Skip to main content

चारोळ्या

जबरा नशीला ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी मंगळवार, 09/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
जबरा नशीला ! ! ! इश्काची जालिम नशा, ज्या कुणाला जाहली, मद्याची सुरई त्याने पुन्हा कधी ना पहिली ! ह्यां परी कमजोर नव्हतो, नशीले आम्ही जबरा असे, सुरई करुनिया रीती, अधरांची ही प्राषिली ! !

३ चारोळ्या

लेखक sur_nair यांनी गुरुवार, 25/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या हृदयाची स्पंदने तुझा हळुवार श्वास प्रणयी संगीताचा जणू एक नवा आभास ****** वाऱ्याचा वेगही कधी सहज मंदावतो तुझ्या गंधाने वेडा तोही छंदावतो ****** कधी तुझा स्पर्शही मला मोरपिसापरी भासे आताशा तुझे श्वासही वाटतात जणू उसासे
काव्यरस

प्रेम काव्य संग्रह

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 05/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या दोन आयुष्यांचे क्षण एकमेकांत मिसळून जाती झालो मी तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा सोबती ------------------ एका क्षणी तुला पाहिले क्षण तो खास अगदी त्या क्षणी मिळाला क्षणाला क्षणाचा सोबती ------------------ तुझ्या प्रेमातला "मी" ------------------ प्रेमात तुझ्या गुंतलो मी माझाच नाही उरलो मी प्रेमाच्या खेळात जिंकलो मी हृदयात तुझ्या व्यापून उरलो मी..... भेटलीस तेव्हा हरखलो मी हसलीस तेव्हा हर्षलो मी रुसलीस तेव्हा हुरहुरलो मी निघालीस तेव्हा हिरमुसलो मी..... तू दूर होतीस तेव्हा तुझ्या हृदयात दिसलो मी परत कधी आलीच नाहीस तेव्हा माझ्याच अश्रूंमध्ये
काव्यरस

फक्त तुझ्यासाठी ...(यावेळी कविता)

लेखक प्रभो यांनी बुधवार, 30/09/2009 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : काल तीला भेटलो...ती धड हो म्हणत नाही....तिच्यासाठी ही कविता.... तू कुठे गेलीस सखे, मला सोडून या एकांतात | तुजवाचून सर्व रूक्ष आहे, माझ्या जिवनाच्या वाळवंटात || ऐक माझ्या मनातून, तुझचं नाव येतंय | तू नसताना माझ्या प्रेमाचं शीड, उगाच हेलकावे खातंय || प्रेमाच्या या समुद्रात, उसळतायत उंच उंच लाटा | जीव घेतात गं तुझ्या या, कपाळावर सोडलेल्या बटा || नयन तुझे गहिरे, जणू मदनाचे बाण | तुझ्या एका कटाक्षापायी, येतो कंठाशी प्राण || तुझ्या डोळ्यातील काजळ, दिसते जणू चंद्रकोर | तुझ्या दर्शनासाठी, आसुसलेला गं मी चकोर || आसुसलेल्या धरतीची, धग शमवतो वरूणराजा | तुला जिवनसाथी बनवून, वाजवायचाय मल
काव्यरस

फक्त तूझ्यासाठी

लेखक प्रभो यांनी गुरुवार, 24/09/2009 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या काही चारोळ्या मी तिच्यासाठी लिहिल्या होत्या...पण तिला सांगण्याची वेळच आली नाही ..... जाउद्या मंडळी..ते पुन्हा कधीतरी... १. पारिजातक सकाळ सकाळ अंगणात पडतो पारिजातकाचा सडा जसा| रांगोळी काढताना तुला पाहिलं जीव झाला माझा वेडा तसा || २. तिळ तू जवळ असलीस की पडतं चंद्राचं चांदणं | चंद्राचा डागच मला जास्त आवडतो म्हणून तर तुझ्या गालावरच्या तिळाला न्याहाळणं || ३. असणे-नसणे तू समोर असतेस तेंव्हा बोलू देत नाहीस | तू समोर नसतेस तेंव्हा झोपू देत नाहीस || ४.वाट वाट बघत माझी होतीस उभी तू स्टॉपवर | मुद्दामच उशीर केला जीव जडलाय तुझ्या लटक्या रागावर || ५.
काव्यरस

चारोळ्या...

लेखक अशोक गोडबोले यांनी शुक्रवार, 11/09/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्ती कुंडीमुक्त लगेच जाहले कचरामुक्त कधी होणार? पदपथावरी अनंत वस्तू कुठल्या नियमाने हरणार? फुले काटे मजला गुलाब तिजला कितीक वर्षे असेल चाले आता अमुची मुलेच देती बाईंना शाळेत फुले॥ परी दिसलीस तू, हसलीस तू रूसलीस तू, रडलीस तू रागावलीस, फसलीस तू माझी परी झालीस तू॥ पट्टी मी पट्टीचा ठार आंधळा बांधून तू पट्टी डोळ्यावर पातिव्रत्याचे हे फळ का? जन्म दिला कौरवांस शंभर॥ संभ्रम झाडामागून बाण मारुनी वाली वधिला, कुठे पराक्रम? रघुकुलरित अशी का असते न्यायनीतीला पडला संभ्रम॥ सिंधू "एकच प्याला" मध

तेच तेच परत परत

लेखक गोगट्यांचा समीर यांनी गुरुवार, 06/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या चारोळी आहेत .. रोज रोज तेच तेच करून कंटाळल्याने लिहिलेल्या.. ------------- काम माझ करत करत मी घासतो मरत मरत वर्षे जाती सरत सरत तेच तेच परत परत
काव्यरस

झूम

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 19/07/2009 या दिवशी प्रकाशित केले.
तारे लुकलुक लुकलुक झूम. काळोख गुपचुप गुपचुप झूम. तपकीरी सोनेरी पाणी झूम. खिशात चंदेरी नाणी झूम. सेलीब्रेशन करायला झूम. उदासी टाळायला झूम. नवीन गावी जायचे झूम. आपल्या घरी परतायचे झूम. कविता सुचत नाहीये झूम. विडंबनच करुया झूम. आता नुसतेच झूमणार की कविता लिहीणार? ही बघ झाली की झूम. झूम. झूम.

चारोळ्या

लेखक स्वप्निल मन यांनी रविवार, 31/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
१) आभाळात मेघ दाटून आले की मला कसतरीच होत॑ तुझ्या आठवणी॑च्या पावसाने मन कासाविस होत॑ २) चातक जसा वाट पाहातो पहील्या पावसाची तसा मीही बघतोय वाट तुझ्या प्रेमाची तू फक्त एकदाच कर माझ्यावर प्रेमाचा वर्षाव न॑तर ते पावसासारखे धो धो कोसळणारच आहे माझ्यावरती
Taxonomy upgrade extras

जगायचे स्वतःलाच शोधत!!!

लेखक निशिगंध यांनी रविवार, 31/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
तुला शोधता शोधता..... मी हरवून बसलो होतो स्वतःलाच.. आता तुझे विचारही नाहीत मनात मी शोधत आहे माझे मलाच... माझे मलाच... असे काही तरी लिहायचे आणी समजुत घालायची आपल्या मनाची.. पण प्रयत्न केले नाहीत असे नाही.. खुप प्रयत्न केले तीला सांगण्याचे.. पण हरलोच ना शेवटी, कधी आजुबाजुच्यांचा विचार, तर कधी तिचाच. तिला काय वाटेल. मित्र म्हणायचे अरे सांग तीला मग तिलाच ठरवू दे ना.. त्यांना काय जाते सांगायला. मी जाईन इथुन २ महिन्यानी पण तीला अजुन २ वर्ष काढायची आहेत हया महाविद्यालयात.. आणि आईचे निराळेच.. फोटो पाहुन म्हणते छान आहे रे!!