प्लॅनेट ऑफ एप्स् (सिरिज)
विसु. : ही चित्रपटाची ओळख वा परिक्षण नाही.
फार तर सहावी सातवीत असेन, तेव्हा दुरदर्शनवर शनीवारी की रविवारी रात्री इंग्रजी चित्रपट लागायचे. मराठी माध्यमवाले आम्ही, आमचं इंग्रजी यथा तथाच होतं. (कोण रे तो अजुनही तसच आहे म्हणतोय?) पण इंग्रजी सिनेमे आवडायचे. मुकपट समजुनच पहायचो. तर एका शनीवारी की रवीवारी रात्री मामाचा फोन आला की एक मस्त चित्रपट लागाय बघ. तेव्हा वाहिन्यांच जंजाळ नव्हतं त्यामुळे दुरचित्रवाणीसंच लावताच चित्रपट नुकताच चालु झालेला दिसला पण तरी चित्रपटाचं नाव आधीच येउन गेलं होतं.
मिसळपाव
बुधवारी खिद्रापूरला जायचे ठरले आणि नाही म्हणणार्या बायकोला गाडीत टाकले व दूपारी १२ वाजता पुणे सोडले. खिद्रापूर का ? कारण साधे. खिद्रापूरचे मुर्तीकाम हे फार प्राचीन कलेचा नमुना म्हणून ओळखले जाते. या देवळाचे वास्तूशास्त्र हे आगळेवेगळे आणि अचूकतेचा एक मापदंड ठरावा असे आहे. पुण्याहून इस्लामपूर-सांगली-जयसिंगपूरला पोहोचलो. जयसिंगपूरला हॉटेल शांभवीत मुक्काम टाकला. गाडी चालवून दमल्यामुळे जेवायच्या अगोदर अपेयपानाचा कार्यक्रम उरकून ताणून दिली.