Skip to main content

विरंगुळा

पक्षांची सकाळ (भाग - १)

लेखक जागु यांनी मंगळवार, 29/11/2011 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
दर रविवरी मी सकाळी कॅमेरा घेऊन टेरेसवर, अंगणात किंवा आमच्या बेडरुमच्या खिडकीत बसते. कारण ह्या वेळी पक्षी कोवळे उन अंगावर घेण्यासाठी झाडांच्या फांद्यांवर बसायला येतात. इतर दिवशी फांदिवर बसायला आणि कॅमेरा हातात असायला योगायोग जुळून आला तर एखादा पक्षी कॅमेर्‍याच्या पिंजर्‍यात अडकतो. माझ्याबरोबर माझी मुलगीही तोंडावर बोट ठेउन निरिक्षण करते. कारण तिला माहीत आहे जर आपण आवाज केला तर पक्षी उडून जाणार.

हिर्‍यांचे हार

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 25/11/2011 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळच्या कोवळ्या उन्हात लुसलुशीत गवतावर फिरत असताना अचानक पायाशी एका गवतहीन भागात एक सुबक जाळे दिसले. shoot निरखुन पाहता लक्षात आले की सूक्ष्म दवबिंदुंनी जाळ्याचे धागे पूर्णतः आच्छादले गेले आहेत. प्रत्येक थेंब सुबक गोलाकार पैलु न पाडलेल्या पण उपजतच गोलाकार असलेया हिर्‍यासारखा आणि जाळ्याचा प्रत्येक धागा हिर्‍याच्या हाराच्या एकेका पदरासारखा. जसजसा प्रकाश त्या जाळ्यावर खेळु लागला.

खेकड्यांची कलाकुसर

लेखक जागु यांनी शुक्रवार, 25/11/2011 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही समुद्रकिनार्‍यावर गेलो की ओहोटी असेल तर किनार्‍याच्या ओलसर वाळून हमखाच खेकड्यांची बिळे दिसतात. मला ही बिळे पहायला नेहमीच आवडतात कारण त्या बिळांच्या बाजूला सुंदर नक्षीकाम तयार झालेले असते. हे खेकडे अगदे छोटे असतात. मधूनच ते तुरु तुरु किनार्‍यावर चालतानाही दिसतात.

सहज

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा सहज असे वाटले कि स्वप्नांच्या गावी फिरून यावे .. थोडेसे आठवणींचे गाठोडे घेऊन एकटेच बाहेर पडावे .. निवांत स्वतः स्वतःला शोधून पाहावे. काही तरी जुने फिरून नव्याने मिळते का पाहावे .. नाही जरी मिळाले तरी जुने विश्व पुन्हा एकदा अनुभवावे .. म्हणून मग आठवणींचे गाठोडे उघडून बसले नि - त्यात कधी हरवून गेले माझे मलाच कळले नाही. स्वप्नांच्या गावी जाण्याची गरजच जणू उरली नाही. जुनीच स्वप्ने पुन्हयांदा नवी वाटू लागली. मला पण माझी भीती वाटू लागली. पण स्वप्नेच ती किती वेळ सुखावण्याची ताकद असणार त्यांच्यात ?? परिस्थितीचे भान दिल्याशिवाय ती तरी कशी सत्यातून जाणार ? मी पण मग हट्टाला पेटले.

(( Sonar of Thoughts ! ))

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 21/11/2011 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/19646. धनाजीरावांच्या नायकाच्या मनातील भावना व्यक्त करणे हे तसे अवघडच आहे मात्र (( Sonar of Thoughts ! )) . समोर अथांग समूद्र, काठावर मनाचा अथांग सागर आणि हे सगळं पाहायचं, अनुभवायचं सोडून बावळटपणे आपला फोटो काढणार्‍याकडे निर्विकार वृत्तीने पाहणारा हा धनाजीरावंचा नायक. त्यानी काढलेला एक फोटो, शेखाडीला*. याच्यावर काही ओळी लिहिता आल्या तर बघा. असे आवाहन केले होते त्या तिथे जवळच नायकाने नुकत्याच खाल्लेल्या कागदावर या ओळी टंकलेल्या होत्या सगळ्यात उत्तम कवितेला एक छोटेसे बक्षीस (बाकी शुन्य हे पुस्तक**).....

शटर

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 21/11/2011 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
1 मध्ये सपाट्याने काही हॉरर चित्रपट बघितले होते. त्यातील 'अ टेल ऑफ टू सिस्टर्स' आणि 'अ‍ॅकेशिआ' ची ओळख ह्या आधी करून दिलीच आहे. ह्याच यादीतला आणखी एक चित्रपट म्हणजे 'शटर'. 'अ टेल ऑफ टू सिस्टर्स' आणि 'अ‍ॅकेशिआ' हे काहीसे गडद गडद अंधारात घडणारे , मानसिक आंदोलने दाखवणारे चित्रपट होते, मात्र शटर ह्यापेक्षा पूर्णपणे भिन्न आणि सतत तुमच्या मनावर एक दडपण ठेवून असणारा चित्रपट.