Skip to main content

बालकथा

< निशःब्द >

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 13/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/25136 सुरेश चे लग्न जमत नसते त्यामुळे तो टेन्शन मधे असायचा. आज बुधवार होता. बुधवारी एक कविता करणे हा सुरेशचा नियम होता त्यामुळे तो आजतरी बाहेर जाणार नव्हता. मात्र लग्न जमत नाही या तेन्शन मुळॅ त्याच्या बुधवारच्या कविता आटल्या होत्या. इतक्यात रमेश चा फोन आला " काय अरे सुरेश बाबांची प्यान्ट टेलरकडुन आणायची विसरलास.

नायक क्रमांक एक

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 02/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

गाल चोळ फक्त

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 11/12/2012 या दिवशी प्रकाशित केले.
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,

माझी चार अंग वस्रे

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 21/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे - तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे - तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे - तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे - तीच्या फारसे जवळ जाउ नका.

तुझी पुलावर आठवण येते... एका गीताची ओळख .. राग पूलबहार

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 06/09/2012 या दिवशी प्रकाशित केले.
हिमशिखरांतून खळखळ गाते मनमंदीर तर झगमग झुलते कुणास कोणी हरवून जेते तुझी पुलावर आठवण येते. ---- काव्यजालिंदरसार , सर्ग २५, ऋचा ५१ काही घटना अशा असतात की मनावर त्यांचा जो परिणाम होतो तो पुसता येत नाही... कितीही काळ गेला तरी. हिमशिखरे , हिरवळ, खळाळत वाहणारी नदी, डोंगरउतार , नदी पार जाण्यासाठीचा लोखंडी पूल... असं दृश्य समोर आलं की मन आठवणीत हरवून जातं. तिच्या आठवणी, नदीच्या आठवणी ,पुलाच्या आठवणी.. असो... पुलबहार रागाची ही परफ़ेक्ट सिचुएशन. या पुलबहार रागाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे गाणं " तुम याद ना आया करो"..

<पिवून हय क्यु?>

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 02/08/2012 या दिवशी प्रकाशित केले.
दारोळ्या १. प्यासा बार मंडई समोर बाटल्या रित्या २. उठला नाना लावे समाधी तुळशी बागेत ३. नाच पराचा हैदोस वाचताना मोडते समाधी प्रेरना स्त्रोतः http://misalpav.com/node/22407#comment-416944

फीस्ट (ऊर्फ फेसबुकचे इनोदी स्टेटस)

लेखक रमताराम यांनी गुरुवार, 19/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आजच चेपुवर एका ग्रुपमधे एका सदस्याने अत्रंगी फेसबुककरांच्या लीलांचा विषय काढला. त्याने (त्याची परवानगी न विचारल्याने नाव देत नाही, पण स्टेटस हा 'ओपन टू आल' मामला असल्याने इथे पेस्टायला हरकत नसावी.) त्याने एका फेक नावाने आलेल्या दीडशहाण्याच्या स्टेटस नोटस ची यादी दिलेली ती अशी. _______________ त्यांची सर्व 'भाशा'वैशिष्ट्यासह साधारण सूची येणेप्रमाणे: १)(भारतीय प्रमाणवेळ ७.२०) : Hy, frends........haw r yoo? gud mornig.. २) (भारतीय प्रमाणवेळ : ८.१०) oopeeth khayla yaa@Kurundwad 3)(भा.प्र.वे. ११.००) chyayla, raaw kantalaa ala raao..yetaaw kaa nadiwar dumbuya? 4)(भा.प्र.वे.

सरप्राईज टेस्ट आणि गोंधळलेला परिक्षक.

लेखक गणपा यांनी बुधवार, 11/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मधली सुट्टी संपली आणि नव्या तासाचा टोला पडला. विज्ञानाच्या बाई वर्गात शिरल्या तसा पोरांचा कलकलाट थांबला. बाईंनी पुस्तक उघडुन नवा धडा शिकवायला घेतला. आजचा धडा होता 'मुळं'. बाईंनी फळ्यावर जमतील तशी चित्रं काढत वेगवेगळ्या मुळांचे प्रकार सांगीतले. उदाहरणं ही दिली. लेकीच्या मनात बाईंची परिक्षा घेण्याची लहर आली. उत्तर माहित असतानाही कार्टीन बाईंना प्रश्न टाकला. "टिचर स्वीट पोटॅटो इज अ स्टेम ऑर रुट?" कुणी रताळं 'मुळ' की 'खोड' असं विचरल्यावर पटकन बेधडक 'मुळ' उत्तर आलं असतं. पण 'स्वीट पोटॅटो' म्हटल्यावर चटकन गोंधळ उडणे स्वाभाविक आहे.

जानी दुष्मन एक अनोखी प्रेम कहानी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 12/06/2012 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे वाईट चित्रपटांच्या काही कॅटेगर्या असतात. वाईट, खुप वाईट आणि अशक्य वाईट. याच्या व्यतिरिक्त एक क्याटेगरी आहे जी केवळ २-४ चित्रपटात संपु शकते. जानी दुष्मन त्यापैकी एक. चित्रपटाचे नाव खुप जालीम आहे. तुमचा एखादा जानी दुष्मन असेल तर त्याला खुर्चीला बांधुन ठेवुन हा चित्रपट दाखवावा. त्याला अजुन टॉर्चर करायचे असेल तर याच चित्रपटातले "जावेद भाई सो रह्यले है" हे गाणे चालीवर पाठ म्हणुन दाखवायची शिक्षा द्या. एकतर तो दुष्मनी सोडुन देइल किंवा दुनिया. दोन्ही तुमच्या साठी चांगलेच आहे.

एन डी तिवारींची सत्वपरीक्षा

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 29/05/2012 या दिवशी प्रकाशित केले.
कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, आंध्रचे माजी राज्यपाल एन डी तिवारी (वय ८६) यांची आग्नि परीक्षा होते आहे. याबाबतची हकीकत अशी रोहित शेखर यांच्या पितृत्वाच्या वादावरून डीएनए चाचणीस नकार देणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांच्या रक्ताचे नमुने आज (मंगळवार) डीएनए चाचणीसाठी घेण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने तिवारी यांना डीएनए चाचणीसाठी आजपर्यंत रक्‍ताचे नमुने देण्याचा आदेश दिला होता.