Skip to main content

विरंगुळा

विरंगुळा — मनोरंजन आणि हलक्याफुलक्या मराठी लेखनाचा विभाग. विनोदी किस्से, गमतीजमती आणि विरंगुळा देणारे मराठी साहित्य येथे वाचा.

" एका ठाणेकराच्या बुद्धीच ( ? ) सुट्लेल ग्रहण " ;)

लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 13/01/2012 13:20 या दिवशी प्रकाशित केले.

( सदर धागा हा केवळ निखळ मनोरंजनासाठी आहे :) )
चू.भू.दे.घे.
" एका ठाणेकराच्या बुद्धीच ( ? ) सुट्लेल ग्रहण " ;)

***************
मला आता घरच्यांपासून काहीही लपवायचं नव्हत.
नाश्त्याला बसलेले असताना.. मी सर्व हकीकत सांगून टाकली
उर्मिलाचा चेहरा. भयाने पांढरा फाटक पडलेला .. आई पण हादरलेली.. बाबांच्या कपाळावर आठ्या पडलेल्या..
मग कोणीच काही बोललं नाही.
मग बाबाच म्हणाले, काल भाटे सांगत होते.. त्यांनी लिफ्ट उघडली तेंव्हा तू खाली पडलेला होतास.. आणि तुझ्या अंगावर ३, ४ काळी मांजर होती.. ती नंतर जिन्यातून पळून गेली .

कॅमेरा vs कॅमेरामन

लेखक सौरव जोशी यांनी गुरुवार, 12/01/2012 01:25 या दिवशी प्रकाशित केले.

फोटोग्राफी हा माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय, स्वतःला जरी तांत्रिक ज्ञान आणि त्यातली कला अवगत नसली तरी चांगल्-वाईट कळण्या इतपत फोटोग्राफी कळते (असा माझा अंदाज).

खादाड कंपू-२०१२

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 10/01/2012 17:56 या दिवशी प्रकाशित केले.

या वेळी कट्टा जाहिर धागा काढुन ठरलेला असल्यामुळे,इतर अनेक मि.पा.करांप्रमाणे कट्ट्याविषयीची कल्पनाचित्र(जागा आधीच माहित असल्यमुळे ;-) ) आंम्ही मनात तयार केलेली होती.परंतू प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचल्यावर मात्र,हाटीलच्या भायेर(च)-''बनीयन ट्री''खाली(आमच्या आधी)जमलेली मेंबरं पाहुन आमी जरा शंकाकुल झालो होतो,म्हटलं...आधी आलेल्या बनीयन लेंगा प्रस्तावानुसार शेजारच्या गाडीत ती व्यवस्था केलेली आहे कि काय..?आणी नंतर सगळी मेंबरं.सॉरी सॉरी सभासद(हां आता कंसं सभ्य वाटलं बरं..!)जमल्यावर प्रत्येकाचं माप-काढुन त्या प्रमाणे ड्रेपरी वाटप वगैरे ठरलय की काय..?पण हाटीलच्या दरवाज्याजवळ गाडी(सॉरी टू व्हिलर ;-) )लाव

शिशिराची चाहूल

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 09/01/2012 10:12 या दिवशी प्रकाशित केले.

पाने गळू लागली आणि झाडांवर पक्षी दिसू लागले.

म्हणजे पाने कमी झाल्यामुळे ते झाडावर येत आहेत असे मला म्हणायचे नाही तर पाने कमी झाल्यामुळे ते दिसू लागले. फुले गळाल्यामुळे फुलातले किडे खाणारे छोटे पक्षी गायब झाले आणि त्याची जागा घेतली झाडांच्या टणक शेंगा खाणार्‍या पक्षांनी. मैनांनी, आणि पोपटांनी. अर्थात एकदा त्यात एक हळद्याही घुसला होता. त्याचा सुंदर पिवळा रंग बघताना भान हरपते. त्याचाही फोटो टाकला आहे.

पोपटांना चेहरा असतो आणि त्यावर भाव उमटतात हे आपल्याला हे फोटो बघितलेत तर उमगेल. आणि त्यांच्याही भन्नाट स्टाईल्स असतात...........

(चितळेबंधू सांगतायत बाकरवडीच्या युक्त्या )

लेखक प्रचेतस यांनी रविवार, 08/01/2012 09:32 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा: चितळेबाबा सांगतायत स्वरक्षणाच्या युक्त्या

मित्र हो,
चितळेबंधू मिठाईवाले आपणास माहीतच आहेत. त्यांच्याबद्दल आपण अनेकदा वाचले आहेच. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणखी एक पैलू सादर करत आहे.

दी क्लिन (बोल्ड) पिक्चर!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी गुरुवार, 05/01/2012 20:20 या दिवशी प्रकाशित केले.

दी क्लिन (बोल्ड) पिक्चर!
त्या पिक्चरच्या नावात जरी ‘डर्टी’ शब्द मुद्दाम टाकला असला तरी एका सत्यकथेची ती क्लीन स्टोरी असून ती पाहतांना त्यातील बोल्ड सीन्स ओघानेच अंगावर येत राहतात व नेमकं फिल्म इंडस्ट्रीत असंच घडतं का? या मंथनात रंगलेला प्रेक्षकच अखेरीस क्लीनबोल्ड होऊन थिएटरच्या बाहेर येतो...
कथानक सर्वांना परिचित वाटावं असंच असलं तरी यशाच्या शिखरावर असतांना अल्पावधीत प्राप्त केलेलं ते भौतिकसुख कसं बोचू लागतं, कसा पलटवार करू पाहतं आणि एकदा जिंकलेला जुगार कसा लगेच हारावा लागतो याचं मोठं संयमी चित्रण करण्यात फिल्म यशस्वी ठरली आहे.
थोडक्यात ‘विषय’ असा फुलत जातो...

काही किस्से...

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 05/01/2012 09:42 या दिवशी प्रकाशित केले.

जालरंग प्रकाशन दरवर्षी ’शब्दगाऽऽरवा’ हा हिवाळी अंक (e-Publication) प्रकाशित करते. ह्या वर्षीच्या 'शब्दगाऽऽरवा २०११' मध्ये प्रकाशित झालेला माझा एक लेख इथे पुन: प्रकाशित करतो आहे.

अशी गाणी पाठवा.

लेखक सुनिल पाटकर यांनी मंगळवार, 03/01/2012 22:31 या दिवशी प्रकाशित केले.

अनेक चित्रपटात मानवी शरिरांच्या विविध अवयवांवरून गाणी लिहिली गेली आहेत,मित्रानो चित्रपट म्हटला कि दिल शब्द असलेले गाणे त्यात हमखास असते.दिल वगळता ईतर अवयवांवरून लिहिलेली गाणी आपण शेअर करुया .हिंदी, मराठी दोन्ही भाषा चालतील.
आपल्या मराठी गाण्यावरून सुरुवात करतो.या गाण्यात डोळे अवयव आला आहे.

डोळे कशासाठी ? कशासाठी ?
तुला साठवून मिटून घेण्यासाठी