मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आत्मक्लेश४

नंदकिशोर साळ्वे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
निवार्‍यासाठी पावसानं माझंच घर शोधलं, मग स्वागतासाठी त्याच्या मी अंथरलं पातेलं. डोळे पुसण्यास माझे पाऊस धावूनी आला, थेंब कोणता तुझा नि माझा हेच कळेना म्हणाला. ढगाच्या सावलीला डोंगर समजला डाग, पेटून उठला वणवा जेव्हां ढग म्हणाला फुलतेय बाग.

वाचने 3283 वाचनखूण प्रतिक्रिया 11

लिखाळ Wed, 09/24/2008 - 20:57
तीनही चारोळ्या मस्त ! मग स्वागतासाठी त्याच्या मी अंथरलं पातेलं. हे तर जबरदस्त ! --लिखाळ.

मनीषा गुरुवार, 09/25/2008 - 10:26
आवडल्या डोळे पुसण्यास माझे पाऊस धावूनी आला, थेंब कोणता तुझा नि माझा हेच कळेना म्हणाला. ......सुंदर

रामदास गुरुवार, 09/25/2008 - 12:53
आवडली कविता. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.