मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोकण दर्शन (भाग - २)

जागु · · कलादालन
२१) वेळणेश्वरला आम्हाला अगदीच संध्याकाळ झाली म्हणून आम्ही तिथल्याच समुद्रकिनार्‍या जवळ असणार्‍या एम.टी.डी.सी. च्या रुम्स मध्ये राहीलो. तिथे रात्री अगदी शांत, थंड आणि समुद्राच्या लाटांचा आवाज ह्या वातावरणात आम्ही गप्पा मारत बसलो. ही सकाळ २२) २३)मला सगळ्यात जास्त आवडलेला हा नजारा. २४) तिथे हे पक्षी भरपूर होते पण पोझ देत नव्हते. २५) पारव्याने मात्र व्यवस्थित भाव न खाता फोटो काढून दिला. २६) कण्हेरीची फुले २७) तिथुन निघून आम्ही प्रथम हेदवीच्या गणपतीच्या दर्शनाला गेलो. २८) हेदवीच्या गणपतीच्या आजूबाजूचा हिरवागार परीसर. २९) ३०) ही फुले कोकणात सगळीकडेच पहायला मिळाली. ३१) तिथून आम्ही मालवणच्या दिशेने निघालो त्या वाटेतील दृश्ये. ३२) ३३) मालवणात जाता जाता अचानक भराडी देवीच्या दर्शनाला जायचे ठरले. आणि इतके सुंदर मनमुराद दर्शन झाले की आम्हाला खुप प्रसन्न वाटून दिवसभराचा थकवा क्षणात दूर झाला. तिथे स्ट्रीक्टली देवीचा फोटो काढणे मनाई आहे. ३४) त्या रात्री तारकर्लीला राहून आम्ही सकाळी समुद्र सफर करण्यास सज्ज झालो. ३५) तारकर्लीच्या किनार्‍यावर लागलेल्या बोटी ह्या समुद्र सफर घडवून आणणार्‍या फायबरच्या बोटी आहेत. आम्ही लाकडाची बोट घेतली होती. ३६) ही आम्ही बुक केलेली लाकडी बोट. बिचारे ते बोटवाले खुप कष्ट करून बोट आत नेतात आणि बाहेर आणतात. ३७) ३८) तिथले सगळेच समुद्रकिनारे स्वच्छ आणि अप्रतिम. तारकर्लीच्या समुद्र किनार्‍यावे हे शंख शिंपले आलेले. त्यातील पाण्यातले बरेचशे शंख जिवंतही होते. ३९) सुंदर दिसत आहेत ना. ४०) वेगवेगळे प्रकार ४१) अफाट समुद्र आम्ही बोट मध्ये बसुन न्याहाळत होतो. ४२) सकाळच्या उन्हात किनारा चमकत होता. ४३) ४४) ४५) हा बहुतेक वेंगुर्ल्याचा किनारा.
लेखनविषय:

वाचने 10904 वाचनखूण प्रतिक्रिया 26

प्रचेतस 24/11/2011 - 08:29
अप्रतिम फोटो जागुतै. तळकोकणाचे सुरेख दर्शन घडवलत.

सविता००१ 24/11/2011 - 10:28
जागुताई, तुम्ही आणलेत का काही शंखशिंपले? कसले मस्त आहेत! बाकी तुमचे फोटो नेहमीच सुंदर असतात.:)

अन्या दातार 24/11/2011 - 12:41
तारकर्लीला पहाटे पहाटे डॉल्फिन्स दिसतात म्हणे. तुम्ही बघितलेत का? (कॉलेजमधला डॉल्फिन ग्रुप सदस्य) अन्या

प्रभाकर पेठकर 24/11/2011 - 13:31
निसर्गरम्य कोंकणाची अप्रतिम छायाचित्रे. अभिनंदन. चिपळूण सासुरवाडी असल्याने अनेकदा चिपळूणास भेट दिली आहे. हेदवी, गणपतीपुळेही पाहून झाले आहे. पण, छायाचित्रांची हौस भागविण्यासाठी लवकरच समग्र कोंकणाचा फेरफटका मारण्याच्या विचारात आहे. पाहूया कधी योग जुळून येतो ते.

शिल्पा नाईक 24/11/2011 - 15:57
इतके शंख शिंपले पाहून मी तर वेडीच झाले असते. आमच्या विरारच्या समुद्रावर कधी कधी असाच खच पडतो. गोळा केलेस की नाही शंख?

५० फक्त 24/11/2011 - 17:30
हेदवीची ब्राम्हण घळ राह्यली वाट्ट्ं, जाम भारी जागा आहे ती एक, तरी बाकीचे सगळेच फोटो एकदम मस्त आलेत, आता जातोच आहोत जानेवारीत तेव्हा एक फोटोची स्पर्धाच आयोजित करतो मी.

चित्रा 28/11/2011 - 18:39
सुंदर. शिंपल्यांचे फोटो फार आवडले.

टुकुल 29/11/2011 - 05:00
सर्व फोटो इतके सुंदर आलेत कि कोकणात एकदा निवांत वेळ काढुन फिरायला जायचा मोह आवरत नाहीये. --टुकुल

जागु 29/11/2011 - 12:24
चिंतामणी, चित्रा, प्राजू धन्यवाद. टुकूल कोकण फोटोंपेक्षाही सुंदर आहे. एकदा नक्कीच जा. फोटोत काहीच भाग कैद झालाय पण तिथल्या डोंगर वाटांचे सौंदर्य अजून डोळ्यात कैद आहे.

सोत्रि 29/11/2011 - 15:13
जागुतै, मस्त फोटो. तारकर्लीचा समुद्र किनारा अतिशय सुंदर आहे. 'क्रिस्टल क्लीयर' म्हणावे असा. त्या किनर्‍यावर मला स्टार फिश आणि रंगीत मासा दिसला होता. स्टार फिशला पकडले ही होते. दुर्दैवाने तेव्हा कॅमेरा नव्हता जवळ. - (तारकर्लीच्या आठवणीत बुडालेला) सोकाजी