भटकायला जाताय?
चिंब पावसात शहराचा परिसर सोडून दूर कुठे तरी निसर्गाच्या सानिध्यात जावं. निसर्गाचे वैभव बघावं. दाट धुकं, निसरडी पायवाट, हिरवंगार रान आणि खळाळता प्रवाह हे सारं सारं बघण्याची... ह्याला स्पर्श करण्याची हौस सर्वांनाच असते.
अश्या वेळ कुठे जावं हे आसपासच्या मित्रांना विचारलं जातं. मित्र भटकणारे असले तर उत्तमच. नाहीतर कधी तरी अपुरी माहिती आपल्याला मिळते. अश्या वेळी अशी भटकंती ठरवतांना आंतरजालावरील काही सुविधा आपल्याला फार उपयोगी पडू शकतात. त्यापैकी खाली काही देत आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे मार्ग आणि नकाशा. यासाठी दोन सुविधा खुप उत्तम आहेत.
याहू.कॉमचे याहू मॅप ही सुविधा आपल्याला एका शहरापासून दुसर्या शहरापर्यंत कसे जायचे याचा लगतचा मार्ग शोधून देते. आणि हो महाराष्ट्रातील तालूका पातळी पर्यंत सुध्दा ही सोय उपलब्ध आहे.
फक्त नकाशा दाखवून ही सोय थांबत नाही तर गाडी कशी न्यावी? कुठे वळवावी ? आदींची सुध्दा माहिती देतं. ही सगळी माहिती आपल्या मोबाईलवर एसएमएस करून सोबत नेऊ शकतो.
याहू मॅपचा पत्ता http://in.maps.yahoo.com/ असा आहे.
पुणे ते जेजूरी जाण्याचा मार्ग यात असा दाखवलेला आहे. सोबतच बाजूला माहिती दिलेली आहे.
अशी सुविधा गुगल सुध्दा देतं. गुगल मॅप मध्ये सुध्दा अश्या प्रकारे दोन ठिकाणं देऊन त्यांच्यातील रस्त्यांची माहिती आपण घेऊ शकतो. अंतर , वळण आदींची माहिती ते देतं. एवढंच नाही तर नकाशावर एखादा मार्ग बदलता सुध्दा येऊ शकतो.
गुगल मॅपचा पत्ता http://maps.google.co.in असा आहे.
खालच्या चित्रात पुणे ते जेजूरी असा मार्ग दिलेला आहे. सोबतच बाजूला माहिती सुध्दा दिलेली आहे.
हे सर्व दोन शहरांच्या मध्येच शक्य आहे असं नाही तर पुण्यातील दोन ठिकाणांमधीक अंतर सुध्दा याच पध्दतीने काढता येईल. किंवा मार्ग शोधता येईल.
पुण्या भोवतालचे पर्यटन स्थळे सांगणारी काही संकेतस्थळे खाली देत आहे.
http://www.aroundpune.com/
http://www.punediary.com/picnic_spots.html
http://www.punesite.com/
http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/html/MaharashtraTourism/Default.aspx?strpage=../MaharashtraTourism/CitiestoVisits/Pune/PuneAround.html
जाता जाता : गुगलची स्थानिक सेवा वापरून आपण पुण्यातील सध्या चालू असलेले चित्रपट, त्यांच्या वेळा सुध्दा बघु शकतो.
याचा पत्ता http://www.google.co.in/movies असा आहे.
याशिवाय तुम्हाला काही माहिती असेल तर येथे नक्की द्या.
- नीलकांत

वाचने
5437
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
सुरेख माहिती रे नीलकांत ! धन्यवाद.. :)
अवांतर - लेखणीला फार आराम देता बुवा तुम्ही.... लिहित चला..अधुन मधुन.. :)
--अवलिया
In reply to सुरेख by अवलिया
हेच म्हणतो.
लेखणीला फार आराम देता बुवा तुम्ही.... लिहित चला..अधुन मधुन :-)
In reply to सुरेख by अवलिया
ही घ्या गड किल्ले फिरायला जाणार्यानो ही साईट पहा
http://www.raanvata.com/index.html गड किल्यांची माहिती कसे जायचे वैगेरे सर्व माहिती आहे त्यात
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
In reply to सुरेख by अवलिया
असेच बोल्तो
फारच उपयुक्त माहिती. अनेकानेक धन्यवाद नीलकांत.
मोहन
धन्यवाद, अतिशय उपयुक्त माहिती !
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
धन्यवाद नीलकन्त.
आमच्या घाशीरामबुवांनी एक मस्त दुवा दिलाय.
रानवाटा हे संस्थळ काही ठराविक किल्यांची माहिती, ढोबळमानाने तिथपर्यंत जाण्याचा रस्ता वगैरे दाखवतं..सोबतच, ह्या किल्ल्यांवर गेलंच पाहिजे बॉ अशी ओढ लावणारे मस्त फोटोही दिले आहेत.
तर मंडळी, हॅप्पी ट्रेकिंग हां :) (च्यायला, काय अस्सल मराठमोळं विंग्रजी झाडलं नै मी? :) )
In reply to कालच.... by धमाल मुलगा
खूपच छान साईट आहे.
दुव्याबद्दल धन्यवाद घाशीरामबुवा.
नीलकांतनी दिलेली माहितीही उपयुक्त आहे.
नीलकांत भाऊ, घाशीराम भाऊ
आपले धन्यवाद!
फारच उपयुक्त माहिती..
लिहित रहा असेच...
-
कोकणी फणस
In reply to नीलकांत, घाशीराम by आशिष सुर्वे
म्हणतो, उत्तम माहितीपूर्ण लेख.
वा छान माहिती.
आपले एस.टी. महामंडळ यांचे वेळापत्रक
मजा करा .. सांभाळुन ... जीव राखुन ...
निसर्ग जेवढा सुंदर, लोभसवाणा तितकाच निष्ठूर आणि क्रुर हे लक्षात ठेवा
सृष्टीचा अनमोल खजिना, फक्त आणि फक्त निसर्ग..
एकच विनंती : जाल तेव्हा कृत्रीम वस्तुंनी याचे सौंदर्य भंग करू नका. मद्यपान, धुम्रपान आदी गोष्टी टाळा. कोपर्यात बसुन प्रणयी चाळे करुन स्वतःची लाज उघडी करु नका. प्लॅस्टीकची हर एक गोष्ट परत आणा, तिथेच टाकुन सुशिक्षितेतील अशिक्षितपणा जग जाहीर करु नका!!
निसर्गावर प्रेम व श्रध्दा आहे म्हणुन आनंदी .. मी हर्षद आनंदी
धन्यवाद नीलकांत, घाशीराम आणि हर्षद आनंदी. खूप उपयुक्त माहीती आहे. ट्रेक्षितीझ वर पण खूप माहीती आहे.
-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------
'मी' भाऊ
तुमची माहिती पण उपयुक्त आहे!
-
कोकणी फणस
www.trekshitiz.com ही ट्रेकींगसाठी सर्वोत्कृष्ट
सुरेख