मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भूगोल

वाट सागरदुर्गाची . . . .अर्थात सागरगडाचा ट्रेक

दत्ता काळे ·
अलिबागजवळील डोंगरावर सागरगड वसलेला आहे. सागरगडावर जाण्यासाठी वाघेडे गावांत जावे लागते. पेण-पोयनाड मार्गावर असलेल्या पेझारी फाट्यावरुन वाघेडे गावाकडे रस्ता जातो. अंतर अंदाजे अर्धा कि.मी. हे अंतर काटल्यावर आपण वाघेडे गावांत येतो. हे सागरगडाच्या पायथ्याचे गांव. गावाच्या मागच्या ठाकरवस्तीपासनं रस्ता आहे. ठाकरवस्ती डाव्या हाताला ठेवून चालत निघालं कि एक डोंगर लागतो तो पार करायचा आणि चढाई कायम ठेवायची. रस्ता बरोबर असल्याची खूण म्हणजे वाटेतच उजव्या हाताला रस्त्यालगतच भग्न अवस्थेतील एक दगडी नंदी दिसतो. नंतर अजून एक डोंगराचा टप्पा लागतो इथे वाटेवर सागाच्या पानांचा सडा पडलेला दिसतो.

भाषा हरवली म्हणजे अस्तित्व हरवते ?

भोचक ·
उत्तर भारतीयांच्या आक्रमणापुढे माघार घेत चालेला मराठी माणूस आणि त्याची भाषा आणि संस्कृती हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांच्या चिंतेचा, चिंतनाचा बनला आहे. अनेकांचे ते राजकीय हत्यार बनले आहे आणि अनेकांची दुखरी नस. शिवाय व्यक्तिगतरित्या प्रत्येकाचा या विषयाकडे पाहण्याचा आपापला चष्माही आहे. भाषा हरवली म्हणजे अस्तित्वच हरवते, असाही मुद्दा उच्चरवात मांडला जातोय. याच अनुषंगाने इथे इंदूरमध्ये रहात असल्याने मला काही आढळलं हे मांडण्याचा हा प्रयत्न... प्रामुख्याने होळकर काळापासून मराठी वर्ग इथे आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यानंतरही महाराष्ट्रातून या भागात होणारे स्थलांतर थांबलेले नाही.

माय, मावशी नि माझी लेक!

भोचक ·
जैसी हरळामाजी रत्नकिळा की रत्नांमजी हिरा निळा तैसी भाषांमाजी चोखळा भाषा मराठी फादर स्टिफन्स या आंग्ल माणसाने लिहिलेले मराठी भाषेचे वर्णन वाचून छाती अभिमानाने फुगली. तोच आमची साडेतीन वर्षाची लेक आली. तिच्या हातात बाहूली होती. तिला तिचे कपडे बदलायचे होते. तिने 'ऑर्डर' सोडली, बाबा, मला जरा बाहूलीचे कपडे 'निकलून' द्या ना ! क्षण दोन क्षण काय बोलली ते कळलंच नाही. मग मेंदूपर्यंत झण्णकन गेल्यासारखं काही तरी झालं. 'कपडे निकालके दे ना' या हिंदी वाक्यातल्या 'निकलके'चा लचका तोडून तिने मराठी वाक्याला जोडून माझ्यासमोर आदळला होता.

सुर्यग्रहण २००९ - ताजी छायाचित्रे

पाषाणभेद ·
खग्रास (पुर्ण) सुर्यग्रहण फक्त ३.४० मिनीट चालले. यानंतर सुमार १५० वर्षांनंतरच खग्रास (पुर्ण) सुर्यग्रहण भारतात होणार आहे. (चु.भू.दे.घे.) डिस्के. खालील छाया. बघतांना गॉगल वैग्रे लावावा. डोळ्यांना ईजा झाल्यास धागालेखक जबाबदार नाही. :B छाया. १ सुर्यग्रहण सुरु होतांना छाया. २ छाया.

भटकायला जाताय?

नीलकांत ·
चिंब पावसात शहराचा परिसर सोडून दूर कुठे तरी निसर्गाच्या सानिध्यात जावं. निसर्गाचे वैभव बघावं. दाट धुकं, निसरडी पायवाट, हिरवंगार रान आणि खळाळता प्रवाह हे सारं सारं बघण्याची... ह्याला स्पर्श करण्याची हौस सर्वांनाच असते. अश्या वेळ कुठे जावं हे आसपासच्या मित्रांना विचारलं जातं. मित्र भटकणारे असले तर उत्तमच. नाहीतर कधी तरी अपुरी माहिती आपल्याला मिळते. अश्या वेळी अशी भटकंती ठरवतांना आंतरजालावरील काही सुविधा आपल्याला फार उपयोगी पडू शकतात. त्यापैकी खाली काही देत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मार्ग आणि नकाशा. यासाठी दोन सुविधा खुप उत्तम आहेत.

महाबळेश्वर

सूर्य ·
बरेच दिवसात कुठे भटकंती न झाल्यामुळे कंटाळा आला होता. कॅमेराचा वापर सुद्धा बरेच दिवसात केला नव्हता. 'कॅमेरा देव्हार्‍यात ठेवला आहेस का' अशी विचारणा होत होती. त्यामुळे पुण्यात जवळपास जायचे ठरवले. महाबळेश्वरला जायचा योग आत्तापर्यंत आला नव्ह्ता. तसे एका दिवसात जाऊन येता आले असते पण मग सुट्टीचा फायदा काय, म्हणुन २-३ दिवस गेलो. तिथली काही चित्रे.

भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाग २

सातारकर ·
भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाग १ उत्तर आणि दक्षिणेत फार फरक आहे. उत्तर ही conservative आहे तर दक्षिण पुरोगामी. उत्तर अंधश्रद्ध (superstitious) आहे तर दक्षिण वास्तववादी (rational). दक्षिण शैक्षणिकद्रूष्ट्या पुढारलेली आहे तर उत्तर मागासलेली. दक्षिणेची संस्क्रूती आधुनिक आहे तर उत्तरेची प्राचिन. अशा स्थितीत उत्तरेच वर्चस्व दक्षिण सहन करेल काय. आधीच दक्षिण उत्तरेपासून विभक्त व्हायच्या प्रयत्नात असल्याची लक्षण आहेत. २७ नोव्हेंबर १९५५ च्या टाइम्स ऑफ इंडीया मधे आलेला श्री.

भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाग १

सातारकर ·
मराठी - अमराठी वाद आज अगदी ऐरणीवर आला आहे अस मला वाटत होत. प्रत्यक्षात स्वतंत्र भारताच्या जन्माआधीपासूनच हे भांडण चालू आहे अस एकंदरीत उल्लेखांवरून दिसून येत. कदाचित मिपाकरांना ह्यातल्या बय्राचश्या गोष्टींची माहीती असेल देखील पण मला बहुतेक सगळच नविन होत म्हणून माझ्यासारख्यांसाठी हा लेखन प्रपंच. राज ठाकरेंच्या भाषणात त्यांनी बाबासाहेबांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला होता. त्यांच Thoughts On Linguistic States (१९५५) हे पुस्तक नुकतच वाचल. त्यात त्यांनी ह्या समस्येच्या वेगवेगळ्या बाजूंचा सविस्तर उहापोह केला आहे.

राऊरकेला

SwanandSolanke ·
दिड वर्षांपूर्वी मला स्वप्नात देखिल वाटले नव्हते की, मी एम् टेक करण्यासाठी ओडिसा राज्यात जाईल. ज्या राज्याचा उल्लेख फक्त महानादीच्या पुरापूरता आणि रथ यात्रेपूरता येतो, त्याच राज्यात एक भारत सरकारच्या कायद्यानुसार राष्ट्रीय महत्वाचे इंजीनियरिंग महाविद्यालय आहे, राष्ट्रीय तंत्रद्न्यान संस्था, राऊरकेला , हे त्याचे नाव. असो, मी मिसल पावचा नुकताच सदस्य झालो, भटकंती हा माझ्या अनेक छंदान्पैकी एक, म्हणुन सुरुवात करतांना या राज्याचे सौंदर्य मी आपल्या समोर ठेवत आहे. ओडिसा राज्य जितके निसर्गसुन्दर तितकेच कमालीचे विरोधाभासी आहे.

आफ्रिका!!! आफ्रिका!!!

बिपिन कार्यकर्ते ·
माझ्या लहानपणी आमच्या घरी एक थोडा गंज लागलेला, पोचे पडलेला, पत्र्याचा पृथ्वीचा गोल होता. अजून एक, माझा सगळ्यात धाकटा काका मॅट्रिकला असताना त्याने घेतलेला 'ऍटलस' होता. मला आठवतंय तेव्हापासून ह्या दोन्ही वस्तू माझ्या अवतिभोवती असायच्याच. मला त्या दोन्ही गोष्टी खूपच आवडायच्या. मी कायम त्यात जगातले निरनिराळे देश, त्यातली गावं वगैरे बघत बसायचो. मी चौथीत असे पर्यंत मला इंग्लिश येत नव्हतं. पण पाचवी मधे ती पण अडचण दूर झाली. पाचवी संपेपर्यंत मला सगळ्या देशांची नावं आणि त्यांच्या राजधान्या वगैरे पाठच होऊन गेल्या. माझी आई पण कधी कधी माझ्या बरोबर बसायची. आम्ही (ती आणि मी) एक खेळ पण खेळायचो.