मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महाबळेश्वर

सूर्य · · कलादालन
बरेच दिवसात कुठे भटकंती न झाल्यामुळे कंटाळा आला होता. कॅमेराचा वापर सुद्धा बरेच दिवसात केला नव्हता. 'कॅमेरा देव्हार्‍यात ठेवला आहेस का' अशी विचारणा होत होती. त्यामुळे पुण्यात जवळपास जायचे ठरवले. महाबळेश्वरला जायचा योग आत्तापर्यंत आला नव्ह्ता. तसे एका दिवसात जाऊन येता आले असते पण मग सुट्टीचा फायदा काय, म्हणुन २-३ दिवस गेलो. तिथली काही चित्रे. आवडली तर जरुर कळवा. धुक्यातले महाबळेश्वर Fog एलिफंट हेड कडे जाताना Going towards elephant head एलिफंट हेड वरुन दिसणारा नजारा From Elephant head केट्स पॉईंट Kates Point सनसेट पॉईंटवरुन दिसणारा सुर्यास्त Sunset DSC_0036 - सूर्य

वाचने 7848 वाचनखूण प्रतिक्रिया 13

मिंटी 13/06/2009 - 15:57
सुर्य वेलकम बॅक !!!!!!!!!!!! :) नेहमीप्रमाणेच उत्तम फोटो :) आवडले......

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 13/06/2009 - 16:05
सुंदर फोटो खेचले, सर ! केट्स प्वॉइंट आणि सनसेट पॉइंटचा फोटो लैच भारी ! अजून येऊ दे ! -दिलीप बिरुटे

मदनबाण 13/06/2009 - 16:37
एकदम झकास फोटु हाइत... :) मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor

मस्त कलंदर 13/06/2009 - 18:25
सूर्यास्ताचा फोटो तर अप्रतिम..!!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

टारझन 13/06/2009 - 18:26
वा !! लै भारी .. मज्जा आ गया !! महाबळेश्वरला बाईकवर बर्‍र्‍याचचा गेलोय ... महाबळेश्वराला जाणार्‍या रोड वरून देखिल विलोभणिय डृष्य डिसटाट!! सुर्या !! लेका सुटीचा सदुपयोग चालुये तर !! - टार्य

सूर्य 14/06/2009 - 12:03
जवळच्या दॄष्याचे कलर व्यवस्थित कॅच झाले आहेत तर लांबचे दृष्य थोडे फिकट आले आहे. शेवटच्या चित्रात तसे जास्त दिसतय. त्याबद्दल म्हणत आहात का ? (कुणी तज्ञ मार्गदर्शन करेल का ?) - सूर्य.

प्राजु 15/06/2009 - 01:31
फारच सुंदर!! मन एकदम प्रसन्न झालं. सगळेच फोटो आवडले. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

क्रान्ति 15/06/2009 - 08:36
सगळेच फोटो सुरेख. सूर्यास्त तर भन्नाटच! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

सूर्य 15/06/2009 - 13:18
प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद. -सूर्य.