक. स्टेट बॅंकेची स्थापना १९२१ सालची असली तरी तिचा उगम आहे तो १८०६ सालच्या बँक ऑफ कलकत्ता मध्ये. १९५५ साली राष्ट्रियीकरणात इंपिरियल बँक ऑफ ईंडिया चे नाव भारतिय स्टेट बँक - स्टेट बँक ऑफ ईंडिया असे झाले.
काळा घोडा फेस्टिवल कट्टा - वृत्तांत (१)
या कट्ट्याची घोषणा झाली आणि कट्टा गाठायचाच असे ठरविले. एक तर मी काळा घोडा महोत्सवाला अजुन कधीच गेलो नाही. त्याही पलिकडे मिपा गाजवणारे मुवी आणि माहितीचा खजिना असणारे रामदास यांच्या भेटीची ओढ. चार हौशी भटक्यांनी एकत्र यावं, उनाडावं, मुंबईच्या जुन्या आठवणी काढाव्यात, अनेकदा पाहिलेल्या, आपल्या नसूनही आपल्या वाटणार्या वास्तू पाहाव्यात यासारखा आनंद नाही. अशा कार्यक्रमाला रुपरेषा नसते. तो आपोआप पुढे सरकत असतो.
शनिवार ८ तारखेला सी एस टी च्या आसपास भेटायचे ठरले होते. मी थोडा आळस केला आणि आम्हाला म्हणजे माझ्यामुळे रामदासनाही जरा उशीर झाला. आम्ही घाटकोपर गाठतोय तो मुविंचा फोन!
canon photography
मी काढलेल्या close up फोटो चा एक नजारा

अवकाशाचा वेध १ : सप्तर्षी व कृष्ण विवर
रात्रीच्या वेळी आकाशात दिसणारे सप्तर्षी उर्फ Big Dipper म्हणजे हे वेद व पुराणात उल्लेखलेले सात प्रमुख ऋषी. आकाशात जे सप्तर्षी नावाचे सात तारे दिसतात त्यांची नावे :
- अंगिरस (Epsilon of Ursa Major)
- अत्रि (Delta Ursae Majoris)
- क्रतु (Dubhe; Alpha of Ursae Majoris)
- पुलस्त्य (Gamma Ursae Majoris)
- पुलह (Merak; Beta Ursae Mejoris)
- मरीचि (Alkaid; Benetnasch; Eta Ursae Majoris)
- वसिष्ठ (Mizar; Zeta Ursae Majoris).
मिसळपाव